Saturday, February 23, 2013

शैक्षणिक संकेतस्थळे

I was extremely fortunate the attend a seminar on 'Online Learning' which was brainchild of and moderated by Sadguru Bapu. During the seminar, He stressed on the importance of we adopting to online education system and benefits of it. He made a very specific reference to few sites out of which http://nptel.iitm.ac.in was one of them. NPTEL provides us with extremely informative video tutorials of professors from IITs. The tutorials are from various branches of education viz., management, engineering, etc.  

In line with this I am publishing my fifth article of my series in daily Pratyaksha that was on the free educational sites and portals. This article was published on 17th December 2010. We are going to see www.excellup.com, http://mycbseguide.com, www.minglebox.com and http://nptel.iitm.ac.in. These are some of the best online educational sites. Read the full article as under:शैक्षणिक संकेतस्थळे

काही दशकांपूर्वी मुले शाळेला पाट्या घेऊन जात असत. त्यावेळेस शिक्षक जे शिकवायचे ते मुलांना पाट्यांवरच लिहून घ्यावं लागायच कारण त्यावेळेस वह्या व पुस्तके मिळत ही नसत व सामान्यांना परवडण्याजोगीही नसत. त्यानंतर वह्या व पुस्तकांचा जमाना आला व पाट्या कालबाह्य झाल्या. वहीला इंग्रजी मध्ये ’नोटबूक’ म्हणतात हे तर आपल्याला माहित आहेच. पूर्वी मुलं ज्या वयात वह्या वापरायची त्या वयातील आत्ताच्या शाळकरी मुलांना जर आपण नोटबूकबद्दल विचारलत तर ते नक्‍कीच समजतील की तुम्ही त्यांना लॅपटॉपबद्दल विचारत आहात, कारण छोट्या लॅपटॉपला नोटबूक म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे अशा या जमान्यात ज्यात शाळा-कॉलेजातील शिक्षणही आता इंटरनेटआधारित होत चालले आहे, आपल्याला म्हणजेच फक्त सर्व विद्यार्थ्यानाच नव्हे तर पालकांनाही ह्या इंटरनेट व त्यावरील संकेतस्थळे (वेबसाइटस्) आणि त्याचा शिक्षणात होणारा उपयोग जाणून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते व आजच्या ह्या लेखातून आपण हेच जाणून घेणार आहोत. 

http://mycbseguide.com, www.excellup.com, www.minglebox.com, http://nptel.iitm.ac.in, ह्या अशाच काही वेबसाइटस् ज्या आपल्याला ’मोफत’ वापरायला मिळतात. ह्या विविध साइटस्चा उपयोग सी.बी.एस.ई. बोर्डाच्या ८वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांना तसेच, आय.आय.टी-जे.ई.ई., ए.आय.ई.ई.ई., बी.आय.टी.एस.ए.टी. (बिटसॅट), सी.ई.टी.-के, ई.ए.एम.सी.ई.टी., एम.टी.-सी.ई.टी., गेट, वि.ई.टी.ई.ई.ई. या अभियांत्रिकी (इंजिनीयरींग) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षांच्या परिक्षार्थीं व एम्स्, ए.आय.पी.एम.टी., सी.ई.टी. - के, एम.एच.टी. - सी.ई.टी., गुज-सी.ई.टी. या वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षांच्या परिक्षार्थीं. शिवाय कॅट, झॅटस्‍नॅ, मॅट, महा-सी.ई.टी., इबसॅट, एफ.एम.एस., आय.आय.एफ.टी., एन-मॅट, जे-एम.ई.टी. या व्यवस्थापन (मॅनेजमेंट) अभ्यासक्रमाच्या परिक्षार्थींना, आणि जी.आर.ई., जी.मॅट, टॉफेल, आय.ई.एल.टी.एस., एल.सॅट, या परदेशात शिक्षण घेण्यासाठी असणार्‍या प्रवेश परिक्षांच्या परिक्षार्थींना भरपूर फायदा होऊ शकतो. त्याशिवाय भारतीय लोक सेवा आयोग म्हणजेच यु.पी.एस.सी च्या परीक्षा, उदा: सी.डी.एस., सी.एस.ई., आय.ई.एस., आय.एफ.एस., एन.डी.ए. / एन.ए.) व सर्व बँकांच्या व सरकारी संस्था व आस्थापनांच्या प्रवेश परीक्षांच्या परिक्षार्थींनाही यातील काही साईटसचा भरपूर फायदा होऊ शकतो.

सी.बी.एस.ई बोर्डाच्या शिक्षण अभ्यासक्रमासाठी
www.excellup.comhttp://mycbseguide.com या साईटस् सी.बी.एस.ई बोर्डाच्या ८वी ते १२वी च्या विद्यार्थ्याना अत्यंत उपयोगाच्या आहेत. मायसीबीएसई साइट वर दर वर्षीचा ९वी ते १२वी चा प्रत्येक इयत्तेतील, प्रत्येक विषयाचा अधिकृत अभ्यासक्रम (सिलॅबस) अपलोड (प्रकाशित) केलेला असतो. त्यामुळॆ विद्यार्थ्यांचा काही वेळेस होणारा अभ्यासक्रमाबद्दलचा  गोंधळ कमी होण्यास नक्‍कीच मदत होते. त्याच बरोबर मायसीबीएसई एक्सएलअप या साइटस् वर ८वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाशी निगडीत नोट्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय नियमित गृहपाठासाठी एक्सएलअप  वर असाइनमेंटस् ही उपलब्ध आहेत. मायसीबीएसई वर महत्त्वाच्या प्रश्‍नांचा संचयही आहे. आपण जे आपल्या डोळ्यांनी बघतो ते आपल्याला लवकर लक्षात येते. म्हणूनच एक्सएलअप वर समजण्यासाठी जटील अशा विषयांचे विडियोज् उदाहरणार्थ: हृदयक्रिया, पाचनप्रणाली, वरनियर कॉलिपर्सचा वापर, प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसीस), इत्यादीवर उपलब्ध आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायसीबीएसई एक्सएलअप या दोन्ही साइट्सवर प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विषयांच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकांचे नमुने व मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका ही उपलब्ध आहेत ज्या आपण डाऊनलोड करु शकतो.

शिवाय शाळांशी निगडीत बातम्या, सामान्या ज्ञानाच्या चाचण्या, प्रश्‍नपत्रिका सोडविण्याच्या युक्ती, परीक्षांचे निकाल, विविध व्यवसायांबद्दल व नोकर्‍यांबद्दलची माहिती (करिअरच्या पर्यायांची माहिती) ह्या साइटस् वर आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्याशिवाय फक्त आपले नाव व ईमेल आय.डी. या संकेतस्थळांना दिले की आपल्याला त्यांच्या कडून नियमित मोफत समाचारपत्र (न्यूजलेटरस्) पाठविले जाते ज्यामध्ये परीक्षांच्या व दाखल्यांच्या (ऍडमिशनच्या) आगाऊ सूचना, शिष्यवृत्तींची सूचना व माहिती असते.

अभियांत्रिकी, वैद्यकिय, व्यवस्थापन आणि परदेशी शिक्षण अभ्यासक्रमासाठी
www.minglebox.com ही ह्या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी सर्वात उपयुक्त साईट आहे. मिंगलबॉक्स वर भारतातील ५००० शैक्षणिक संस्थांची यादी त्यांचा इतिवृत्त (प्रोफाइल), तेथे उपलब्ध असणार्‍या सुविधा, तेथील विविध शैक्षणिक अभ्यासक्रम व ते शिकविणार्‍या प्राध्यापकांची माहिती, तेथील नोकरभरतीची (प्लेसमेंटस्) माहिती, शेवटच्या तुकडीतील विद्यार्थ्यां पैकी सर्वात जास्त पगार (पॅकेज) मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची नावे व त्यांचे पॅकेज व ते पॅकेज देणार्‍या कंपनीचे नाव, त्या संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची त्या संस्थेबद्दलची मते, त्या संस्थेच्या आवाराची (कॅम्पसची) छायाचित्रे व विडियोज्, त्या संस्थांचा गुणानूक्रम (रॅंक) इत्यादी आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिंगलबॉक्स वर आपल्याला या सर्व अभ्यासक्रमांच्या नमुना परीक्षा (मॉक टेस्टस्) देता येतात. त्यामुळे परीक्षाची रंगीत तालिम करण्याचे ही अत्यंत उपयुक्त साधन आहे. या मॉक टेस्टस्मध्ये आपण आपल्याला सोडविता न आलेल्या प्रश्‍नांना बूकमार्क करु शकतो ज्यामुळे आपल्याला त्या प्रश्‍नांचा परीक्षा संपल्या नंतर ही विषेश अभ्यास करता येतो. या परीक्षा ज्यावेळेस आपण ऑनलाईन देतो त्यावेळेस आपल्याला त्याचा निकालही परीक्षा संपल्यावर लगेचच मिळतो.

मिंगलबॉक्स वर प्रत्येक अभ्यासक्रमांच्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाशी निगडीत नोट्स उपलब्ध आहेत ज्या आपण डाउनलोड करु शकतो. शिवाय या साईटवर शिक्षण तज्ञांच्या प्रोफाईलस् असतात. त्या बघून आपण त्यातील तज्ञांची निवड करुन त्यांच्याशी व येथील इतर नेटकरांबरोबर विचार-विनिमय (फोरम डिस्कशन) करु शकतो. याच तज्ञांकडून आपल्याला ह्या परीक्षांच्या वेळेला होणार्‍या मुलाखत व सांघीक चर्चा (ग्रुप डिस्कशन) बद्दल मार्गदर्शन ही मिळू शकते.

त्याशिवाय फक्त आपले नाव व ईमेल आय.डी. या संकेतस्थळांना दिले की आपल्याला त्यांच्या कडून नियमित मोफत समाचारपत्र (न्यूजलेटरस्) पाठविले जाते ज्यामध्ये परीक्षांच्या व दाखल्यांच्या (अ‍ॅडमिशनच्या) आगाऊ सूचना, शिष्यवृत्तींच्या सूचना व माहिती असते. मिंगलबॉक्स वर आपल्याला ह्या सर्व परीक्षांचे निकाल ही थेट कळतात. इतर पदवी परीक्षांपैकी विज्ञान, वाणिज्य व कला या शाखांमधिल वैमानिकशास्‍त्र, जीवतंत्रशास्‍त्र (बायोटेक्नोलॉजी), वैद्यकिय संशोधन, बी.सी.ए. / एम.सी.ए., हार्डवेअर, सॉफ्टवेअर, बी.बी.ए / बी.बी.एम, हॉटेल व्यवस्थापन, बँका व अर्थशास्‍त्र, प्रसारमाध्यम, रिटेल, प्रवास व्यवस्थापन, कॉलसेंटर प्रशिक्षण, अ‍ॅनिमेशन, फॅशन डिझाइन, व इतर बाह्य शिक्षण अभ्यासक्रम शिकविणार्‍या संस्था व विद्यापीठांची नावं, पत्ते, संर्पक व त्या संस्थेबद्दलचा इतिवृत्त (प्रोफाइल) मिंगलबॉक्स वर आपल्याला मिळतो.

http://nptel.iitm.ac.in या  साइटवर आपल्याला १० विषयांमधील उदा: स्थापत्यशास्‍त्र (सिव्हील इंजिनीयरींग), संगणकशास्‍त्र, विद्युतशास्‍त्र (इलेक्ट्रीकल इंजिनीयरींग), इलेक्ट्रोनिक्स व संर्पकशास्‍त्र, यांत्रिकशास्‍त्र (मेकॅनिकल इंजिनीयरींग), समुद्रशास्‍त्र, खाणशास्‍त्र (माइनिंग इंजिनीयरींग), व धातुशास्‍त्र (मेटालर्जी), जीवतंत्रशास्‍त्र (बायोटेक्नोलॉजी),  व्यवस्थापन, इत्यादी मधिल जवळ-जवळ ३५ उप-विषयांचे विडियोज् उपलब्ध आहेत ज्यात आय.आय.टी. च्या प्राध्यापकांचे शिकवणी वर्ग (लेक्चर्स) व उदाहरणांसहित स्पष्टीकरणं आहेत. 

Saturday, February 16, 2013

उद्योग-व्यापाराची संकेतस्थळे


Today being Saturday and as promised I am publishing fourth article of my series in daily Pratyaksha that is on the business portals. This article was published on 10th December 2010.

We are going to see www.indiamart.com and www.justdial.com that are one of the leading online portals' for having an online presence of our business. Read the full article as under:

उद्योग-व्यापाराची संकेतस्थळे


मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरॅक ओबामा भारताच्या दौर्‍यावर आले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांची भारतभेट नुकतीच संपली. चीनचे पंतप्रधान वेन जिअबाओ लवकरच भारतभेटीवर येणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदव्हेदेव्ह देखील डिसेंबर महिन्यात भारताचा दौरा करतील.

जगातल्याया प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांच भारत हे पर्यटन स्थळ बनतय की काय, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. पण भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरु असताना या राष्ट्रप्रमुखांना भारतात येणं भाग पडत आहे. भारताचा विकास जगाच्या आकर्षणाचा विषय बनलेला असतानाच, शक्यतितका भारताच्या प्रगतीचा आपण ही फायदा करुन घ्यावा, यासाठी मोठ्या देशांमध्ये स्पर्धा सुरु आहे. म्हणूनच आपण भारतीयांनीही आपल्या देशाच्या प्रगतीचा पुरेपूर लाभ करुन घ्यायला हवा. या कामी मागे राहता उपयोग नाही.

साधारणपणे बिझनेस किंवा उद्योग वगैरे हे शब्द कानावर पडले की आपल्यासमोर हजातो कोटींचे प्रकल्प किंवा बड्या कंपन्या उभ्या राहतात. पण आपल्या देशात लघुउद्योग किंवा छोट्या छोट्या उद्योगांचीही संख्या लक्षणीय आहे. असे छोटे उद्योग आपल्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान देत असतात. या उद्योगांना चालना मिळण्यासाठी इंटरनेट हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरू शकतं. कसं, ते आपण काही व्यापाराभिमुख संकेतस्थळांचा (Business Portals) आढावा घेऊन पाहू शकतो.

ही अशीच काही व्यापाराभिमुख संकेतस्थळे पण, आपण आज खास अभ्यासणार आहोत ते www.indiamart.com www.justdial.com  ही दोन संकेतस्थळे. या संकेतस्थळांचा उत्पादक, वितरक व ग्राहक हे सर्वच फायदा घेऊ शकतात.

कोणती एक व्यक्ति असो की छोटे किंवा मोठे उद्योग असोत, आज ह्या एकविसाव्या शतकात इंटरनेटवरील आपली व्हर्चुअल ओळख (identity) सकारात्मकरित्या अख्ख्या जगा समोर मांडण्याचे व त्यातून फायदा मिळविण्याचे अत्यंत उपयोगी साधन झाले आहे. त्यासाठीच संकेतस्थळांचा उपयोग केला जातो. पण एक व्यावसायिक संकेतस्थळ असणे हे सगळ्याच उद्योजकांना परवडण्याजोगे नाही. येथे ह्या उद्योजकांना इंडियामार्ट या संकेतस्थळाचा उपयोग करता येऊ शकतो. इंडियामार्ट वर कोणीही व्यक्त्ति, संस्था अथवा उद्योग आपल्या सेवांची / उत्पादनांची यादी, भाव, प्रकार, इत्यादी प्रकाशित करुन त्यांच्याबद्दल तपशीलही देऊ शकतात. त्या शिवाय आपला उद्योग, कंपनीबद्दलची माहिती, आपला संर्पक क्रमांक व पत्ता, आपल्या उद्योगाच्या, सेवांची, उत्पादनांची खासीयत, इत्यादी बाबींचा उल्लेख एका संकेतस्थळ सदृश्य वेब पेज बनवून त्यावर करता येतो व ते ही कोणत्याही तंत्रज्ञाच्या मदती शिवाय. सर्वात मुख्य म्हणजे हे सर्व फायदे आपल्याला अगदी मोफत घेता येतात. त्याशिवाया इंडियामार्ट अगदी वाजवी किंमतीत आपल्याला आपले स्वत:चे संकेतस्थळही विकसित करुन देते ज्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या प्रतिनिधींशी संर्पक साधावा लागतो. ह्या वेब पेज / संकेतस्थळ बनविण्याच्या प्रक्रियेत जर आपण आपल्या व्यवसायाशी निगडीत विशिष्ट शब्दांचा (Key Words) अचूक उपयोग केला तर ग्राहकांच्या या संकेतस्थळावरील शोधामध्ये (Search) आपल्या कंपनीची, सेवांची, उत्पादनांची माहिती त्या ग्राहकाला लगेच मिळू शकते व त्याचबरोबर त्याच वेबपेजवर आपल्या कंपनीच्या संर्पकाची माहितीही असल्यामुळे हा भावी ग्राहक आपल्याला संर्पक करण्याची शक्यता निर्माण होऊन त्याला आपल्याला मिळवता येऊ शकतात. ग्राहक म्हणून आपण ह्याच्या संकेतस्थळावर विशिष्ट शब्द वापरुन (Filters) आपल्याला हव्या असणार्‍या सेवेबद्दल किंवा उत्पादनाबद्दल, आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील (Area) उत्पादक / वितरकांची यादी प्राप्त करुन घेऊ शकतो.

या संकेतस्थळावर आपल्याला जरी आपले अगदी संकेतस्थळ सदृश्य वेबपेज बनवता येत नसले तरी आपल्या उद्योग, कंपनीबद्दलची माहिती, आपला संर्पक क्रमांक व पत्ता, आपल्या उद्योगाच्या, सेवांची, उत्पादनांची खासियत, इत्यादी बाबींचा उल्लेख असणारे वेबपेज आपल्याला येथे मोफत तयार करता येतो. त्याशिवाय जस्ट-डायलची आपली स्वत:ची कॉल सेंटरस् भारताच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये आहेत. येथे दूरध्वनी करुन आपण आपल्याला हव्या असणार्‍या कोणत्याही सेवेबद्दल किंवा उत्पादनाबद्दल विचारणा करु शकतो. त्याचबरोबर त्यांच्या संकेतस्थळावरही ही सर्व माहिती उपलब्ध असतेच. ग्राहक म्हणून आपण ह्या संकेतस्थळावर विशिष्ठ शब्द वापरुन (Filters Keywords) आपल्याला हव्या असणार्‍या सेवेबद्दल किंवा उत्पादनाबद्दल, आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील (Area) उत्पादक / वितरकांची यादी प्राप्त करुन घेऊ शकतो.

आता ग्राहक म्हणून केलेला आपला दूरध्वनी किंवा संकेतस्थळावर केलेला शोध ह्या मुळे जस्ट-डायलकडे आपल्याला काय हवे आहे त्याची माहिती असते. त्याच वेळेला जस्ट-डायल कडे त्या सेवा / उत्पादने पुरविणार्‍या, आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील उत्पादक / वितरकांची यादी ही असते. उदा: माझा संगणक खराब झाला आहे त्यामुळे मला तो दुरुस्त करुन घ्यावा लागणार आहे. आता समजा मी मुंबईमध्ये खार (पश्‍चिम) येथे राहतो, तर मी ज्या वेळेस ह्या संकेतस्थळाचा वापर करेन त्यावेळेस मी संगणक यंत्रज्ञ (मेकॅनिक), मुंबई व खार (पश्‍चिम) ह्या विशिष्ठ शब्दांचा (Keywords) उपयोग केला की माझा समोरिल स्क्रिनवर मुंबईतील खार (पश्‍चिम) विभागात असणार्‍या व जस्ट-डायलवर नोंद असणार्‍या सर्व संगणक यंत्रज्ञांची (मेकॅनिकस्) यादी प्रकाशित होईल. त्यावरुन मी स्वत:च त्यांना संर्पक करु शकतो किंवा जस्ट-डायलकडून त्यांना माझा संर्पक क्रमांक मिळाला असल्यामुळे मी जस्ट-डायलला दूरध्वनी केल्याच्या काही क्षणातच त्या सर्व संगणक यंत्रज्ञांचे (मेकॅनिकस्) दूरध्वनी मला येऊ लागतात.

ह्या अशा लिडस् जस्ट-डायल त्या उत्पादक / वितरकांना विकते. या लिडस्‌चा सहा महिने किंवा त्याहून कमी कालावधी चे प्रस्ताव (ऑफरस्) असतात जे उत्पादक / वितरक विकत घेऊ शकतात. ह्या प्रस्तावांमध्ये उत्पादक / वितरकांनी जस्ट-डायल बरोबर ठरविलेल्या भावाला लिडस्‌ची विशिष्ठ संख्या दिली जाते. ह्यामुळेच ग्राहकालाही जे हवे ते वेळेत मिळते व उत्पादक / वितरकांनाही त्यांचा धंदा वाढविण्याची संधी मिळते. पण या लिडस्चा भाव मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो व जो सर्वात जास्त किंमत देईल त्याला सर्वात पहिल्यांदा लिड पुरवली जाते व त्याच्या वेब पेजला ही सर्व शोधांच्या यादीत (search results and associated listing) पहिले स्थान दिले जाते. जस्ट-डायलने सध्या त्यांच्या कॉल सेंटरस् वर एक नवीन सुविधाही सुरु केली आहे ज्याच्या मध्ये आपण त्यांना महिती विचारण्यासाठी केलेला दूरध्वनीच ते थेट आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील उत्पादक / वितरकांना लावून देऊ शकतात.

माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या कौशल्याने केला तर आपला उद्योग अधिक वेगाने प्रगती करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे फार मोठे भांडवल असण्याचीही आवश्यकता उरलेली नाही फक्त बदलत्या जगाच्या गरजा पुरविण्याची क्षमता आपल्याकडे असणे आणि त्या आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, हीच आजच्या काळातील सर्वात मोठी बाब ठरते. अशा परिस्थितीवर दिलेल्या बिझनेस पोर्टल्स्‌चं महत्त्व अतिशय वाढलं आहे. त्याचा अचूकपणे वापर करणारे अल्पावधित आपल्या व्यवसायाची घोडदौड सुरू करु शकतात, अगदी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थे सारखी.

Saturday, February 9, 2013

ग्राहकराजाचा दरबार www.compareindia.in.com


I am publishing third article of my series in daily Pratyaksha that was published on the www.compareindia.in.com. This article was published on 3rd December 2010. Compareindia is one of the leading online portal's for purchase of many things from mobiles to computers, computer accessories to home appliances, electronic gadgets to automotives, lifestyle products and many more. Read the full article as under: 

ग्राहकराजाचा दरबार www.compareindia.in.com

- मिहिर नगरकर

दुकानात गेलो. एकच भाव आणि पर्याय नसलेली वस्तु खरेदी केली आणि बाहेर आलो. असली खरेदी तुम्हाला आवडेल का? अजिबात नाही. खरेदीला बाहेर पडल्यानंतर आपली नजर शोधत असते ते सर्वोत्‍तम पर्याय आणि सर्वोत्‍तम किंमत. त्यासाठी दहा दुकानं आणि ठिकाणं फिरण्याचे कष्ट उपसायला आपल्याला काही वाटन नाही. एवढं सगळं करुन आपल्या मनाजोगती वस्तू माफक दरात मिळाली की ते समाधान हाहाहा!

Image published in dainik Pratyaksha

हाकी इंटरनेटवरील संकेतस्थळे अर्थात वेबसाईटस्‌ हे दहा दुकानं व ठिकाणं फिरण्याचे कष्ट वाचवू शकतात. आजच्या धावपळीच्या काळात त्याची मोठी गरज देखील आहे. तेव्हा अनेक पर्याय एकाच वेळी पाहण्यासाठी त्यांची सखोल माहिती मिळविण्यासाठी आता लॉगीन कराच. आजच्या या लेखात आपण त्याचीच माहिती घेणार आहोत.

www.compareindia.in.com हे अनेक प्रॉडक्टची माहिती देणारं आणि त्याची तुलना करणारं महत्त्वाचं संकेतस्थळ. ह्या संकेतस्थळाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे संकेतस्थळ वापरुन, उत्पादनांची तुलना केल्या नंतर, ह्या संकेतस्थळावरुन आपल्याला एक रिसीट मिळते. ती दाखवली की संकेतस्थळाशी संलग्न असणार्‍या वितरक दुकानात दिल्यावर त्याच्यावर आपल्याला घसघशीत म्हणजे २% ते ३५% सूट मिळते. त्यासाठी या संकेतस्थळाची सदस्यता स्विकारण्याचीही गरज नाही. ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल्स, संगणक, घरगूती उपकरणे, एक्सेसरीज, यांचा समावेश आहे.

आता या compareindia बद्दल देखील अधिक माहिती घेऊ. हे नेटवर्क१८ (Network18) या भारतातील अग्रगण्य मीडिया समूहाच्या मालकीचे संकेतस्थळ आहे. प्रख्यात टी. व्ही. चॅनल सीएनबीसी१८ आणि सीएनबीसी आवाज ही ह्या नेटवर्क१८ समूहाच्याच मालकीच्याच वाहिन्या आहेत. त्याशिवाय इंटरनेटवर आधारित माहिती आणि व्यवहार सेवा पूरवणारी वेब१८ ही कंपनी ही नेटवर्क१८च्याच मालकीची आहे.

या संकेतस्थळावर उत्पादनाची तुलना करताना आपल्याला सर्वप्रथम उत्पादनांची श्रेणी निवडावी लागते. त्यानंतर तुलना करण्यासाठी आपल्याला चार पर्याय दिले जातात
१) ब्रॅडं आणि कंपनीचे नाव
२) आपलं बजेट
३) त्या उत्पादनात हवे असलेले फिचर्स
४) हवे असतील तर अधिक काही फिचर्स.
ह्यातील कोणत्याही एका किंवा चारही पर्यायांची आपण जसजशी निवड करत जातो तस-तसे त्याच पानावर खाली योग्य ती उत्पादने डॅशबोर्डच्या पध्दतेने त्यांची छायाचित्रे, या संकेतस्थळावरची त्याची किंमत व बाजारभावासहित प्रर्दशित केली जाते उदा. जर आपण संगणकाच्या दोन किंवा तीन ब्रॅड्सची तुलना करत असू तर त्या संगणकांच्या सर्व गुणधर्मांची पूर्ण यादी उदा. रॅंम, हार्ड डिस्क, वीडियो कार्ड, सुरक्षा, ऑपरेटिंग सिस्टम, बँटरी, विक्री पश्चात सेवा, इत्यादी आपल्या समोर डॅशबोर्ड पद्धतीने प्रर्दशित होते. त्यानंतर त्या उत्पादनाच्या छायाचित्रांवर क्लिक केले की आपल्याला त्या उत्पादनाच्या गुणधर्मांची पूर्ण यादी व इथ्यंभूत माहिती मिळते. ह्याच पानावर आपल्याला त्या उत्पादन विकणार्‍या मूळ कंपनीची माहिती ही मिळू शकते. तसचं आपल्याला त्या उत्पादनाबद्दल इतर ग्राहकांनी नोंदवलेली त्यांची मते ही वाचता येतात. या खेरीज आपल्याला त्या उत्पादनाची आपल्या राज्यातील व आपल्या शहरातील वितरकांबद्दल  माहिती (पत्ता, दूरध्वनी क्रमांक, संपर्कयोग्य माणसाचे नाव, इत्यादी) मिळते.

त्यानंतर आपल्याला एक रिसीट मिळते. तिची प्रिंट घेऊन आपण त्या वितरकाकडे गेलो की तो वितरक आपल्याला डिस्काऊंट देतो. ह्याचाच अर्थ असा की ह्या संकेतस्थळावर पेमेंटगेटवे नाही म्हणजेच ऑनलाईन भुगतान (पेमेंट) ची सोय उपलब्ध नाही. पण तरीही ग्राहक म्हणून आपल्याला काही बाबींची नोंद घेतली पाहिजे ती म्हणजे
१) हा डिस्काऊंट फक्त रोकड व्यवहारांवरच मिळतो. क्रेडिट कार्ड वर जर आपण खरेदी केली तर कदचित किमतीत फरक पडू शकतो. वाहतूकीचा खर्च अतिरीक्त भरावा लागतो.

ह्या गोष्ट ध्यानात घेतल्या, की या साईटमार्फत खरेदी करणं सोपं आणि किफायतशीर ठरतं. आपल्याला हव्या असलेल्या वस्तू आणि उपकरणांची लाबलचक यादी यावर मिळते आणि त्याची तुलना करण्याची संधी देखील. त्याचवेळी साईटवर सूचीबध्द केलेल्या उत्पादनांना वापरायच्या मार्गदर्शन पुस्तीका  संकेतस्थळावर आपण काणत्या उत्पादनांची तुलना व खरेदी करु शकतो ?

अगोदर म्हटल्या प्रमाणे ह्या संकेतस्थळावर एकूण ७ श्रेणींतील उत्पादने आपल्याला खरेदी करता येतात. ह्या मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल (भ्रमणध्वनी), संगणक, गाड्या, घरगूती उपकरणे (Home Appliances), जीवन-शैली उपकरणे (Lifestyle Appliances), एक्सेसरीज़, इत्यादी मोडतात. (प्रॉडक्ट युसेज गाईडस्) व मार्गदर्शक ध्वनिफिती(वीडियोस्) ही उपलब्ध आहेत. आपण या संकेतस्थळाच्या कॉलसेंटरला एस.एम.एस. (एस.एम.एस. वर शुल्क लागते, हा टोल-फ्री क्रमांक नाही)पाठवल्यावर आपल्याला या संकेतस्थळावरील नवीन उत्पादनांच्या अनावरणांबद्दल व कमी झालेल्या भावांबद्दल सूचना एस.एम.एस. द्वारेच मिळतात. त्याशिवाय फक्त आपले नाव व ईमेल आय.डी. या संकेतस्थळा दिले की आपल्याला त्यांच्या कडून नियमित मोफत समाचारपत्र (न्यूजलेटर्स) पाठवले जातात. ज्यामध्ये या संकेतस्थळावरील  नव्या उत्पादनांच्या झालेल्या व लवकरच होणार्‍या अनावरणांबद्दल, कमी झालेल्या भावांबद्दल, इत्यादी सूचना व माहिती असते. त्याशिवाय ही महिती या संकेतस्थळाच्या मुख पृष्ठावर (होम पेजवर) ही उपलब्ध असते. या संकेतस्थळावर आपल्याला विविध ग्राहक उपयोगी विषयांवर मतदान करता येते व इतरांची मते जाणताही येतात.

www.compareindia.in.com ह्या संकेतस्थळासारखेच www.tolmol.com हे ही एक उत्पादनांची खरेदीतूल्य तुलना करण्याचे उपयुक्त संकेतस्थळ आहे. त्याच बरोबर www.naaptol.com हे ही एक अत्यंत उपयुक्त संकेतस्थळ आहे. पण हे स्थळ वापरण्यांसाठी आपल्याला त्याची सदस्यता घ्यावी लागते जी मोफत आहे.

आताच्या काळात ग्राहकाचा उल्लेख ग्राहकराजा असा केला जातो. ह्या राजाचा दरबार आता इंटरनेटवर भरविला जाऊ लागलाय. त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर या साईटस्‌ना नक्की भेट द्या. पण खरेदी करताना अगदी राजासारखाच सूज्ञ व सम्योचित निर्णय घ्या म्हणजे झालं. 

Saturday, February 2, 2013

एक व्यावसायिक नेटवर्किंग मंच www.linkedin.com

I am publishing second article of my series in daily Pratyaksha that was published on the Linkedin. This article was published on 19th November 2010. Linkedin in one of the best social networking sites "only" for professionals to showcase their talent, network with personnel of similar interest, etc. Read the full article as under: 

एक व्यावसायिक नेटवर्किंग मंच www.linkedin.com

- मिहिर नगरकर


लिंक्डइन डॉट कॉम (linkedin.com) हा नावाप्रमाणेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना जोडणारा ऑनलाइन मंच (Portal) आहे. येथे आपला अकाउंट बनविणे विनामूल्य गूगल, याहू सारख्या -मेल अकाऊंट उघडण्याइतकेच सोपे आहे. लिंक्डइन डॉट कॉम (linkedin.com) हे जरी इतर ऑनलाइन मंचांसारखे (उदा. ऑर्कुट orkut.com वगैरे) वाटत असले, ज्यामधे असामाजिक घटकही कार्यरत असू शकतात, तरी असे असामाजिक घटक लिंक्डइनमध्ये कार्यन्वित असणे अवघड असते. कारण ह्या मधील नेटकरांच्या सर्व गतिविधिंवर मॉडरेटर्सचे बारकाईने लक्ष असते कोणताही अनुचित अनैतिक संदेश हा अर्ध्या ते एका तासात रद्द (डिलीट) केला जातो. शिवाय येथे अनैतिक संघ (Communities) किंवा ग्रुप्स बनविण्यावर ही अंकूष ठेवला जातो.

लिंक्डइनमध्ये आपण इतर लोकांना कनेक्शनस् म्हणून जोडू शकतो. प्रत्येकाने स्वतः बद्दल उपलब्ध (upload) केलेल्या सर्व व्यावसायिक बाबी (माहिती) आपल्याला (प्रोफाईलस् बघून) कळू शकतात. ही माहिती अनेकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरु शकते. सेल्स मार्केटिंग मधील मंडळीना ह्याचा उपयोग नक्कीच मोलाचा ठरू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, एखाद्या कंपनीला आपल्या प्रॉडक्टची माहिती दुसर्‍या कंपनीपर्यंत पोहोचवायची असेल तर.. त्यासाठी लिंक्डइन सारखा उत्तम मध्यम नाही. कारण इथे जर त्या कंपनीच्या अधिकार्‍यांचे प्रोफाईल असेल (सहसा ते असतेच) तर कुठल्या अधिकार्‍यांपर्यंत आपल्या प्रॉडक्टची माहिती पोहोचवायची, ते सहजपणे कळू शकतं. त्यामुळे काम सोपं होऊन जातं. म्हणूनच लिंक्डइन सेल्स् मार्केटींगमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आणि इतर क्षेत्रातील मंडळींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे नेटवर्कींग पोर्टल आहे. यातून होत असलेला लाभ पाहता, अनेक जणांना ह्याची आवश्यकता पटलेली आहे. म्हणूनच या नेटवर्कींग पोर्टलवर प्रोफाईल्स्नोंदविणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

प्रोफाईलस् म्हणजे ऑनलाइन बायो-डेटा. ह्या प्रोफाईलसमध्ये बायो-डेटात असणार्‍या सर्व बाबीं उदा. अनुभव, शिक्षण, आत्त्ताची जौब प्रोफ़ाईल, स्वतःतील विशिष्ठ चांगले गुण, मिळालेले सन्मान पुरस्कार, वैयक्तिक माहिती, Linkedin.com वर असण्याची कारणे (उदा. नोकरीचा शोध, बिझनेस लीड्स मिळविण्यासाठी , नविन संपर्कात नसलेल्यांशी संपर्कात राहण्यासाठी) इत्यादीं साठी वेगळे विभाग असतात.. Linkedin.com मध्ये व्यवसयिकांच्याच नव्हे तर कंपन्यांच्या प्रोफाईलस् ही करता येतात असतातही. त्यामुळे केवळ वैयक्तिक पातळीवर नाही तर कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये हे नेटवर्कींग पोर्टल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागले आहे.

Linkedin.com मध्ये शिफारस (Recommendations) करण्यासाठी स्विकारण्यासाठीही एक विभाग असतो. येथे आपण आपल्या सहकारी, वरिष्ठ कनिष्ठ सह-कर्मचारी मित्र ह्यांच्यासाठी शिफारशी करु स्विकारु शकता. ह्या शिफारशींचा आपल्यास भरपूर फायदा होऊ शकतो, खासकरुन नोकरी शोधताना. असे असण्याचे कारण म्हणजे, जर आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्या वरिष्ठांचे आपल्या बद्दलची चांगली शिफारस असेल तर नव्या ठिकाणच्या नोकरीतील बॉसला आपल्याबद्दल जास्त विश्‍वा वाटतो. शिफारस स्विकारणे किंवा नाकारणे आपल्या वर अवलंबून असते.

Linkedin.com मध्ये व्यावसायिक संघ (groups) ही असतात, उदा. डिफेन्स पर्सोनेल ग्रुप, मार्केटींग मॅनेजरस् ग्रुप, इत्त्यादी. ह्या संघामधील सभासद त्या क्षेत्राशी निगडित नवीन घडामोडी, विचार, पद्धती इत्यादी बद्दल विचार-विनिमय संभाषणे सतत करत राहतात. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्राशी निगडित संघाचे जर आपण सदस्यत्व घेतले तर आपल्याला त्या क्षेत्रातील वी घडामोडी कळण्यास, त्याच क्षेत्रातील इतर स्पर्धकांचा विचार, प्रतिक्रिया पद्धती जाणून घेण्यास मदत होते. हे सदस्यत्व आपणास मोफत मिळते. शिवाय या संभाषणांमधून आपल्याला मोलाच्या बिझनेस लीडस् , इतर प्रदेशामधील बिझनेस पार्टनरस् मिळविण्यासाठी ही उपयोग होतो. काही वेळेस तर लाखो-करोडोंचे व्यवहार Linkedin.com वरनं झाल्याच्या नोंदी आहेत.

या ठिकाणी दिलेली माहिती विश्‍वासहार्य असते का? असा प्रश्‍न आपल्याला पडू शकेल. स्पष्ट सांगायच तर यामध्ये तशी सोय नाही. पण अखाद्या अपरिचीताशी व्यवहार करताना आपण जी दक्षता आणि सावधगिरी बाळगतो तशी सावधानता बाळगली तर या व्यवहारात आपले नुकसान होण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही.

Linkedin.com मध्ये नोकर्‍यांसाठी एक वेगळा विभाग आहे. हल्ली नोकर्‍यांच्या पोर्टल्सने भाववाढ केली आहे उमेदवार नोंदणी वर ही शुल्क आकारत आहेत. त्यामुळे हल्ली नोकरी शोधणारेही ह्या पोर्टल्सवर नोंदणी करताना कमी प्रमाणात आढळतात. त्यामुळे हल्ली मोठ्या कंपन्या ही Linkedin.com वरूनच उमेदवार शोधण्यास पसंती देत आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या मानव संसाधन प्रबंधकांनी ही गोष्ट मान्य केली आहे. कंपन्यांमधील रिक्त पदांबद्दल कंपन्या व्यावसायिक संघ (groups) मध्ये सूचना प्रकाशित करतात. त्यावर उमेदवार अर्ज करु शकतात.

Linkedin.com मध्ये आपल्या सर्व कनेक्शन्सनी (मित्र) पोस्ट केलेले अपडेटस आपल्या होम पेजवर आपल्याला समजतात. त्यामुळे कोण कोणाशी जोडले जात आहे हे समजण्यास मदत होते ह्यातूनच आपल्याला नवीन उपयोगी येणार्‍या ओळखी होण्यास मदत होते कोण कोणत्या नवीन योजनेवर, प्रोजेक्ट वर काम करत आहे हे ही कळते.

आत्ताचं युग हे माहितीचं युग हे माहितीचं युग म्हणून ओळखलं जातं, मात्र या माहितीच्या युगात आपल्यासमोर येणारी माहिती देखील अफाट आहे. ही सर्वच माहिती आपल्याला असू शकत नाही, पण निदान आपल्या क्षेत्रातील अद्ययावत आणि उपयुक्त ठरणारी माहिती आपल्याला लिंक्डइनवरुन मिळते. या अत्यावश्‍य माहितीचा आपल्या व्यवसायासाठी सुयोग्यरितीने वापर करण्याचं कौशल्य तुमच्या अंगी असेल, तर हे नेटवर्कींग पोर्टल तुमच्या दैनंदिन आयुष्याचा अत्यंत मह्त्त्वाचा भाग बनून जाईल. तेव्हा आपल्या व्यवसायाची माहिती घेणार्‍या-देणार्‍या आणि मिळवू पाहणार्‍या प्रत्येकासाठी - ’’ (Linkedin.com)