Saturday, September 21, 2013

‘ऑनलाईन’कारभार - National Portal of India

Hello Friends.. I am writing to you after a long time. Today I am publishing the 11th article of my series from Pratyaksha. Today's article focusses on National Portal of India i.e. www.india.gov.in through which any citizen can get various works related to government done online, without having to visit Government offices. (This article had appeared in Pratyaksha on 28th January 2011).

national portal of India, online governance

It was just this Thursday that during His discourse, Bapu spoke about advent and expansion of Nanotechnology in our daily lives. At the same time He also mentioned about the use and relevance of computers, smart phones and rather Information and Communication Technology i.e. ICT as a whole. He once again stressed on being hands-on with ICT unless which we would become socially  and professionally irrelevant in the near future to come. This site which we would see here is a sure indicator of these times to come. 


ऑनलाईनकारभार


कुठलेही सरकारी काम म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गजबजलेले कार्यालय. या कार्यालयातील सर्वसाधारणपणे दिसणारा नजारा व अविभाज्य घटक म्हणजे पेपरांचे साठलेले गठ्ठे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला भारत सरकारने हळू-हळू का होईना पण आपले काम ऑनलाईन, डिजिटलाईज्ड व पेपरलेसकरायला सुरुवात केली आहे. ह्याच प्रयत्‍नातून नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया ची उत्पत्ती झाली. (www.india.gov.in) या पोर्टलवर भारत सरकारची सर्व मंत्रालये, विभाग व कंपन्या, त्यांच्या साईट्स्‌ व त्या साईट्सवरील ऑनलाईन सेवा आणि योजना एका छत्राखाली आणल्या गेल्या आहेत. भारताच्या सर्वसाधारण नागरिकालाही वापरता यावे म्हणून हे पोर्टल हिंदीतही उपलब्ध आहे. या पोर्टलचा आपल्याला कसा व कुठे फायदा होतो ते आता आपण पाहूया.

शिक्षण व रोजगार


सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पोर्टलवर आपण NCERT ची पुस्तके मोफत वाचू शकतो. त्यामुळे आपला ह्या पुस्तकांवर होणारा खर्च नक्कीच वाचू शकतो. शिवाय कोणत्याही सरकारी उदा: भारतीय लोक सेवा आयोग, इत्यादि व महत्त्वाचे म्हणजे सर्व राज्य शिक्षण बोर्डांच्या उदा: एस.एस.सी-एच.एस.सी., इत्यादि परीक्षांचे निकाल ह्या पोर्टलवर पाहता येतात. या पोर्टलद्वारे http://www.educationindia4u.nic.in/ या साईटशी आपण जोडले जाऊ शकतो. ह्या साईटवर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाबाबत ऑनलाईन सल्ला मिळविता येतो. शिवाय हे पोर्टल आपल्याला राष्ट्रीय विद्यालयीन शिक्षणसंस्था या अंशकालीनशिक्षणसंस्थांशी (ओपन युनिव्हर्सिटी) जोडते. त्याशिवाय ह्या पोर्टलचा  उपयोग करून आपण भारतीय बँक संघाच्या साईटशी जोडले जाऊ शकतो जेथे आपल्याला शिक्षणासाठी जर बँकेमधून शैक्षणिक कर्ज काढायचे असेल तर त्याबद्दलची माहिती मिळू शकते.ह्याच पोर्टलचा उपयोग करून आपण सर्व राज्यांच्या रोजगार कार्यालयांशी (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज) जोडले जाऊ शकतो. या रोजगार कार्यालयांच्या साईट्सवर उपलब्ध असलेल्या सर्व सरकारी नोकर्‍यांची यादी व इतर माहिती असते. या पोर्टलवर सर्व सरकारी संस्था व कंपन्यांच्या परीक्षांचे अर्ज असतात व ते आपण डाऊनलोड करु शकतो. याच पोर्टलचा उपयोग करून भारतीय सेनादलातील पूर्व कर्मचारी, शहीद जवानांच्या पत्‍नी व सेनादल कर्मचार्‍यांच्या परिवारातील सदस्य, आर्मी वेलफेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या (AWPO) साईटवरून नोकर्‍यांसाठी अर्ज करू शकतात. याच AWPOच्या साईटवर आपला बायो-डेटा कसा तयार करावा इथपासून ते मुलाखत कशी द्यावी इथपर्यंतच्या सूचना दिल्या आहेत. त्या कोणीही वाचू शकतो व ज्या नोकरीच्या शोधात फार उपयोगी ठरू शकतात.

कर-शुल्क आणि उद्योग

हे पोर्टल आपल्याला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या साईटशी जोडते. या साईटवर आपण सर्व सरकारी करांचे टॅक्स व शुल्कांची पूर्ण माहिती घेऊ शकतो. ह्याच साईटचा उपयोग करून आपण आपला कर, ऑनलाईन भरू शकतो. शिवाय करांचा रिफंड, चलान, शिपिंग बील, PAN / TAN कार्ड, इत्यादिची प्रक्रिया कुठपर्यंत पोचली आहे तेही पाहू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण PAN / TAN कार्डांसाठीची नोंदणी, पुनर्नोंदणी व बदलांसाठीचा अर्ज ऑनलाईनच करू शकतो. यामुळे आपला भरपूर वेळ तर वाचतोच शिवाय पारदर्शक व्यवहाराची खात्री मिळू शकते. त्याशिवाय ह्या साईटवर आपण किती कर भरावा याचीही माहिती मिळते. 

या पोर्टलच्या उपयोगाने आपण भारत सरकारच्या, उद्योगांना चालना देणार्‍या अनेक साईट्सशी जोडले जाऊ शकतो उदा: http://coirboard.nic.in, http://coconutboard.nic.inhttp://cibrc.nic.in, इत्यादि. या साईटसकडून आपल्याला उपयुक्त मासिके ही ईमेल केली जातात. ह्याच पोर्टलच्या उपयोगाने आपण आपल्या राज्याच्या हवामानाचा अंदाज नियमितपणे घेऊ शकतो. शेतकर्‍यांना याचा फार मोठा लाभ होतो. त्याशिवाय कमॉडिटी व फ्यूचर्स बाजारातील किंमतीसुद्धा आपण या पोर्टलच्या सहाय्याने जाणून घेऊ शकतो.

सर्व सरकारी विभागातील तक्रार नोंदणी, पोलीस

ह्या पोर्टलद्वारे आपण केंद्रीय सतर्कता आयोगाच्या (सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन) साईटशी जोडले जाऊ शकतो. ह्या साईटवर आपण कोणत्याही केंद्र सरकारी मंत्रालय, विभाग, अस्थापने (कंपनी), इत्यादींच्या कर्मचार्‍यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. त्याशिवाय या पोर्टलद्वारे आपण प्रशासकीय सुधार व लोक तक्रारविभाग (डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटीव्ह रीफॉर्मस ऍड पब्लिक ग्रिव्हंसेस) च्या साईटशी जोडले जाऊन, आपण येथे कोणत्याही क्रेंद्र, राज्य व स्थानिक सरकारी मंत्रालय, विभाग, संस्था, अस्थापने (कंपनी), इत्यादिच्या कर्मचार्‍यांच्या विरुद्ध ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. या सर्व तक्रारींचा पाठपुरावा ही आपण ऑनलाईनच करू शकतो.

या पोर्टलच्यामार्फत आपण सर्व राज्यांच्या पोलीस यंत्रणांच्या साईट्सशी जोडले जाऊ शकतो. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तींची माहिती, चोरीला गेलेल्या व सापडलेल्या मोटारींची माहिती, अनोळखी मृतदेहांची नोंद व माहिती, अटक केलेल्या व कारागृहात डांबलेल्या लोकांची नावे, इत्यादि आपल्याला येथे पाहता येते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस महानिदेशक डी. शिवानंदन यांनी लवकरच FIR (फर्स्ट इंन्फरमेशन रिपोर्टची) ऑनलाईन नोंद करण्याची सोय उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. जेव्हा कधी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तेव्हा ती या पोर्टलच्यामार्फतही नक्कीच उपलब्ध होईल.

सरकरी दस्तावेज

या पोर्टलच्या मदतीने आपण आपले जात, जन्म, मृत्यू व डोमिसाईल प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मिळवण्याची प्रक्रिया कुठपर्यंत पोचली आहे ते  देखील ऑनलाईन पाहू शकतो. त्याशिवाय पासपोर्ट मिळवण्यासाठीच्या प्रकियेची संपूर्ण माहिती व त्यासाठी लागणारे सर्व अर्ज या पोर्टलद्वारे उपलब्ध होतात. विदेश दौरा करण्यासाठी पासपोर्टबरोबर त्या देशाच्या व्हिसा (देशात प्रवेश करण्याचा परवाना) मिळविण्याची गरज असते. तो मिळविण्यासाठी त्या ज्या देशात जायचे आहे त्या देशाच्या दूतावासात जावे लागते. भारतात ज्या देशांचे दूतावास आहेत त्या सर्व देशांची यादी त्यांच्या पत्त्यांसकट व त्यांच्या कार्यालयीन वेळेसकट या पोर्टलच्या मदतीने आपल्याला मिळवता येते.

सरकारी कायदे व नियम

या पोर्टलवर भारताचे संपूर्ण संविधान PDF फॉरमॅटमध्ये आहे. भारतीय संसदेने व सर्व राज्याच्या विधानसभा-विधानपरिषद यांनी संमत केलेले सर्व कायदे आणि सर्व सरकारी विभागांनी संमत केलेले कायद्यांचे तपशील या पोर्टलवर नियमित प्रकाशित केले जातात. नियम, अधिनियम, विवरणिका (गॅझेटियर्स), ऍक्ट व त्यातील बदल त्यातील तळटीपांसकट  सेक्शन्स, शेड्युल्स या पोर्टलवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे भारतीय संसदेने १८३४ पासून संमत केलेले सर्व कायदे व त्यांचा तपशील या पोर्टलवर आहे. केंद्र व सर्व राज्य सरकारांनी उद्घोषित केलेल्या सर्व लोकोपयोगी योजनांचा सर्व तपशील व त्यांचा सामान्य माणसाला होणारा उपयोग ह्याची माहिती या पोर्टलवर आहे.

टेलिफोन व दूरसंचार

टेलिफोन डिरेक्टरी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पिवळ्या रंगाचे गलेलठ्ठ पुस्तक येते. पण या पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन डिरेक्टरी उपलब्ध आहे. या डिरेक्टरीमध्ये आपण आपल्याला ज्या व्यक्तीचा / संस्थेचा दूरध्वनी क्रमांक हवा आहे त्याचे नाव, शहर व राहत असलेल्या विभागाचे नाव टाकले की आपल्याला त्या व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक मिळतो. या पोर्टलवर पिन-कोड फाईंडरसुद्धा आहे, ज्यामध्ये फक्त आपल्याला हव्या असणार्‍या विभागाचे नाव टाकले की त्याचा पिनकोड आपल्याला मिळतो. शिवाय भारताच्या सर्व शहरांचे STD क्रमांक व जगातील सर्व देशांचे ISD क्रमांकांची यादी या पोर्टलवर आपल्याला मिळू शकते. आपल्याला पत्र पाठविण्यासाठी लागणारे पोस्टेजची किंमतसुद्धा या पोर्टलद्वारे काढता येते. BSNL ही मोबाईल फोनची सेवा देणारी सरकारी संस्था असल्याने या पोर्टलवरुन आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपले मोबाईलचे बिल तपासू शकतो, भरू शकतो, त्याची प्रिंट घेऊ शकतो व त्याचबरोबर आपल्याला बिलाचे SMS येण्यासाठी मोफत सदस्यत्वही घेऊ शकतो. दूरसंचार सेवादात्यांच्या व्यवसायासाठी लागणार्‍या विविध परवान्यांचे अर्ज या पोर्टलद्वारे दूरसंचार मंत्रालयाच्या साईटला जोडून उपलब्ध केले जातात उदा. इंटरनेट टेलिफोनी, दूरसंचार मूलभूत-सुविधादाता, एकीकृत अभिगम सेवा (युनिफाईड ऍक्सेस सर्विस), वी.सॅट, दूरसंचार व बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, सार्वजनिक रेडियो ट्रंकिंग, सेल्युलर मोबाइल टेलिफोन, वॉईस मेल, एकीकृत संदेश व ऑडियोटेक्स सेवा, ग्लोबल सॅटेलाइट सेवा, इत्यादिंच्या परवान्याच्या अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे त्याची स्थिती हे सेवादाते या पोर्टलवरच पाहू शकतात.

मनोरंजन व पर्यटन

या पोर्टलच्यामार्फत आपण डी.डी. वाहिनीवरचे सर्व कार्यक्रमांचे व्हिडीओज थेट (लाईव्ह) व रेकॉर्डेडही पाहू शकतो. त्याशिवाय भारतातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती ही ह्या पोर्टलवर उपलब्ध आहे. हल्ली काही पर्यटकांची काही टूर ऑपरेटर्सकडून फसवणूक होत असल्याने या पोर्टलवर सर्व सरकारमान्य टूर ऑपरेटर्सची यादी आहे.

सरकारी अधिकार्‍यांची माहिती

या पोर्टलवर सर्व प्रमुख पुढारी, नेते (राष्ट्रपती, उप-राष्ट्रपतीपंतप्रधान, केंद्रीयमंत्री, राज्यपाल, नायब-राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार) व सुप्रिम कोर्टाचे सर्व न्यायाधीश आणि सर्व सुरक्षा दलांच्या प्रमुखाचे बायोडेटा आहेत.आत्ताच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. के.शंकरनारायणन यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की मी एका अशा भारताचे स्वप्‍न बघत आहे की जिकडे प्रत्येक नागरिकाला इंटरनेट वापरुन कुठूनही मतदान करता येईल’. सरकारचे तशा दृष्टीने प्रयत्‍नही चालू आहेत व त्यांच्या अंदाजानुसार हे २०१२ साली शक्य होईल. असे झालेच तर ऑनलाईन, डिजिटाईज्ड व पेपरलेस सरकार व ऑफिस घडविण्याच्या सरकारी प्रयत्नांचा तो एक अत्यंत महत्त्वाचा व मोठा टप्पा असेल. वरील सर्व सरकारी प्रयत्नांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा आपण सरकारी कामांसाठी इंटरनेटचा योग्य उपयोग करून आपला व सरकारचा वेळ व पैसा वाचवू शकू. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे प्रशासकीय व्यवहारात पारदर्शकता येईल. त्यामुळे गैरव्यवहारांच्या विरोधात पोकळ बडबड करण्यापेक्षा आपण, उपलब्ध करून दिलेल्या या पोर्टलचा अधिक प्रभावीपणे वापर करणं अधिक सयुक्तिक ठरेल, नाही का!