Saturday, March 30, 2013

वाहनांच्या इत्यंभूत माहितीसाठी संकेतस्थळे

I am publishing the 8th article from the my series on Freewares in Dainik Pratyaksha. The article is on various car deal portals where we can sale and purchase new and used cars. You would also find some sites for car pools. This article had featured in the issue of Pratyaksha dated 7th January 2011.वाहनांच्या इत्यंभूत माहितीसाठी संकेतस्थळे


भारतीय मोटर उद्योग हा आज जगातील इतर देशांच्या मोटर उद्योगांमध्ये दुसरा सर्वात मोठा उद्योग मानला जातो व भारत आता दर वर्षी ८० लाख मोटारी उत्पादित करत आहे. एका अंदाजानुसार, फक्त पुढच्या ४० वर्षातच, म्हणजे २०५० साला पर्यंत भारतीय मोटर उद्योग जगातील दुसर्‍या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर पोहोचेल व त्यावेळेस भारतातील फक्त गाड्यांची संख्या ६११ दशलक्ष एवढी असेल. शिवाय भारतात नुकतीच टाटा समूहाने ’नॅनो’ ही फक्त एक लाख रुपयांची मोटर उतरवली व अगदी सामान्य माणूस ही मोटारीत बसून फिरण्याची स्वप्‍ने पाहू लागला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील ७०% लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे व हाच वर्ग सर्वात महत्त्वाकांक्षी असतो व मोटारींची आवडही त्यांच वर्गाला सर्वात जास्त असते.

वरील प्रस्तावना वाचून आपण ताडलच असेल की आज आपण मोटारीं विषयीच्या संकेतस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. www.carwale.com,  www.indiadrive.com, www.gaadi.com, www.automobileindia.com, www.carazoo.com, www.autoindia.com ही व अशी अनेक संकेतस्थळं आहेत जेथे आपल्याला मोटारीं विषयी विविध माहिती व अजून ’बरेच काही’ उपलब्ध करुन दिले जाते. ही माहिती कोणत्या प्रकारची असते व हे ’बरेच काही’ म्हणजे नक्की काय ते आता आपण जाणून घेऊया.

ह्या संकेतस्थळांवर आपण नवीन किंवा वापरलेली (सेकंडहॅण्ड) गाडी किवां बाईकची (आपण येथे मोटर असे या दोघांना संबोधुया) खरेदी किंवा विक्री करु शकतो व त्या बद्दल मार्गदर्शन मिळवू शकतो. नवीन मोटर खरेदी करण्याचे मार्गदर्शन आपल्याला या संकेतस्थळांवर मिळते. ते मिळवण्यासाठी ह्या संकेतस्थळांवर आपल्याला काही प्र
श्‍नांची उत्तरे द्याची असतात उदा. आपली खर्च करण्याची तयारी (बजेट), आपल्याला हवी असलेली कंपनी, कंपनीचा ब्रॅंड, आपल्याला हव्या असलेल्या सुविधा, आपल्या मोटारीत किती माणसे बसणार, पेट्रोल / डिझेल / एल.पी.जी. वर चालणारी, इत्यादी. ह्या प्रश्‍नांबरोबर आपण मोटारीच्या कुठल्या गुणधर्माला (उदा: इंधन वापर व बचत, पुनविक्री मूल्य, आराम, सुरक्षा, इत्यादी) प्राधान्य देतो ते ही निवडायचे असते की मग आपल्या बजेटमध्ये बसणारी, आपल्याला हव्या असणार्‍या सुविधा असणारी व आपल्याला हव्या असणार्‍या गुणधर्मांची, कोणत्या कंपनीची मोटर आहेत त्याचा एक तख्ताच आपल्या समोर उघडतो, ज्याच्यामध्ये या मोटारींचे फोटो ही असतात. ह्या तख्त्यावरुन आपण कोणती मोटर घ्यायची त्याचा निर्णय घेणे आपल्याला सोपे जाऊ शकते. शिवाय आपल्याला विशिष्ठ मोटारींचे अंदाजपत्रक (कोटेशन) संपूर्ण किंमती सगट, (विमा, आर.टी.ओ. प्रभार, इत्यादींसह) म्हणजेच ’ऑन रोड प्राइज’ सहित मिळते.

जर आपण वापरलेल्या (सेकंडहॅण्ड) मोटारींच्या शोधात असू तर आपल्याला वरिल उल्लेखिलेल्या प्र
श्‍नांबरोबरच अजून काही प्रश्‍नांची उत्तरे द्याची असतात उदा: आपण राहणार्‍या शहराचे नाव द्यावे लागते (जेणेकरुन आपल्याला आपल्या शहरातीलच मोटर मिळू शकेल), मोटारीचा रंग, इत्यादी. वापरलेली (सेकंडहॅण्ड) मोटारी विकत घेताना इतरांनी नोंदविलेल्या मोटारींची यादी ही आपल्याला येथे मिळते. जर त्या नोंदविलेल्या मोटारी आपल्याला पसंत असतील तर आपण तसे सूचित करु शकतो, जेणे करुन त्या मोटारींचे मालकं आपल्याला संपर्क करु शकतात.

आपली मोटर विकायची असेल तरीही ह्या संकेतस्थळांची आपल्याला मदत होऊ शकते. आपण राहणारे शहर, मोटर बनवली गेल्याचे वर्ष, मोटारीचे मॉडेल, संस्करण (व्हर्जन) व आपल्या मोटारीने केलेला एकूण किलोमीटरचा प्रवास ह्या सा
र्‍या, प्रश्‍नांची उत्तरे दिली की आपल्याला आपल्या मोटारीचे पुर्नविक्री मूल्य कळते. या संकेतस्थळांवर आपण आपली मोटरीची माहिती पुर्नविक्रीसाठी (रीसेल) नोंदवू शकतो. त्यासाठी आपल्याला आपले खाते या संकेतस्थळांवर उघडावे लागते जे मोफत उघडले जाऊ शकते. नोंदणी करताना आपल्याला आपल्या मोटारीबद्दल काही माहिती पुरवावी लागते उदा: आपण राहणारे शहर, मोटर बनवली गेल्याचे वर्ष, मोटारीचे नाव, आपल्या मोटारीने केलेला एकूण किलोमीटरचा प्रवास, रंग, इत्यादी. शिवाय स्वत:बद्दलची माहिती ही संकेतस्थळांवर द्यावी लागते (उदा: आपले नाव, भ्रमणध्वनि (मोबाईल क्रंमांक) व इमेलचा पत्ता) जेणेकरुन खरेदीदार आपल्याला संपर्क करु शकतील. त्याच बरोबर आपल्या शहरातील वापरलेली (सेकंडहॅण्ड) मोटारींचे विक्रेत्यांबद्दल (डीलर्स) ही आपल्याला माहिती मिळते.

मोटार विकत घेताना आपल्याला लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. या संकेतस्थळांवर आपल्याला आपण जर कर्ज घेतलेच तर आपल्याला लागणारा बँकेचा मासिक हफ्त्याची रक्कमही अनुवादून (कॅलक्यूलेट करुन) समजते. ही आकडेवारी कळण्यासाठी आपल्याला आपण घेणार असलेल्या कर्जाची रक्कम व कर्जाचे व्याजदर नमूद करावे लागते. त्याशिवाय आपल्याला या संकेतस्थळांवर विविध बँकांचे व्याजदर, मासिक हफ्त्याची रक्कमेचा तख्ता ही  मिळतो. शिवाय या संकेतस्थळांनी बँकांबरोबर संधान (टाय-अप) केलेले असते. त्यामुळे आपण या संकेतस्थळांच्या मार्फतच कर्जासाठीही ऑनलाइन अर्जही करु शकतो. त्याशिवाय आपण आपल्या मोटारीची माहिती दिली की आपल्या मोटारीला लागणा
र्‍या विम्याच्या हफत्याची रक्कमही कळते.

या संकेतस्थळांवर आपल्याला मोटारींचे बाजारात उपलब्ध असणा
र्‍या विविध सुट्ट्या भागाची यादी व माहिती मिळते. त्याशिवाय या सुट्ट्या भागांची सर्व माहिती उदा: किंमत, कंपनी, इत्यादी ही कळते. शिवाय आपल्याला येथे सुट्ट्या भागांची खरेदी करण्याचे मार्गदर्शनही मिळते. नवीन सुट्ट्या भागांची खरेदी करताना ह्या संकेतस्थळांवर आपल्याला काही प्रश्‍नांची उत्तरे द्याची असतात उदा. आपली खर्च करण्याची तयारी (बजेट), आपल्याला हवी असलेली कंपनी, कंपनीचा ब्रॅंड, इत्यादी. ह्या प्रश्‍नांची उत्तरे भरली की आपल्या समोर एक तख्ताच उघडतो ज्यामध्ये या सुट्ट्या भागांचे फोटो ही असतात. ह्या तख्त्यावरुन आपण कोणते सुट्टे भाग घ्यायचे त्याचा निर्णय घेणे सोपे जाऊ शकते.

या संकेतस्थळांवर आपण आपले खाते उघडले व मोटारींची माहिती सादर केली की या खात्यात आपल्या मोटारींची रखरखावाच्या (सर्विसिंगची) नोंदी करुन ठेवता येतात. त्याचबरोबर आपल्याला या रखरखावा तारीख (सर्विस डेट) यायच्या काही दिवस अगोदरच या संकेतस्थळांकडून इमेल्स व एस.एम.एस. द्वारे त्याबद्दल सूचित केले जाते. त्याशिवाय या संकेतस्थळांद्वारे आपल्याला आपल्या मोटारी संदर्भात इतरही वेळेआधीच सूचना, इमेल्स व एस.एम.एस. द्वारे पाठविल्या जातात उदा: विम्याचा हफ्ता भरण्याची तारीख, व्हील अलाइनमेन्ट व संतुलन करुन घेण्याची तारीख, इत्यादी. 

www.indiadrive.com या संकेतस्थळावर आपण कार-पूल साठीही आपले नाव नोंदवू शकतो. ह्यामुळे आपण रोज ज्या ठिकाणी कामाला जातो व परत घरी येतो त्यावेळेस व त्या मार्गावर अजून कोण प्रवास करतो ते समजते व आपण त्या माणसाबरोबर संर्पक साधून कधी त्याची तर कधी आपली मोटर वापरुन जाऊ शकतो. ह्यामुळे आपला वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय ट्रैफिक व प्रदूषण रोखण्यासही मदत होते. त्याशिवाय www.indiacar.com या संकेतस्थळावर आपल्याला आर.टी.ओ.च्या विविध कामांसाठी लागणा
र्‍या कागदपत्रांची संपूर्ण यादी व माहिती मिळते.

या संकेतस्थळांवर आपल्याला मोटारींच्या संबंधीची इतर माहिती ही भरपूर मिळते. मोटार विकत घेण्याच्या वेळेस घेण्याच्या काळज्या, सूट मिळविण्याचे व किमतीत घासाघिस करण्याचे सल्ले, इतर लोकांच्या विविध मोटारींबद्दलच्या समिक्षा व मते, ही व अशी माहिती ह्या संकेतस्थळांवर आपल्याला मिळते. शिवाय मोटारीं संबंधी विविध प्रर्दशने, शिबीरे, कार्यशाळा, इत्यादींबद्दल वृत्तांत ही ह्या संकेतस्थळांवर उपलब्ध केले जातात. हल्ली तरुणांना आपल्या संगणकावर मोटारींची विविध चित्रे वॉलपेपर म्हणून ठेवायला आवडतात. अशी विविध चित्रे या संकेतस्थळांवरुन डाऊनलोड करता येतात. बाजारात येणा
र्‍या नवनवीन मोटारींबद्दलचे व्यवसायिकांकडून पूर्वावलोकने (प्रिव्ह्युज), मोटारींबद्दलच्या बातम्या ही ह्या संकेतस्थळांवर वेळोवेळी उपलब्ध केल्या जातात. त्याचबरोबर आपण या संकेतस्थळांवर विविध ऑनलाईन चर्चांही पाहू शकतो व त्यात भागही घेऊ शकतो.

Monday, March 25, 2013

India's Soft Power and Oscars

 
It was yesterday that I happened to read a news titled 'Indian art sale at New York breaks artist records, nets Rs. 36 crore'. It was an art exhibition that had some of the prized Indian art collections on the block. 

But there was a bigger news some three weeks back that had attaracted my attention is very different way. It was about the '85th Academy Awards' or the 'Oscars' held at Los Angeles which every year attracts attention of millions of movie fans the world over. Taiwanese director Ang Lee's movie 'Life of Pi' dominated and lead the Oscars with 4 awards and 11 nominations . It is was one of the successes for Indians at Oscars with 'Life of Pi' that narrates the journey of an Indian boy who survives a storm. Widely shot in India, the fantasy adventure drama stars young Delhi-based Suraj Sharma in the lead role, with acclaimed Indian actors Irrfan and Tabu seen in prominent roles in the movie. During his acceptance speech, Lee thanked his producers, 'Indian crew', Suraj and all technicians who worked on the movie. "Suraj, where are you," he said, and the cameras focussed on Suraj, who made his acting debut with the movie. And finally Lee wrapped up the speech saying "Namaste" in Hindi. 

Anil Ambani's Reliance Entertainment co-produced American Civil War saga 'Lincoln', along with DreamWorks Studios and 20th Century Fox Film Corporation. The film bagged 2 awards with 12 nominations at Oscars. Audiences and critics have lauded the movie, which traces the last four months of the 16th American President's life and his efforts to end slavery in the United States.

There were many other Indian connections too. Kathryn Bigelow's Zero Dark Thirty was partly filmed last year in the north Indian city of Chandigarh and its Manimajra Market. Another major Oscar contender, David O. Russell's Silver Linings Playbook, features veteran Indian actor Anupam Kher a film which had 8 Oscar nominations.

India has had success at Oscars in past as well. India won its first Oscar with 1982's multiple-award winning movie Gandhi, a biography of one of the greatest Indian leader of freedom struggle, Mahatma Gandhi, which saw Bhanu Athaiya sharing an award for costume design. In 1992, the late director Satyajit Ray was given an honorary Oscar. In 1998 director Shekhar Kapur's film Elizabeth won an Oscar for best makeup while receiving numerous nominations. 2008's film Slumdog Millionaire saw Oscar wins for composer A. R. Rahman, sound designer Resul Pookutty and lyricist Gulzar

Rather than just all these Indian connections to Oscars lets actually look forward to 'Indian films' dominating Oscars in the near future. But what actually all this points to is growing influence of India and its soft power on the world. Giants like China have been trying their level-best to create a positive image of their country across the world. They have spent millions of dollars with specially directed campaigns to achieve this purpose but in vain. But by its very nature of all-inclusiveness, embracement of good; India through its art, culture, cinema, society and societal values, democracy and many more which forms its Soft Power hasn't needed any campaign to create and spread this power of her across the world. But rather it has happened naturally and on its own...

I do remember reading the Anniversary Issue of dainik Pratyaksha of Year 2011. Dr. Aniruddha Joshi better known to us as Aniruddha Bapu is the Executive Editor of the newspaper. This issue had an article by an Indian who was Officer with Merchant Navy. His profession required him to travel him far and wide throughout the world and meet different people. In all the places he went, he witnessed the spread, acceptance and love for Indian culture, art, religion and way of life which was mainly propagated through Indian Cinema. This was observed not just with Indian expats but also with the locals. This article was the first instance when I  was reading about the concept of 'Soft Power', its importance and influence and just how India has gained it naturally.

Saturday, March 16, 2013

मोबाईलमधील मॉल - 'एक हात का खेल'

I am publishing the 7th article from the my series on Freewares in Dainik Pratyaksha. The article is on www.ngpay.com which is a mobile based shopping platform. This article had featured in the issue of Pratyaksha dated 31st December 2010. 


मोबाईलमधील मॉल - 'एक हात का खेल'


रेदी म्हणलं की ’शॉपिंग मॉल’मध्ये जाणं हेच मानलं जातं कारण येथे सर्व गोष्टी एकाचजागी मिळतात. आज मॉलमध्ये जाण्याची गरज ही हळू-हळू कमी होत चालली आहे कारण आता घर बसल्या अन्‍न पदार्थ, किराणा, कपडे, दागिने, इत्यादी आणून दिले जाते. ह्यालाच आपण ’फ्री होम डिलिव्हरी’ असे म्हणतो. त्याच्याही पुढे जाऊन मग आपण संगणकावरुन खरेदी करायला लागलो, ज्याला आपण ऑनलाईन शॉपिंग म्हणून ओळखतो. पण आता तर त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला मोबाईलवरुन देखील मॉलसारखेच सर्व काही एका जागीच खरेदी करु शकतो. त्याचा एक नमुना म्हणजे www.ngpay.com हे संकेतस्थळ. ह्या संकेतस्थळाचा वापर मुख्य म्हणजे हे संपूर्णपणे मोफत आहे. 

हे संकेतस्थळ ’जीग्राहक मोबिलिटी सोल्युशन्स प्राइवेट लिमिटेड’ या बंगळूर स्थित एका भारतीय कंपनीचे आहे. हेलिओन वेंचर पार्टनर्स एल.एल.सी. ह्या मॉरिशस स्थित कंपनीची ह्यात आर्थिक गुंतवणूक आहे. हे संकेतस्थळ फेब्रुवारी २००८ मध्ये सुरू करण्यात आले. फेब्रुवारी २००८ पासून आजपर्यंत (३१ डिसेंबर २०१०) कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे ह्याचे ५ लाखहून अधिक सभासद झाले आहेत. एनजीपेला आत्तापर्यंत नॅसकॉमचे भारतातील ’टॉप १०० आय.टी. इनोव्हेटरस्‌’, जागतिक आर्थिक मंचाचे३४ ग्लोबल टेक्नोलॉजी पायोनीयरस्‌ फॉर २००९’ हे व असे एकूण ७ पुरस्कार मिळाले आहेत.


येथे आपण (भारतात) खरेदी करु शकतो, मित्रांना व नातेवाईकांसाठी उपहार पाठवू शकतो, सिनेमाची तिकिटे खरेदी करु शकतो, प्रवासाचे आरक्षण करु शकतो. मोबाईल व डी.टी.एचचे े रीचार्ज करु शकतो, आपली अनेक प्रकारची (उदा. वीज, फोन, गॅस, इत्यादीची) बिले भरु शकतो, बँकेचे व्यवहार देखिल करु शकतो व आणखीन बरेच काही करता येते या एनजीपेवरुन व ते ही फक्त आपल्या हातातील मोबाईलवरुनच. 

एनजीपे वापरण्यास काय लागते?
एनजीपे हे कुठल्याही जावा असणार्‍या (एनेबल्ड) मोबाईलवर चालते (ज्याची किंमत रु. २०००/-च्या वर असते.) शिवाय आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट असणे गरजेचे असते. एनजीपे कोणत्या मोबाईलवर चालू शकते त्या मोबाईलस् ची यादी एनजीपेच्या संकेतस्थळावर दिली आहे. हल्ली इंटरनेटच्या अनेक स्वस्त योजना बाजारात उपलब्ध आहेत. जरी एनजीपे हे मूलतः कोणत्याही व्यवहारावर पैसे आकारत नसले तरी काही सेवांवर एनजीपे पैसे आकारू शकते. पण जर असे पैसे आकारले जात असतील तर तसे आपल्याला, आपण पैसे भरून व्यवहार करायच्या अगोदरच सूचित केले जाते. 

एनजीपे वापरायचे कसे?
आपण एनजीपेवर गेलो की पुढील www.ngpay.com/site/howitworks.html या जागी जायचे व आपला मोबाईल क्रमांक तेथे सादर करायचा असतो किंवा ५६७६७ या क्रमांवर ’एनजीपे’ हा मसूदा एम.एस.एम. करायचा असतो. त्यानंतर एनजी आपल्याला एक एम.एस.एम. पाठवते ज्यामध्ये एक लिंक दिलेली आसते ज्यावरुन आपण एक ऑपलिकेशन डाउनलोड व इंस्टॉल करायचे असते (डाउनलोड व इंस्टॉल करण्याची सर्व माहिती संकेतस्थळी उपलब्ध केलेली आहे). त्यानंतर आपल्याला एनजीपेवर स्वतःची नोंदणी करायची असते, ज्यामध्ये आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, इमेल, इत्यादी माहिती सादर करायची असतो. ज्या वेळेस आपण एनजीपेचे सभासद होतो त्यावेळेस आपणच ६ आकडी पिनक्रमांक घ्यायचा असतो. हा पिनक्रमांक आपल्याला दर वेळी ज्यावेळेस आपण कोणता व्यवहार एनजीपे वापरून करू त्यावेळेस सादर करावा लागतो. त्यानंतर आपण आपल्याला हव्या असणार्‍या कंपन्या (उत्पादने किंवा सेवा) ज्या आपण आपल्या मोबाईलवरुन वापरणार आहोत त्या निवडू शकतो उदा: किंगफिशर एयरलाईन्सएच.डी.एफ.सी. बँकआय.आर.सी.टी.सी. (रेल्वे आरक्षण), फन सिनेमा, आरचिज् ग्रीटिंगस्, महानगर गॅस, रिलायन्सएनर्जी, महावितरण (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी), एम.टी.एन.एल., टाटा इंडिकॉम, लूप मोबाईल, इत्यादी. अशा १०० हून अधिक कंपन्यांबरोबर एनजीपेचे संधान (टाय-अप) आहे. या यादीत ज्यावेळेस नविन कंपन्यांची जोडणी होते त्यावेळेस ती लगेचच सभासदांच्या मोबाईल वर उपलब्ध केली जाते.

एनजीपेवर आर्थिक व्यवहार कसे होतात व ते कितपत सुरक्षित आहेत?
एनजीपे वापरणार्‍यांच्या मते, एनजीपे आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत सुरक्षित आहे. एनजीपेकडे १२८ बिट्सची फायनॅनशियल ग्रेड सीक्युरिटीचे प्रमाणपत्र ही आहे. ह्य व्यवहारांमधली सुरक्षितता ही ए.टी.एम. व्यवहारांच्या एव्हडीच सुरक्षित मानली जाते. सभासद म्हणून आपण देयकाची (पेमेंटची अनेक साधने वापरू शकतो उदा: मास्टरकार्ड / वीझा क्रेडिटकार्डएच.डी.एफ.सी. बँक खाते आणि इटझ्‌कॅश लवकरच सभासद त्यांची इतर बँकांची खाती, कॅश कार्ड व डेबिट कार्ड वापरू शकतील.  तसेही एनजीपे स्वतः कोणत्याही आर्थिक व्यवहार करतच नाही. सर्व आर्थिक व्यवहार हे संधान बांधलेल्या कंपन्यांकडूनच होतात. शिवाय सभासद त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास ही राखून ठेऊ शकतात (एनजीपे वॉलेटमध्ये) जेणे करुन कोणी दुसरीच व्यक्ति आपल्या नावावर व्यवहार करत नाही ना हे तपासण्यास मदत होते. शिवाय ज्या वेळेस आपण कोणताही व्यवहार एनजीपेद्वारे करतो त्यावेळेस त्या व्यवहाराचा पूर्ण तपशील आपल्याला एम.एस.एम. व इमेलद्वारे पाठवला जातो. 

एनजीपे आपल्या मोबाईलमध्ये एक मोबाईल वॉलेट तयार करते जे तोडणे कठीण असते. हे मोबाईल वॉलेट आपली सर्व बँक खाते व क्रेडिट कार्डसची माहिती ही एन्क्रिप्ट करुन साठवते. शिवाय जरी आपल्या बँक खाते व क्रेडिट कार्डची माहिती आपल्या मोबाईल मधिल मोबाईल वॉलेटमध्ये असली तरी वर उल्लेखिलेल्या पिनक्रमांक हा काही मोबाईलमध्ये नसतो. त्यामुळे जरी आपला मोबाईल हरवला तरी, कोणतीही इतर व्यक्ति ह्या पिनक्रमांकाशिवाय आपल्या व्यवहाराचा तपशील बघू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट आपल्या पैश्यांनी विकतही घेऊ शकत नाही. आपण एनजीपेच्या ग्राहक संबंध विभागास (जो दिवसाच्या २४ तास चालू असतो) फोन करुन, आपला पिनक्रमांक सांगून एनजीपे आपल्या त्या हरवलेल्या मोबाईलवर गोठवू शकतो. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती ही एनजीपेच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही माणसास अथवा कंपनीस पूरविली जात नाही. 

समजा जर आपला व्यवहार चालू असताना आपला मोबाईल बंद झाला किंवा आपला इंटरनेटचा संपर्क तुटला तरी आपल्या क्रेडिटकार्ड मधील पैसे वजा तोवर केले जात नाहीत जोवर आपला व्यवहार यशस्विरित्या पार पडत नाही.

माणसाच्या गरजा वाढल्या आहेत. त्या गरजा पूर्ण करायला आज त्याच्याकडे अनेक साधनेही आहेत व ती साधने कमवण्यासाठी अनेक संधी ही उपलब्ध आहेत. पण ह्या शर्यतीमुळे आज सर्वात महत्त्वाचे व दुर्गम असे काही झाले असेल तर तो आहे वेळ. हा वेळ वाचवण्यासाठी व मिळवण्यासाठी आपण वेळेचे उचित नियोजन व व्यवस्थापन करणे हे तर गरजेचेच आहे पण त्याचबरोबर काळाबरोबर बदलत जाणार्‍या, अधिक प्रगल्भ व त्यामुळे आपली कामे अधिक सोपी करणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे व एनजीपे हे त्याचेच उदाहरण आहे.

Saturday, March 9, 2013

डिजीटल वाटाड्या - एम-इंडिकेटर

Today I am publishing the 6th article of my series on m-Indicator. Bapu has always believed in the principal of safeguarding and promoting Common Interest of Common Man. This applications which we would be seeing today totally adheres to this principal. This article had appeared in the issue of 24th December 2010 in Dainik Pratyaksha. 

Also my sincere apologies to all the readers as I couldn't publish the article in this series on last Saturday.  
डिजीटल वाटाड्या


समजा तुम्ही बोरिवलीला रहात असाल व नोकरी करता दादरला जात असाल, पण एके दिवशी अचानक तुम्हाला ऑफिसच्या कामानिमित्त दादरहून घाटकोपरला जायचे आहे व तिथूनच नंतर तुम्ही घरी बोरिवलीला जाणार आहात. प समजा हा रस्ता तुमचा माहितीतला नासेल तर तुमच्या समोर दोन प्रश्‍न नक्‍कीच असतील, की दादरहून घाटकोपरला व मग घाटकोपरहून बोरिवलीला कोणती बस जाते किंवा लोकलचं वेळापत्रक काय. विशेषत: ज्या मार्गांवर गाड्या तुरळक आहेत तेथे ही बाब महत्त्वाची ठरते उदा: वाशी-ठाणे रेल्वे मार्ग (विस्तारीत मध्य रेल्वे)

या सार्‍या तुमच्या समस्यांवर तुम्हाला एक वाटाड्या नक्‍की मदत करु शकतो. या वाटाड्याचे नाव आहे m-indicator (एम-इंडिकेटर). हा एक मोबाईल आधारित (बेस्ड) सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे.

www.mobond.org ह्या संकेतस्थळावरुन आपण एम-इंडिकेटर हे सॉफ्टवेअर डाउनलोड करु शकतो. सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला कोण-कोणत्या कार्यात्मक सुविधा (फिचर्स) मिळू शकतात. 
१) अगोदर म्हटल्या प्रमाणे आपल्याला एम-इंडिकेटरमध्ये बेस्ट बसेस् चा मार्ग शोधता येतो (रुट फाइंडर). 
२) मुंबईच्या श्‍चि, मध्य, हार्बर व विस्तारीत-मध्य रेल्वेचं वेळापत्रक 
३) भारतातील कोणत्याही रेल्वे प्रवासाची आरक्षण स्थिती (PNR स्टेटस), 
४) मुंबईच्या ऑटोरिक्शा व टॅंक्सीची भाडेवारी 
५) रेल्वेद्वारे दर रविवारी घोशीत होणार्‍या मेगाब्लॉकची माहिती, या सार्‍या कार्यात्मक सुविधा आपल्याला या एम-इंडिकेटर सॉफ्टवेअरमधून मिळू शकतात व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करता येते व हे वापरण्यासाठी आपल्याला भ्रमणध्वनि संचामध्ये (मोबाईल) जीपीआरएसची गरज नाही.

इन्स्टॉलेशन पध्दती
हे सॉफ्टवेअर पुढे उलेखिलेल्या मोबाईलस् आणि त्यातील एक्सटेंशनस्‌मध्येच चालते. 
१) नोकिया, सोनी, सॅमसंग व एल.जी. चे मोबाईलस्: .jar आणि .jad 
२) ब्लॅकबेरी: .cod आणि .alx 
३) ऍडरॉइड: .apk आणि andme_signed.apk (दोन्ही apk डाऊनलोड करणे गरजेचे आहे. 

आपल्या मोबाईलमध्ये एम-इंडिकेटर इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपलाल्या फोनमध्ये जावा सपोर्ट (CLDC 1.0 किंवा त्याच्या वरचे व्हर्जन, MIDP 2.0 किंवा त्याच्या वरचे व्हर्जन सहित) असणे अनिवार्य आहे. इन्स्टॉलेशन करताना आपल्या मोबाईलमध्ये .jar आणि .jad फाईल्स कॉपी करुन घ्याव्यात. त्यानंतर .jad फाईल वर क्लिक करावे. व जर आपल्या मोबाईलवर जीपीआरएसची सोय असेल तर आपण थेट http://mobondweb.mobond.org/install.jsp या लिंकमधून डाऊनलोड करु शकता किंवा आपल्या संगणकामध्येही डाऊनलोड करुननंतर आपल्या मोबाईलमध्ये ब्लू-टूथ किंवा USB वायरच्या मदतीने स्थानांतरित (ट्रान्स्फर) करु शकता.

एम-इंडिकेटर चे फिचर्स
१) एम-इंडिकेटर वर आपल्याला बेस्ट बसेस्‌चा मार्ग शोधता येतो. समजा आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायचे आहे. ह्या दोन ठिकाणांची नावे एम-इंडिकेटर वर उपलब्ध असलेल्या यादीतून निवडावी लागतात. त्यानंतर आपल्याला या मार्गावर धावणार्‍या बस गाड्यांची यादी आपल्या मोबाईलच्या स्क्रिन वर दिसते. बेस्टच्या स्वत:च्या साईट्वर (www.bestundertaking.com) सुध्दा आपल्याला हे फिचर मिळतं. तसेच जर आपण कोणत्याही बसचा क्रमांक टाकला तर आपल्याला त्या बसचा मार्ग व त्याच्या थांब्यांबद्दलची पूर्ण माहिती मिळते. त्याच बरोबर त्या बसच्या दोन थांब्यांमधील तिकीटाच्या भाड्यांच्या किंमतीही कळतात.

२) एम-इंडिकेटर वर आपल्याला पश्‍चिम, हार्बर, मध्य, हार्बर व विस्तारीत-मध्य रेल्वेची समय-सारिणी (टाइम-टेबल) मिळते. यामुळे आपण आपल्याला आपल्या वेळेनुसार योग्य त्या ट्रेनची माहिती मिळून त्यानुसार आपला कार्यक्रम आखता येतो. अगोदर म्हटल्या प्रमाणे, खास करुन अशा मार्गांवर ज्यावर गाड्या तुरळक आहेत, उदा: वाशी-ठाणे रेल्वे मार्ग (विस्तारीत-मध्य रेल्वे) तेथे या फिचरचा उपयोग होतो. त्याच बरोबर, प्रत्येक ट्रेन कोणत्या स्थानकावर थांबणार आहे व कोणता मार्ग अवलंबिणार आहे ते समजण्यास मदत होते. 

३) एम-इंडिकेटर वर आपल्याला भारतातील कोणत्याही रेल्वे प्रवासाच्या तिकिटाची आरक्षण स्थिति (PNR स्टेटस) बद्दलची माहिती सुद्धा मिळते. आरक्षणासाठी आपल्याला रेल्वे कडून मिळालेला १० आकडी PNR क्रमांक आपण एम-इंडिकेटरमध्ये टाकला की त्यानंतर आपल्याला गूगलकडून एका SMS द्वारे आपल्या PNR क्रमांकाची आरक्षण स्थिति कळते. (युझरला गूगल कडून SMS मिळण्यासाठी m-indicator हे इंटरफ़ेसचे काम करते).

४) एम-इंडिकेटर वर आपल्याला मुंबईच्या ऑटोरिक्शा व टॅंक्सीची भाडेवारी मिळते (दिवसाची व रात्रीची). काही वेळा रिक्शा व टॅंक्सी चालकांकडून प्रवाश्यांना भाड्यामध्ये फसविण्याचे किस्से आपल्या कानांवर पडतात. ही फसवणूक थांबविण्यासाठी आपण जर मिटरवर दिसणारा भाड्याचा आकडा एम-इंडिकेटरमध्ये टाकला तर त्या आकड्याशी निगडीत खरे भाडे आपल्याला कळते.

५) एम-इंडिकेटर वर आपल्याला रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लॉकची माहिती मिळते. त्याशिवाय जर आपण एम-इंडिकेटरला SMS पाठवून त्याची सदस्यता स्विकारली (ही सदस्यता मोफत मिळते) तर त्यांच्याकडून आपल्याला मेगा-ब्लॉकची माहिती देणारे नियमित SMS गूगलकडून येतात.

एम-इंडिकेटरसारखे ’आमची मुंबई’ नावाचे ही एक हुबेहुब सॉफ्टवेअर आहे. त्याशिवाय www.go4mumbai.com नावाची ही एक वेबसाईट आहे ज्यावर एम-इंडिकेटरची सर्व फिचर्स (PNR स्टेटस सोडून) मिळतात. शिवाय ह्या वेबसाईटवर आपल्याला मेरु टॅंक्सी ही ऑनलाईन बुक करता येते.

महिती-तंत्रज्ञाना मुळे हे जग जवळ येत आहे असे म्हणतात. पण म्हणून आपल्याला प्रवास काही चुकलेला नाही. महिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हा प्रवास आपण नक्कीच सुकर करु शकतो. तुम्ही कितीही अनोळखी ठिकाणाहून येऊन मुंबईत प्रवास करित असाल किंवा तुम्हाला मुंबईतील विशिष्ट भागाची काहीही माहिती किंवा कल्पना नसेल तर हे एम-इंडिकेटर तुमचा अगदी जिवलग मित्र बनून ’वाटाड्याच’ काम उत्कृष्ट प्रकारे करतो व योग्य ठिकाणी तुम्हाला नेऊन सोडतो.