Saturday, November 9, 2013

जुने मित्र, नवे स्वरुप (ई-बुक्स्)

The saying, 'books are our best friend' has been known to everyone of us, be it printcopy books, ebooks or anything else. I am an avid reader but frankly I was not so till I met Sadguru Bapu. Not just an avid but, Bapu is a voracious reader. I have attended many seminars taken by Him and have been amazed by the level of knowledge He has simultaneously in so many fields and too not just at bookish but at very practical level. Attending these seminars made me to awe and admire this wealth of knowledge and I too developed liking for books. 

After understanding this importance I was fortunate to get a chance to pen-down an article on ebooks in my series in Pratyaksha. Here I am presenting the 12th article of my series from Pratyaksha, written on free ebooks. The article has featured in 4th February 2011 issue of Pratyaksha. जुने मित्र, नवे स्वरुप (ई-बुक्स्)

ऑफिसमध्ये बसलो होतो. मिटींगसाठी एक क्लायंट आला होता. मिटींगला थोडा वेळ असल्याने तो मला म्हणाला मी जरा पुस्तक वाचत बसतो. मला वाटल की हा कोणतीतरी जाडजूड कादंबरी किंवा पुस्तक काढून वाचत बसेल. पण त्याने मोबाईल सारखी दिसणारी एक वस्तू काढली व वाचत बसला. मी थोड्या वेळाने त्याला ती वस्तू काय आहे म्हणून कुतूहलाने विचारले. तर तो म्हणाला की ह्याला किंडल असे म्हणतात जे एक ई-बुक रीडर आहे व हे अख्ख्या जगभरात पुस्तकं, वर्तमानपत्र, मासिकं, ब्लॉग्ज्‌ व इतर डिजीटल माध्यमातील साहित्य वाचण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. आपण पुढे या लेखात किंडल बद्दल नाही तर या ई-बुकस् म्हणजेच डिजिटल माध्यमातील साहित्याबद्दल जाणणार आहोत.

पूर्वी पुस्तकं वाचायची म्हटलं की आपण ग्रंथालयाचं सदस्यत्त्व घेऊन तिथून पुस्तक आणायचो. पण आता पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्रं हे सारे साहित्य डिजीटल माध्यमामध्ये  (सॉफ्ट फॉरमॅट) उपलब्ध आहे जे आपण संगणक व इंटरनेट व आता मोबाईलरुन ही वाचू शकतो. www.booksshouldbefree.comwww.gutenberg.orgwww.manybooks.netwww.getfreeebooks.comwww.upscportal.comhttp://ebooks.netbhet.comwww.boltipustake.blogspot.comwww.free-ebooks.netइत्यादी ही अशीच काही संकेतस्थळे आहेत ज्यावरुन आपण पुस्तकं, मासिकं, इत्यादी मोफत वाचू शकतो व डाऊनलोड ही करू शकतो.

पुस्तक म्हटले की आपल्याला फक्त शाब्दिक (टेक्सशुअल) पुस्तक एव्हढीच आपली कल्पना असते. हल्ली नव-नवीन मनोरंजनाच्या माध्यमांमुळे वाचनाची आवड काहीशी कमी झाल्याचे जाणवते आहे. अनेक ग्रंथालये ओस पडली आहेत व काही तर बंदही झाली आहेत. म्हणूनच बदलत्या काळाबरोबर या साईटस्‌च्या माध्यमातून आपण आता साहित्याच्या बदललेल्या संग्रहा व स्वरुपाकडे वळलेलो आहोत. म्हणूनच या साईटस्‌
र शाब्दिकच नव्हे तर ऑडियो फॉरमॅट मध्येही पुस्तके उपलब्ध आहेत. ऑडियो पुस्तके म्हणजेच या साईटस्वरील पुस्तकं निवडायची व ती प्ले करायची की त्यातील मजकूर आपल्याला वाचावा लागत नाही तर आपण जशी गाणी ऐकतो तसा त्यातील मजकूर ऐकू येतो. www.booksshouldbefree.com ह्या साईटवरील सर्व पुस्तके ही ऑडियो बुक्स्‌च आहेत. या साईटवरील काही प्रसिद्ध पुस्तकांची नावं सांगायची झाली तर त्यामध्ये लुईस कॅरल यांचे ऍलिस इन वंडरलॅड, सर आर्थर डॉईल यांचे द ऍडव्हेंचर्स् ऑफ शेरलॉक होमस्जोनॅथन स्विफ्ट यांचे गलिव्हर्स् ट्रॅव्हलस्, इत्यादि पुस्तके आहेत. ह्या साईटशिवाय www.gutenberg.org  ही सुद्धा अशीच एक ऑडियो पुस्तकांची साईट आहे.

www.manybooks.net
 या साईटवर २९,००० ई-बुक्स् उपलब्ध आहेत. सौंदर्य आणि फॅशन, जीवन-शरीर, व्यापार, नाटक, अर्थशास्‍त्र, शिक्षण, खाद्य-व्यंजने, खेळ, इतिहास, हास्यविनोद, रहस्य, काव्य, राजकारण, मनोविज्ञान, धर्म, विज्ञानकल्पित वाडमय, प्रवासवर्णने, या व अशा जवळ-जवळ ४० विषयांवर विविध पुस्तके उपलब्ध आहेत. कोणतेही पुस्तक निवडून वाचण्यासाठी या साईटस्वर विविध पर्याय (फिलर्टस्) उपलब्ध आहेत उदा., लेखकशिर्षक, शैली (जेनर्स्‌), भाषा, इत्यादी. ह्या साईटच्या शिवाय www.free-ebooks.net व www.getfreeebooks.com या सुद्धा साईटस् उपलब्ध आहे. या साईटस्‌वरसुद्धा हे सर्व फिचर्स् उपलब्ध आहेत. त्याशिवाय या सर्व साईटस्‌वर सर्वात प्रसिद्ध व नवप्रकाशित अशा पुस्तकांच्या वेगळ्या याद्या ही आहेत. या साईटस्वर आपण स्वत: लिहिलेली पुस्तकेही मोफत प्रकाशित (अपलोड) करू शकतो.
तसेच या साईटस्वर ई-बुक्स् बरोबर ई-मासिकेही मोफत उपलब्ध आहेत उदा: ग्लोबल फायनान्स्
, वर्लड इंडस्ट्रीयल रिपोर्टर, नासा टेक ब्रीफ्स्, इत्यादी. या साईटस्वर अनेक विषयांवर उदा. कृषि, मोटार उद्योग, अभियांत्रिकी, शिक्षण, अर्थशास्‍त्र, स्वास्थ्य आणि चिकित्सा, माहिती तंत्रज्ञान, इत्यादि विषयांवरील मासिके आपल्याला मोफत सबस्क्राईब करता येतात. आपण या लेख-मलिकेत अगोदर पाहिल्या प्रमाणे 
www.upscportal.com या साईटवरूनही आपल्याला मोफत मासिकं मिळतात. यात सर्व जगातील व खास करून भारतातील सर्वच घडामोडींवर उत्कृष्ट लेख व माहिती असते. मासिकांमध्ये  हिंदू या अग्रगण्य वृत्तपत्र समूहाचे फ्रंटलाईन (मासिक) व इतर मासिकांमध्ये प्रतियोगिता दर्पण (मासिक), योजना (मासिक), डेव्हलप इंडिया (साप्ताहिक), डायलॉग इंडिया (द्विमासिक) आपल्याला मोफत मिळतात. या मासिकांच्या PDF प्रती आपण ह्या साईटस्‌वरूनच थेट डाऊनलोड करू शकतो.
द गार्डीयनच्या एका सर्वेक्षणाप्रमाणे २४ तास चालणार्‍या बातमी वाहिन्यांमुळे
, वाचनाची आवड कमी होणे व वेळेच्या अभावामुळे जगभरात वर्तमानपत्रांचा खप कमी होत आहे. त्यामुळेच जगभरातीलच नव्हे तर भारतातीलसुद्धा सर्व राष्ट्रीय व प्रांतिक वर्तमानपत्रांनी आपले ई-पेपर्स काढले आहेत. मुख्यत: हे ई-पेपर आपल्याला ह्या वर्तमानपत्रांच्या साईटस्वर मोफत वाचायला मिळतात. काही वर्तमानपत्रांचे ई-पेपरस् वाचायला आपल्याला त्यांच्या साईटची सदस्यता घ्यावी लागते, जी मोफत मिळते तर काही निवडक वर्तमानपत्रांचे ई-पेपर्स वाचायला आपल्याला त्यांच्या साईटचे मुल्य देऊन सदस्यत्त्व स्वीकारावे लागते.
आता थोडे आपण आपल्या मराठी मुलखात वळूया. वरील उलेखीलेल्या सर्व साईटस्‌वर आपण इंग्रजी व इतर परदेशी भाषांमधील साहित्यच वाचू शकतो. जर आपल्याला मराठी भाषेतील साहित्य वाचायचे असेल तर
 
http://ebooks.netbhet.com ही एक साईट आहे. संदीप खरे, रघुनाथ भिडे, इत्यादि चांगल्या लेखकांची पुस्तके या साईटस्वर उपलब्ध आहेत. उदाहरणेच द्यायची झाली तर मी माझा, शिवाजी राजे, गरुडांच्या सहवासात, इत्यादी पुस्तके ह्या साईटवर उपलब्ध आहेत. www.marathinovels.net ही सुद्धा एक साईट आहे ज्यावर आपल्याला मराठी ई-पुस्तके मिळतात. www.boltipustake.blogspot.com हा एक अत्यंत सुंदर मराठी ब्लॉग आहे ज्यावर मराठी ऑडियो पुस्तके आहेत. उदा. आगरकर दर्शन, लोकहितवादींची शतपत्रे, अमोल गोष्टी (साने गुरुजी), श्यामची आई (साने गुरुजी), शेतकर्‍याचा आसूडसत्याचे प्रयोग, गोष्टी इसापच्या,अशी अत्यंत दर्जेदार पुस्तके, ऑडियो फॉरमॅटमध्ये आहे www.scribd.com व www.slideshare.net या सोशल पब्लिशिंग साईटस्वरही आपल्याला सांकेतिक शब्द (की वर्डस्) वापरून, जर शोध घेतला तर अनेक उपयुक्त व हवे असलेले भरपूर मराठी साहित्य मिळू शकते.

www.anynewbooks.com
 ह्या साईटवर आपण आपले नाव नोंदवले (मोफत) व आपला ईमेल आय.डी. या साईटवर दिला की आपल्याला त्यांच्याकडून दर आठवड्याला एक ईमेल येते ज्यात त्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नवीन पुस्तकांची नावे व माहिती असते. त्याशिवाय www.amazon.comwww.sahyadribooks.com इत्यादी अनेक इतर साईटस् आहेत ज्यावरून आपण पुस्तके विकत घेऊ शकतो.

जर आपल्याला वाचनाची आवड असेल तर
, ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक पर्यायांचा उपयोग करू शकतो व त्यासाठी आपल्याला जागेचे, काळाचे, साधनांचे व वेळेचे बंधन आड येऊ शकत नाही.

Wednesday, October 9, 2013

Cobra outside Home !!! Whoa !!!

A surprising guest woke me up today morning, who was just outside the window of our hall. The guest was a cobra of almost 5-5 1/2 feet!!! Whoa!!! Pictures of a deadly yet a wonderful creature captured from my Samsung Galaxy 10.1 tab. 

The reptile even raised his hood as if posing for the photos. Just amazing!!! 

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

cobra, reptile, hood, snake

Saturday, September 21, 2013

‘ऑनलाईन’कारभार - National Portal of India

Hello Friends.. I am writing to you after a long time. Today I am publishing the 11th article of my series from Pratyaksha. Today's article focusses on National Portal of India i.e. www.india.gov.in through which any citizen can get various works related to government done online, without having to visit Government offices. (This article had appeared in Pratyaksha on 28th January 2011).

national portal of India, online governance

It was just this Thursday that during His discourse, Bapu spoke about advent and expansion of Nanotechnology in our daily lives. At the same time He also mentioned about the use and relevance of computers, smart phones and rather Information and Communication Technology i.e. ICT as a whole. He once again stressed on being hands-on with ICT unless which we would become socially  and professionally irrelevant in the near future to come. This site which we would see here is a sure indicator of these times to come. 


ऑनलाईनकारभार


कुठलेही सरकारी काम म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गजबजलेले कार्यालय. या कार्यालयातील सर्वसाधारणपणे दिसणारा नजारा व अविभाज्य घटक म्हणजे पेपरांचे साठलेले गठ्ठे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला भारत सरकारने हळू-हळू का होईना पण आपले काम ऑनलाईन, डिजिटलाईज्ड व पेपरलेसकरायला सुरुवात केली आहे. ह्याच प्रयत्‍नातून नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया ची उत्पत्ती झाली. (www.india.gov.in) या पोर्टलवर भारत सरकारची सर्व मंत्रालये, विभाग व कंपन्या, त्यांच्या साईट्स्‌ व त्या साईट्सवरील ऑनलाईन सेवा आणि योजना एका छत्राखाली आणल्या गेल्या आहेत. भारताच्या सर्वसाधारण नागरिकालाही वापरता यावे म्हणून हे पोर्टल हिंदीतही उपलब्ध आहे. या पोर्टलचा आपल्याला कसा व कुठे फायदा होतो ते आता आपण पाहूया.

शिक्षण व रोजगार


सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पोर्टलवर आपण NCERT ची पुस्तके मोफत वाचू शकतो. त्यामुळे आपला ह्या पुस्तकांवर होणारा खर्च नक्कीच वाचू शकतो. शिवाय कोणत्याही सरकारी उदा: भारतीय लोक सेवा आयोग, इत्यादि व महत्त्वाचे म्हणजे सर्व राज्य शिक्षण बोर्डांच्या उदा: एस.एस.सी-एच.एस.सी., इत्यादि परीक्षांचे निकाल ह्या पोर्टलवर पाहता येतात. या पोर्टलद्वारे http://www.educationindia4u.nic.in/ या साईटशी आपण जोडले जाऊ शकतो. ह्या साईटवर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाबाबत ऑनलाईन सल्ला मिळविता येतो. शिवाय हे पोर्टल आपल्याला राष्ट्रीय विद्यालयीन शिक्षणसंस्था या अंशकालीनशिक्षणसंस्थांशी (ओपन युनिव्हर्सिटी) जोडते. त्याशिवाय ह्या पोर्टलचा  उपयोग करून आपण भारतीय बँक संघाच्या साईटशी जोडले जाऊ शकतो जेथे आपल्याला शिक्षणासाठी जर बँकेमधून शैक्षणिक कर्ज काढायचे असेल तर त्याबद्दलची माहिती मिळू शकते.ह्याच पोर्टलचा उपयोग करून आपण सर्व राज्यांच्या रोजगार कार्यालयांशी (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज) जोडले जाऊ शकतो. या रोजगार कार्यालयांच्या साईट्सवर उपलब्ध असलेल्या सर्व सरकारी नोकर्‍यांची यादी व इतर माहिती असते. या पोर्टलवर सर्व सरकारी संस्था व कंपन्यांच्या परीक्षांचे अर्ज असतात व ते आपण डाऊनलोड करु शकतो. याच पोर्टलचा उपयोग करून भारतीय सेनादलातील पूर्व कर्मचारी, शहीद जवानांच्या पत्‍नी व सेनादल कर्मचार्‍यांच्या परिवारातील सदस्य, आर्मी वेलफेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या (AWPO) साईटवरून नोकर्‍यांसाठी अर्ज करू शकतात. याच AWPOच्या साईटवर आपला बायो-डेटा कसा तयार करावा इथपासून ते मुलाखत कशी द्यावी इथपर्यंतच्या सूचना दिल्या आहेत. त्या कोणीही वाचू शकतो व ज्या नोकरीच्या शोधात फार उपयोगी ठरू शकतात.

कर-शुल्क आणि उद्योग

हे पोर्टल आपल्याला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या साईटशी जोडते. या साईटवर आपण सर्व सरकारी करांचे टॅक्स व शुल्कांची पूर्ण माहिती घेऊ शकतो. ह्याच साईटचा उपयोग करून आपण आपला कर, ऑनलाईन भरू शकतो. शिवाय करांचा रिफंड, चलान, शिपिंग बील, PAN / TAN कार्ड, इत्यादिची प्रक्रिया कुठपर्यंत पोचली आहे तेही पाहू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण PAN / TAN कार्डांसाठीची नोंदणी, पुनर्नोंदणी व बदलांसाठीचा अर्ज ऑनलाईनच करू शकतो. यामुळे आपला भरपूर वेळ तर वाचतोच शिवाय पारदर्शक व्यवहाराची खात्री मिळू शकते. त्याशिवाय ह्या साईटवर आपण किती कर भरावा याचीही माहिती मिळते. 

या पोर्टलच्या उपयोगाने आपण भारत सरकारच्या, उद्योगांना चालना देणार्‍या अनेक साईट्सशी जोडले जाऊ शकतो उदा: http://coirboard.nic.in, http://coconutboard.nic.inhttp://cibrc.nic.in, इत्यादि. या साईटसकडून आपल्याला उपयुक्त मासिके ही ईमेल केली जातात. ह्याच पोर्टलच्या उपयोगाने आपण आपल्या राज्याच्या हवामानाचा अंदाज नियमितपणे घेऊ शकतो. शेतकर्‍यांना याचा फार मोठा लाभ होतो. त्याशिवाय कमॉडिटी व फ्यूचर्स बाजारातील किंमतीसुद्धा आपण या पोर्टलच्या सहाय्याने जाणून घेऊ शकतो.

सर्व सरकारी विभागातील तक्रार नोंदणी, पोलीस

ह्या पोर्टलद्वारे आपण केंद्रीय सतर्कता आयोगाच्या (सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन) साईटशी जोडले जाऊ शकतो. ह्या साईटवर आपण कोणत्याही केंद्र सरकारी मंत्रालय, विभाग, अस्थापने (कंपनी), इत्यादींच्या कर्मचार्‍यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. त्याशिवाय या पोर्टलद्वारे आपण प्रशासकीय सुधार व लोक तक्रारविभाग (डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटीव्ह रीफॉर्मस ऍड पब्लिक ग्रिव्हंसेस) च्या साईटशी जोडले जाऊन, आपण येथे कोणत्याही क्रेंद्र, राज्य व स्थानिक सरकारी मंत्रालय, विभाग, संस्था, अस्थापने (कंपनी), इत्यादिच्या कर्मचार्‍यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. या सर्व तक्रारींचा पाठपुरावा ही आपण ऑनलाईनच करू शकतो.

या पोर्टलच्यामार्फत आपण सर्व राज्यांच्या पोलीस यंत्रणांच्या साईट्सशी जोडले जाऊ शकतो. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तींची माहिती, चोरीला गेलेल्या व सापडलेल्या मोटारींची माहिती, अनोळखी मृतदेहांची नोंद व माहिती, अटक केलेल्या व कारागृहात डांबलेल्या लोकांची नावे, इत्यादि आपल्याला येथे पाहता येते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस महानिदेशक डी. शिवानंदन यांनी लवकरच FIR (फर्स्ट इंन्फरमेशन रिपोर्टची) ऑनलाईन नोंद करण्याची सोय उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. जेव्हा कधी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तेव्हा ती या पोर्टलच्यामार्फतही नक्कीच उपलब्ध होईल.

सरकरी दस्तावेज

या पोर्टलच्या मदतीने आपण आपले जात, जन्म, मृत्यू व डोमिसाईल प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मिळवण्याची प्रक्रिया कुठपर्यंत पोचली आहे ते  देखील ऑनलाईन पाहू शकतो. त्याशिवाय पासपोर्ट मिळवण्यासाठीच्या प्रकियेची संपूर्ण माहिती व त्यासाठी लागणारे सर्व अर्ज या पोर्टलद्वारे उपलब्ध होतात. विदेश दौरा करण्यासाठी पासपोर्टबरोबर त्या देशाच्या व्हिसा (देशात प्रवेश करण्याचा परवाना) मिळविण्याची गरज असते. तो मिळविण्यासाठी त्या ज्या देशात जायचे आहे त्या देशाच्या दूतावासात जावे लागते. भारतात ज्या देशांचे दूतावास आहेत त्या सर्व देशांची यादी त्यांच्या पत्त्यांसकट व त्यांच्या कार्यालयीन वेळेसकट या पोर्टलच्या मदतीने आपल्याला मिळवता येते.

सरकारी कायदे व नियम

या पोर्टलवर भारताचे संपूर्ण संविधान PDF फॉरमॅटमध्ये आहे. भारतीय संसदेने व सर्व राज्याच्या विधानसभा-विधानपरिषद यांनी संमत केलेले सर्व कायदे आणि सर्व सरकारी विभागांनी संमत केलेले कायद्यांचे तपशील या पोर्टलवर नियमित प्रकाशित केले जातात. नियम, अधिनियम, विवरणिका (गॅझेटियर्स), ऍक्ट व त्यातील बदल त्यातील तळटीपांसकट  सेक्शन्स, शेड्युल्स या पोर्टलवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे भारतीय संसदेने १८३४ पासून संमत केलेले सर्व कायदे व त्यांचा तपशील या पोर्टलवर आहे. केंद्र व सर्व राज्य सरकारांनी उद्घोषित केलेल्या सर्व लोकोपयोगी योजनांचा सर्व तपशील व त्यांचा सामान्य माणसाला होणारा उपयोग ह्याची माहिती या पोर्टलवर आहे.

टेलिफोन व दूरसंचार

टेलिफोन डिरेक्टरी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पिवळ्या रंगाचे गलेलठ्ठ पुस्तक येते. पण या पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन डिरेक्टरी उपलब्ध आहे. या डिरेक्टरीमध्ये आपण आपल्याला ज्या व्यक्तीचा / संस्थेचा दूरध्वनी क्रमांक हवा आहे त्याचे नाव, शहर व राहत असलेल्या विभागाचे नाव टाकले की आपल्याला त्या व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक मिळतो. या पोर्टलवर पिन-कोड फाईंडरसुद्धा आहे, ज्यामध्ये फक्त आपल्याला हव्या असणार्‍या विभागाचे नाव टाकले की त्याचा पिनकोड आपल्याला मिळतो. शिवाय भारताच्या सर्व शहरांचे STD क्रमांक व जगातील सर्व देशांचे ISD क्रमांकांची यादी या पोर्टलवर आपल्याला मिळू शकते. आपल्याला पत्र पाठविण्यासाठी लागणारे पोस्टेजची किंमतसुद्धा या पोर्टलद्वारे काढता येते. BSNL ही मोबाईल फोनची सेवा देणारी सरकारी संस्था असल्याने या पोर्टलवरुन आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपले मोबाईलचे बिल तपासू शकतो, भरू शकतो, त्याची प्रिंट घेऊ शकतो व त्याचबरोबर आपल्याला बिलाचे SMS येण्यासाठी मोफत सदस्यत्वही घेऊ शकतो. दूरसंचार सेवादात्यांच्या व्यवसायासाठी लागणार्‍या विविध परवान्यांचे अर्ज या पोर्टलद्वारे दूरसंचार मंत्रालयाच्या साईटला जोडून उपलब्ध केले जातात उदा. इंटरनेट टेलिफोनी, दूरसंचार मूलभूत-सुविधादाता, एकीकृत अभिगम सेवा (युनिफाईड ऍक्सेस सर्विस), वी.सॅट, दूरसंचार व बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, सार्वजनिक रेडियो ट्रंकिंग, सेल्युलर मोबाइल टेलिफोन, वॉईस मेल, एकीकृत संदेश व ऑडियोटेक्स सेवा, ग्लोबल सॅटेलाइट सेवा, इत्यादिंच्या परवान्याच्या अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे त्याची स्थिती हे सेवादाते या पोर्टलवरच पाहू शकतात.

मनोरंजन व पर्यटन

या पोर्टलच्यामार्फत आपण डी.डी. वाहिनीवरचे सर्व कार्यक्रमांचे व्हिडीओज थेट (लाईव्ह) व रेकॉर्डेडही पाहू शकतो. त्याशिवाय भारतातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती ही ह्या पोर्टलवर उपलब्ध आहे. हल्ली काही पर्यटकांची काही टूर ऑपरेटर्सकडून फसवणूक होत असल्याने या पोर्टलवर सर्व सरकारमान्य टूर ऑपरेटर्सची यादी आहे.

सरकारी अधिकार्‍यांची माहिती

या पोर्टलवर सर्व प्रमुख पुढारी, नेते (राष्ट्रपती, उप-राष्ट्रपतीपंतप्रधान, केंद्रीयमंत्री, राज्यपाल, नायब-राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार) व सुप्रिम कोर्टाचे सर्व न्यायाधीश आणि सर्व सुरक्षा दलांच्या प्रमुखाचे बायोडेटा आहेत.आत्ताच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. के.शंकरनारायणन यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की मी एका अशा भारताचे स्वप्‍न बघत आहे की जिकडे प्रत्येक नागरिकाला इंटरनेट वापरुन कुठूनही मतदान करता येईल’. सरकारचे तशा दृष्टीने प्रयत्‍नही चालू आहेत व त्यांच्या अंदाजानुसार हे २०१२ साली शक्य होईल. असे झालेच तर ऑनलाईन, डिजिटाईज्ड व पेपरलेस सरकार व ऑफिस घडविण्याच्या सरकारी प्रयत्नांचा तो एक अत्यंत महत्त्वाचा व मोठा टप्पा असेल. वरील सर्व सरकारी प्रयत्नांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा आपण सरकारी कामांसाठी इंटरनेटचा योग्य उपयोग करून आपला व सरकारचा वेळ व पैसा वाचवू शकू. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे प्रशासकीय व्यवहारात पारदर्शकता येईल. त्यामुळे गैरव्यवहारांच्या विरोधात पोकळ बडबड करण्यापेक्षा आपण, उपलब्ध करून दिलेल्या या पोर्टलचा अधिक प्रभावीपणे वापर करणं अधिक सयुक्तिक ठरेल, नाही का!

Thursday, August 22, 2013

Approximate value of Pi and its History

Param Poojya Bapu has been delivering his last 3 pravachans on the mathematical constant of Pi or Π. He has very lucidly and scientifically explained the relation, symbolism and commonality between this mathematical value and the Tripurari Trivikram Chinnah

Pi or Π is the value that is obtained whenever the circumference of the circle is divided by its diameter. This equation or ratio remains constant universally, regardless of the size, measurements of the circle. Another universal constant is the fact that the measure of any angle inscribed in a circle is a constant i.e. a right angle. 

Pi traces its roots and history to India. Indians were the first to observe that the perimeter (circumference) of a circle increases in proportion to its diameter. Indians established the relation: perimeter / diameter = constant. Indians knew about Pi since the Indus Valley civilization that dates back to 3000 BC. The value of Pi also finds a mention in Rigveda back to 1700-1100 BC. The Vedangas and Sulabasutras too mention the value of Π. The oldest of them, the Baudhayayana Sulabasutra claims that the perimeter of a pit is 3 times its diameter, therefore approximating the value of Π at 3. 

Yadnyavalkya
The legendary sage of Vedic India, Yajnavalkya writes astronomical calculations in the Shatapatha Brahmana (9th century BC) that led to a fractional approximation of Π ≈ 339/108 (which equals 3.13888, which is correct to two decimal places when rounded, or 0.09 percent below the exact value). 

Many other texts, including the Mahabharata (Bhishmaparva, XII: 44) and many Puranas approximate Π at the value of 3. Later, many other Sulabasutras mention the value of Π to be 18 * (3 – 2 √2) = 3.088. The Manava Sulabasutra approximates the value of Π to be 28/5= 3.125.

The ancient Jain school of mathematics preferred the approximation, Π = √10. This value of Π has been used not only by Jains, but also by the great Indian mathematicians like Varahamihira, Brahmagupta and Sridhara

Aryabhatta
With Aryabhatta (476 AD), a new era of mathematics dawned in India. Aryabhatta approximated value of Pi in the book Aryabhatiyam (chaturadhikaM shatamaShTaguNaM dvAShaShTistathA sahasrANAm AyutadvayaviShkambhasyAsanno vr^ttapariNahaH, Gaṇitapada 10) as Π = 62832/20000 = 3.1416. This was astonishingly correct to 4 decimal places. Aryabhata used the word asanna meaning approaching, to imply that not only is this an approximation but that the value is incommensurable or irrational. 
The Katapayadi system from 683 AD which is used to encode and encrypt numbers in many shlokas has a hymn (गोपीभाग्यमधुव्रात-श्रुग्ङिशोदधिसन्धिग ॥ खलजीवितखाताव लहालारसंधर ॥) dedicated to Lord Krishna which gives the value of Pi upto 31 decimal places. What is more astonishing is that they needed Pi upto 31 places! 

Many years later, another great mathematician of the Aryabhatta School of mathematics, named Madhava (1340 AD), gave the value of Π to be 2827,4333,8823,3 / 9*1011. This approximation yields correct value of Π to 11 decimal places. This value of Π is still in use in modern mathematics. Madhava's work on the value of Π is cited in the Mahajyanayana prakara ("Methods for the great sines"). This text gives the infinite series expansion of Π, now known as the Madhava-Leibniz series

As mentioned earlier, during the last three pravachans, Bapu explained how Pi is an integral part of the nature, may it be in human body or the Universe. He also mentioned, the Pi from the scientific world given by the Greeks is same as Shree Tripurari Trivikram Chinnah given by Indians, at the metaphysical or the spiritual level. 

Π finds its usage in geometry, trigonometry, complex numbers and analysis, number theory, probability, calculus, statistical physics, engineering, geology, computers, etc. In fact the list is endless. Mathematicians have so far been successful in devising the value of Pi till 5 million digits, post the decimal point. 

Bapu has also made it clear that; Pi or Π is an irrational number, which means that it cannot be expressed exactly as a ratio of any two integers. Fractions such as 22/7 are commonly used as an approximation of Π; no fraction can be its exact value.

Tuesday, August 6, 2013

MANY HAPPY RETURNS OF THE DAY AAI

Most wonderful and love filled eyes of my MOTHER.. my beloved NANDAI.. Teri Aankho ke siwah Duniya mein rakkha kya hai.. MANY HAPPY RETURNS OF THE DAY AAI


Wednesday, July 24, 2013

DIGITAL FORTRESS

Just happened to read post about novel, DIGITAL FORTRESS on Samirdada's blog (http://aniruddhafriend-samirsinh.com/2013/07/04/digital-fortress/). Once after a meeting, while talking casually about interesting books worth a read, I recollect Bapu praising this work of Dan Brown. 

digital fortess, dan brown, bapu, aniruddha bapu, dada, cryptography, encryption and decryption keys, hacking, information security, firewalls
The novel is just the kind of stuff you would need to spice up a tired mood while retiring to bed. Being from IT industry, it was very interesting for me to relate to various concepts and technologies like, cryptography, encryption and decryption keys, hacking, information security, firewalls, super computers, etc. described in it. 

Most of you by now would have been familiar with the name Edward Snowden. It was quiet fascinating and inexplicable for me that the events about Snowden, United States and National Security Agency that we have been reading in newspapers and the story in this book was very much identical and went parallel to what and how I was reading. Hence reading this book became all the more mystifying.  

I was also quiet amazed to find that this masterpiece was composed by Dan Brown in the year 1998 and yet he mentions all the above mentioned technologies pin-pointedly in this novel. Another baffling reference in this book that was that of a technology which is described to be used by one of the character, Hulohot. It has a stark similarity to Google Glass which is been just launched this year. Hats off to Brown's imagination that he could think of such a technology, way back in the year 1998.  

The story is so hooking that it is just irresistible to keep this book down. Finally the climax in it is just a ideal finish to such a wonderful work. I thought of finishing the last 100 pages of the book at leisure whenever I could find time but when I actually started reading them. But I could say stop to myself only after finishing it in one go. 

Sunday, June 30, 2013

Cricketer Bapu !!!Bapu has always been best at whatever He has done and its same with cricket. I remember He telling us during one of the meetings that He was an ardent cricket fan in His younger days and zealed to watch matches at Brabourne Stadium, whenever He found time. 

Not many would know what a Chinaman ball means in cricket. I think most of us may even not even know its existence. I very clearly recollect Bapu giving the description of what a Chinaman ball is and how it is bowled in one of His discourses'

Bapu still very much plays cricket whenever he finds time from his extremely hectic schedules. But during the days when he actually played cricket regularly, he was fast bowler who hardly any of the batsmen could face untroubled. But I am sure due to professional reasons and commitment to his cause he might not have taken it up as a profession. Indeed Indian cricket might just have missed its bestest bowler ever.

Bapu not only himself plays but also makes others play and enjoy the game. Which is very clear from this article which I read on Samirdada's blog today: http://aniruddhafriend-samirsinh.com/2013/06/30/bapu-and-sports/. With this my thoughts went back to the Semi-Final of 2011 Cricket World Cup between India and Pakistan. The match was certainly exciting but what had made me more excited than the match itself was that arrangements were made at 5th floor of Happy Home for volunteers to enjoy this match on a big screen. Nandai herself came to meet us at the start of the match and greeted us with snacks and also sent us sweets when India actually won that match. Paurassinh (Bapu's son) and Swapnilsinh (Bapu's son-in-law) themselves watched it with all of us. Samirdada was also present with us for sometime. 

I witnessed another example of Bapu's generosity for the game and for making others play. It was during the Kolhapur Medical & Healthcare Camp held every year. I had the privilege of being part of it in the years 2008 and 2010. Here all the medical aid and general day-to-day equipments and clothing is distributed to the needy labourers and farmers for free. Shree Aniruddha Upasana Foundation with Bapu's inspiration also distributes free cricket kits and also other sports material during this Camp. These cricket kits include bats, balls and stumps for children of these needy folks to play and enjoy. This is how Bapu flowers childhood of so many children and youngsters. Nandai and Suchitdada also themselves visit villages and perform this donation.

There was another cricketing link of Bapu I found. I read a wonderful, unbelievable and miraculous experience that Bapu gave Prof. Ratnakar Shetty, the Chief Administrative Officer (CAO) of Board of Control for Cricket in India (BCCI). The experience was about India's tour of Pakistan in the year 2004 and how smoothly it went. Bapu's Sankalp (resolution) indeed! You can read that article here: http://aniruddhafriend-samirsinh.com/2013/03/30/आचरणातून-संदेश-बापू

Indeed Bapu is BESTEST at whatever He does. Hats off!!!

Saturday, June 29, 2013

दिल्याशिवाय मिळत नाही - ऑनलाईन ब्लड बॅक्स्‌

An important article not to be missed. This article describes working of various online blood banks and their services which can be availed by us during various medical emergencies. These blood banks not just help us to receive blood donations but also assist us to make the noble and pious task of donation of blood. Shree Aniruddha Upasana Foundation has also been organizing Blood Donation   Camps with inspiration of Sadguru Aniruddha Bapu every year on a mammoth scale. Kindly find the article as under which had appeared in the issue of Pratyaksha dated 21st January 2011.दिल्याशिवाय मिळत नाही

- मिहिर नगरकर

काही दिवसांपूर्वी एक किस्सा ऐकला. एका मित्राच्या काकांना कोणत्यातरी महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात दाखल करावे लागले. शस्त्रक्रियाही लगेच म्हणजे काही तासात करायची होती. शस्त्रक्रियेसाठी त्यांना रक्ताची तत्काळ गरज होती. ज्या इस्पितळात त्यांना दाखल केले होते त्या इस्पितळाने सरळ सांगितले, ‘ह्यांच्या रक्ताची सोय तुम्हीच करा. तुम्ही आम्हाला एक बाटली रक्त दिलेत तरच आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात एक बाटली रक्त देऊ शकतो’. हा व्यावहारिकपणा जो आपतकाळी अमानवी वाटतो हा सध्या वारंवार अनेक इस्पितळात अनेक रुग्ण व त्यांच्या गरजू आप्तांना अनुभवायला मिळतो. असे उत्तर मिळाले की त्या रुग्णाच्या नातेवाईकांची पूर्ण तारांबळ उडते.

सर्वात पहिला पडणारा प्रश्‍न म्हणजे माझ्या परिचयातील रक्तदाते कोण असतील व ते आत्ता रक्त देण्यासाठी पात्र असतील का? त्यानंतर सर्वात मोठा प्रश्‍न हा असतो की आपल्याला गरज असणार्‍या विशिष्ट रक्तगटाचे माझ्या परिचयात कोण असतील? आणि मग सुरू होते फोनाफोनी व धावाधाव. समजा अशा वेळेस जर आपल्याकडे अशा लोकांची यादी असेल ज्यात रक्त देण्यासाठी पात्र व इच्छुक लोकांची, त्यांच्या रक्तगटाची व संपर्क क्रमांकाची संपूर्ण माहिती असेल तर? समजा जर अशी सोय उपलब्ध असेल तर आपल्या डोक्याचा तणाव, ताप व त्रास नक्कीच कमी होईल.

शिवाय अनेक लोकांची रक्तदान करण्याची इच्छा असूनदेखील ते रक्तदान करू शकत नाहीत, कारण रक्तदान करण्याच्या जागांचे नसलेले ज्ञान व इस्पितळे व रक्तपेढ्यांशी नसलेला संपर्क व तेथील वातावरणाबाबत वाटणारी भीती. या कारणांपायी जवळ-जवळ ९०टक्के भावी रक्तदाते, हे रक्त देण्याच्या अगोदरच मागे फिरताना आढळतात. 

www.bharatbloodbank.com, www.friendstosupport.org, www.indiabloodbank.com, ही काही अशीच संकेतस्थळे आहेत ज्यावर अनेक रक्तदाते रजिस्टर्ड (नोंदणीकृत) आहेत व ह्या रक्तदात्यांची संपूर्ण माहिती (उदा. नाव, फोन नंबर, रक्तगट, शेवटचे रक्त दिल्याची नोंदणी) आपल्याला मोफत उपलब्ध आहे. या संकेत स्थळांच्या व्यतिरिक्त ही काही संकेतस्थळे उपलब्ध आहेत पण वर उल्लेखिलेली संकेतस्थळे वापरण्यास अगदी सामान्य माणसालाही सोपी आहे.

रुग्णांसाठी ऑनलाईन रक्तपेढी :

या सर्व साईट्सचा  प्राथमिक उपयोग हा रक्ताची गरज असणार्‍या रुग्णांसाठी त्वरित रक्ताची सोय करणे हा आहे. त्यासाठी या साईट्सवर अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे रक्तदात्यांची यादी, त्यांची नावं, संपर्क क्रमांक, रक्तगट, लिंग, इत्यादिंसह असते. ही यादी मिळविताना आपल्या सोयीसाठी या साईट्सवर (फिल्टर्स) उपलब्ध आहेत ज्यामुळे आपला शोध सोपा होतो. 

उदा. समजा कोणत्या एका व्यक्तीला 'O +ve’ रक्ताची आवश्यकता आहे. तो रुग्ण ‘मुंबईत’ ‘अंधेरीला’, राहत असेल. तर अशा रुग्णासाठी रक्तदाता शोधताना आपण रक्तगटामध्ये 'O +ve’ निवडणार, नंतर भारतातील राज्यामध्ये ‘महाराष्ट्र’ निवडणार, त्यानंतर जिल्ह्यामध्ये ‘मुंबई-उपनगर’ निवडणार व शेवटी ‘अंधेरी’ निवडणार. हे सर्व फिल्टर्स आपण लावले की 'O +ve’ रक्तगटाच्या ‘महाराष्ट्रातील’ ‘मुंबई-उपनगराच्या’ ‘अंधेरी’ भागात राहणार्‍या सर्व रक्तदात्यांची यादी आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसेल.रक्तदात्यांची नोंदणी :

रक्तदाते म्हणून आपण जर या साईट्सवर नोंदणी करत असू तर आपल्याला आपला संपर्क क्रमांक, नाव व रक्तगट ही आपली वैयक्तिक माहिती ह्या साईट्सवर द्यावी लागते. त्यानंतर आपण या साईट्चे नोंदणीकृत रक्तदाते होतो. आपली ही वैयक्तिक माहिती सर्व जगाला दिसणार आहे ह्याचेही भान व तयारी आपण ठेवली पाहिजे कारण रक्ताची गरज असणार्‍याला (त्याच्या आप्तांना) ह्या साईट्सवर आपली ही माहिती ऑनलाईन दिसणे गरजेचे आहे (ज्यामुळे ते आपल्याशी त्वरित संपर्क करू शकतात). पण आपल्या ह्या वैयक्तिक माहिती देण्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर ती द्यायला आपली हरकत नसली पाहिजे. या साईट्वर रक्तदाते म्हणून आपले शारीरिक गुण व क्षमता काय व किती असली पाहिजे त्याची संपूर्ण यादी (चेकलिस्ट) असते. त्यामुळे आपण रक्त देण्यासाठी पात्र आहोत का नाही हे आपल्याला तिथल्या तिथे पडताळून बघता येते. रक्तदात्यांना त्यांची शारीरिक क्षमता सुधारण्यासाठी सल्लेही ह्या साईट्सवर आहेत. त्याशिवाय रक्तदानाबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि रक्त व रक्तदानाबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी या साईट्सवर धडे व ज्ञान आपल्यासाठी उपलब्ध आहे. समजा जर आपण रक्तदाता म्हणून या साईट्सवर नोंदणी केली आहे पण आपल्याला कोणत्याही कारणाने (शारीरिक किंवा इतर) काही काळासाठी रक्त देण्यास मनाई असेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर आपण तसे लॉगिन करून या साईट्सवर सूचित करू शकतो. अशी सूचना दिल्यावर आपण पुन्हा होकारार्थी सूचना देईपर्यंत ह्या साईट्सवरून आपले नाव प्रदर्शित केले जाणार नाही. त्याशिवाय आपण एकदा रक्तदान केले की पुढच्या ३ महिन्यांसाठी आपोआप, या साईटसवरच्या यादीतून आपले नाव काढले जाते (दोन रक्तदानांमधील किमान अंतर ३ महिन्यांचे असावे) व ३ महिन्यांनंतर  आपोआप जोडलेही जाते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती माझी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रक्तदान केलेच पाहिजे. असे म्हणतात की ‘दिल्याशिवाय मिळत नाही’. त्यामुळे बांधीलकी वगैरे जड-जड शब्दांचा वापर न करता आपण जर एवढाच विचार जरी केला की आज जर मी दुसर्‍याला मदत केली तरच उद्या कधी माझ्या एखाद्या जवळच्या आप्ताला रक्ताची गरज भासली तरच तो दुसरा धावून येईल.या साईट्सचे इतर काही फिचर्स :

भारतब्लडबँक.कॉम व  इंडियाब्लडबँक.कॉमवरून आपण आपल्या इतर परिचितांनाही रेफरंस ईमेल पाठवून त्यांना रक्तदानाकरिता उत्तेजित करू शकतो. या साईट्सवर आपल्या रक्ताचा दर्जा सुधारण्यासाठीची माहिती व युक्त्यांची यादी दिलेली आहे.  जर आपल्याला रक्तदानाच्या पवित्र कामात स्वयंसेवक (वॉलेंटियर) म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर फ्रेंड्सटूसपोर्ट.ऑर्ग वर आपण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकतो.

इंडियाब्लडबँक.कॉम व भारतब्लडबँक.कॉम या साईट्सवर भारतातील २४० रक्तपेढ्यांची यादी आहे. ह्या यादीत आपण विशिष्ट राज्य व शहरांमधील रक्तपेढ्यांची माहितीही शोधू शकतो. या यादीत असणार्‍या रक्तपेढ्यांची सर्व माहिती (नाव, संपर्क करण्यासाठीची व्यक्ती, संपर्क माहिती, पत्ता इत्यादि) या साईट्वर उपलब्ध आहे. जर आपल्याला आपली किंवा आपल्या माहितीतील रक्तपेढी या यादीत समाविष्ट करायची असेल तर तेही आपण करू शकतो.त्याशिवाय रक्तदाता म्हणून मला आलेले अनुभव किंवा मिळालेली संतुष्टता, ह्याचे कथनही आपण या साईट्सवर करु शकतो जे वाचून इतर लोक रक्तदानासाठी उत्तेजित होऊ शकतात.ऑनलाईन आयबँक :

भारतब्लडबँक.कॉमचीच अजून एक साईट आहे. www.bharateyebank.org. या साईट्वर आपण नेत्रदाता (आयडोनर) म्हणून आपली नोंदणी करू शकतो. ह्यासाठी या साईट्वर आपल्याला मोफत नोंदणी करता येते. ही नोंदणी केली की आपल्याला ह्या साईट्कडून ‘आय प्लेज कार्ड’ दिले जाते. या काडार्र्चा उपयोग करून आपण आपल्या पश्‍चात आपल्या डोळ्यांचे दान करण्याची सूचना व सोय करुन ठेवू शकतो. भारतआयबँक.ऑर्ग सारखेच www.sankaraeye.com  www.rajaneyecare.com ह्या दोन साईटसही आहेत ज्यावरसुद्धा आपण नेत्रदाता म्हणून नोंदणी करू शकतो. कमालीची गोष्ट म्हणजे www.rajaneyecare.com ह्या साईट्वर डोळ्याच्या रुग्णांना डॉक्टरांचा मोफत ऑनलाईन सल्लाही मिळतो. भारतात दर वर्षी किमान ९० लाख रक्ताच्या बाटल्यांची आवश्यकता असते व त्या गरजेतील ३३ टक्के गरज अपूर्णच राहते. आपण प्रार्थना करूया की आपल्या कोणत्याही आप्ताला त्याच्या गरजेच्या वेळेस रक्ताच्या तुटवड्यामुळे यातना व त्रास सोसावा लागू नये. पण समजा तसे झालेच तर? अशाच वेळेस ‘दिल्या शिवाय मिळत नाही’ हा सिद्धांत आठवतो. पवित्र ग्रथांमध्ये रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचा उल्लेख सापडतो. त्याशिवाय परमात्म्यानेही ‘एका माणसाने दुसर्‍या माणसासाठी केलेल्या रक्ताच्या थेंबाचे दान मला अधिक प्रिय आहे’ असा उल्लेख ग्रंथांमध्ये केला आहेच. तर मग रक्तदानासाठी तयार आहात ना?