latest Post

एक व्यावसायिक नेटवर्किंग मंच www.linkedin.com

I am publishing second article of my series in daily Pratyaksha that was published on the Linkedin. This article was published on 19th November 2010. Linkedin in one of the best social networking sites "only" for professionals to showcase their talent, network with personnel of similar interest, etc. Read the full article as under: 





एक व्यावसायिक नेटवर्किंग मंच www.linkedin.com

- मिहिर नगरकर


लिंक्डइन डॉट कॉम (linkedin.com) हा नावाप्रमाणेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना जोडणारा ऑनलाइन मंच (Portal) आहे. येथे आपला अकाउंट बनविणे विनामूल्य गूगल, याहू सारख्या -मेल अकाऊंट उघडण्याइतकेच सोपे आहे. लिंक्डइन डॉट कॉम (linkedin.com) हे जरी इतर ऑनलाइन मंचांसारखे (उदा. ऑर्कुट orkut.com वगैरे) वाटत असले, ज्यामधे असामाजिक घटकही कार्यरत असू शकतात, तरी असे असामाजिक घटक लिंक्डइनमध्ये कार्यन्वित असणे अवघड असते. कारण ह्या मधील नेटकरांच्या सर्व गतिविधिंवर मॉडरेटर्सचे बारकाईने लक्ष असते कोणताही अनुचित अनैतिक संदेश हा अर्ध्या ते एका तासात रद्द (डिलीट) केला जातो. शिवाय येथे अनैतिक संघ (Communities) किंवा ग्रुप्स बनविण्यावर ही अंकूष ठेवला जातो.

लिंक्डइनमध्ये आपण इतर लोकांना कनेक्शनस् म्हणून जोडू शकतो. प्रत्येकाने स्वतः बद्दल उपलब्ध (upload) केलेल्या सर्व व्यावसायिक बाबी (माहिती) आपल्याला (प्रोफाईलस् बघून) कळू शकतात. ही माहिती अनेकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरु शकते. सेल्स मार्केटिंग मधील मंडळीना ह्याचा उपयोग नक्कीच मोलाचा ठरू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, एखाद्या कंपनीला आपल्या प्रॉडक्टची माहिती दुसर्‍या कंपनीपर्यंत पोहोचवायची असेल तर.. त्यासाठी लिंक्डइन सारखा उत्तम मध्यम नाही. कारण इथे जर त्या कंपनीच्या अधिकार्‍यांचे प्रोफाईल असेल (सहसा ते असतेच) तर कुठल्या अधिकार्‍यांपर्यंत आपल्या प्रॉडक्टची माहिती पोहोचवायची, ते सहजपणे कळू शकतं. त्यामुळे काम सोपं होऊन जातं. म्हणूनच लिंक्डइन सेल्स् मार्केटींगमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आणि इतर क्षेत्रातील मंडळींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे नेटवर्कींग पोर्टल आहे. यातून होत असलेला लाभ पाहता, अनेक जणांना ह्याची आवश्यकता पटलेली आहे. म्हणूनच या नेटवर्कींग पोर्टलवर प्रोफाईल्स्नोंदविणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

प्रोफाईलस् म्हणजे ऑनलाइन बायो-डेटा. ह्या प्रोफाईलसमध्ये बायो-डेटात असणार्‍या सर्व बाबीं उदा. अनुभव, शिक्षण, आत्त्ताची जौब प्रोफ़ाईल, स्वतःतील विशिष्ठ चांगले गुण, मिळालेले सन्मान पुरस्कार, वैयक्तिक माहिती, Linkedin.com वर असण्याची कारणे (उदा. नोकरीचा शोध, बिझनेस लीड्स मिळविण्यासाठी , नविन संपर्कात नसलेल्यांशी संपर्कात राहण्यासाठी) इत्यादीं साठी वेगळे विभाग असतात.. Linkedin.com मध्ये व्यवसयिकांच्याच नव्हे तर कंपन्यांच्या प्रोफाईलस् ही करता येतात असतातही. त्यामुळे केवळ वैयक्तिक पातळीवर नाही तर कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये हे नेटवर्कींग पोर्टल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागले आहे.

Linkedin.com मध्ये शिफारस (Recommendations) करण्यासाठी स्विकारण्यासाठीही एक विभाग असतो. येथे आपण आपल्या सहकारी, वरिष्ठ कनिष्ठ सह-कर्मचारी मित्र ह्यांच्यासाठी शिफारशी करु स्विकारु शकता. ह्या शिफारशींचा आपल्यास भरपूर फायदा होऊ शकतो, खासकरुन नोकरी शोधताना. असे असण्याचे कारण म्हणजे, जर आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्या वरिष्ठांचे आपल्या बद्दलची चांगली शिफारस असेल तर नव्या ठिकाणच्या नोकरीतील बॉसला आपल्याबद्दल जास्त विश्‍वा वाटतो. शिफारस स्विकारणे किंवा नाकारणे आपल्या वर अवलंबून असते.

Linkedin.com मध्ये व्यावसायिक संघ (groups) ही असतात, उदा. डिफेन्स पर्सोनेल ग्रुप, मार्केटींग मॅनेजरस् ग्रुप, इत्त्यादी. ह्या संघामधील सभासद त्या क्षेत्राशी निगडित नवीन घडामोडी, विचार, पद्धती इत्यादी बद्दल विचार-विनिमय संभाषणे सतत करत राहतात. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्राशी निगडित संघाचे जर आपण सदस्यत्व घेतले तर आपल्याला त्या क्षेत्रातील वी घडामोडी कळण्यास, त्याच क्षेत्रातील इतर स्पर्धकांचा विचार, प्रतिक्रिया पद्धती जाणून घेण्यास मदत होते. हे सदस्यत्व आपणास मोफत मिळते. शिवाय या संभाषणांमधून आपल्याला मोलाच्या बिझनेस लीडस् , इतर प्रदेशामधील बिझनेस पार्टनरस् मिळविण्यासाठी ही उपयोग होतो. काही वेळेस तर लाखो-करोडोंचे व्यवहार Linkedin.com वरनं झाल्याच्या नोंदी आहेत.

या ठिकाणी दिलेली माहिती विश्‍वासहार्य असते का? असा प्रश्‍न आपल्याला पडू शकेल. स्पष्ट सांगायच तर यामध्ये तशी सोय नाही. पण अखाद्या अपरिचीताशी व्यवहार करताना आपण जी दक्षता आणि सावधगिरी बाळगतो तशी सावधानता बाळगली तर या व्यवहारात आपले नुकसान होण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही.

Linkedin.com मध्ये नोकर्‍यांसाठी एक वेगळा विभाग आहे. हल्ली नोकर्‍यांच्या पोर्टल्सने भाववाढ केली आहे उमेदवार नोंदणी वर ही शुल्क आकारत आहेत. त्यामुळे हल्ली नोकरी शोधणारेही ह्या पोर्टल्सवर नोंदणी करताना कमी प्रमाणात आढळतात. त्यामुळे हल्ली मोठ्या कंपन्या ही Linkedin.com वरूनच उमेदवार शोधण्यास पसंती देत आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या मानव संसाधन प्रबंधकांनी ही गोष्ट मान्य केली आहे. कंपन्यांमधील रिक्त पदांबद्दल कंपन्या व्यावसायिक संघ (groups) मध्ये सूचना प्रकाशित करतात. त्यावर उमेदवार अर्ज करु शकतात.

Linkedin.com मध्ये आपल्या सर्व कनेक्शन्सनी (मित्र) पोस्ट केलेले अपडेटस आपल्या होम पेजवर आपल्याला समजतात. त्यामुळे कोण कोणाशी जोडले जात आहे हे समजण्यास मदत होते ह्यातूनच आपल्याला नवीन उपयोगी येणार्‍या ओळखी होण्यास मदत होते कोण कोणत्या नवीन योजनेवर, प्रोजेक्ट वर काम करत आहे हे ही कळते.

आत्ताचं युग हे माहितीचं युग हे माहितीचं युग म्हणून ओळखलं जातं, मात्र या माहितीच्या युगात आपल्यासमोर येणारी माहिती देखील अफाट आहे. ही सर्वच माहिती आपल्याला असू शकत नाही, पण निदान आपल्या क्षेत्रातील अद्ययावत आणि उपयुक्त ठरणारी माहिती आपल्याला लिंक्डइनवरुन मिळते. या अत्यावश्‍य माहितीचा आपल्या व्यवसायासाठी सुयोग्यरितीने वापर करण्याचं कौशल्य तुमच्या अंगी असेल, तर हे नेटवर्कींग पोर्टल तुमच्या दैनंदिन आयुष्याचा अत्यंत मह्त्त्वाचा भाग बनून जाईल. तेव्हा आपल्या व्यवसायाची माहिती घेणार्‍या-देणार्‍या आणि मिळवू पाहणार्‍या प्रत्येकासाठी - ’’ (Linkedin.com)

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment