Saturday, November 9, 2013

जुने मित्र, नवे स्वरुप (ई-बुक्स्)

The saying, 'books are our best friend' has been known to everyone of us, be it printcopy books, ebooks or anything else. I am an avid reader but frankly I was not so till I met Sadguru Bapu. Not just an avid but, Bapu is a voracious reader. I have attended many seminars taken by Him and have been amazed by the level of knowledge He has simultaneously in so many fields and too not just at bookish but at very practical level. Attending these seminars made me to awe and admire this wealth of knowledge and I too developed liking for books. 

After understanding this importance I was fortunate to get a chance to pen-down an article on ebooks in my series in Pratyaksha. Here I am presenting the 12th article of my series from Pratyaksha, written on free ebooks. The article has featured in 4th February 2011 issue of Pratyaksha. जुने मित्र, नवे स्वरुप (ई-बुक्स्)

ऑफिसमध्ये बसलो होतो. मिटींगसाठी एक क्लायंट आला होता. मिटींगला थोडा वेळ असल्याने तो मला म्हणाला मी जरा पुस्तक वाचत बसतो. मला वाटल की हा कोणतीतरी जाडजूड कादंबरी किंवा पुस्तक काढून वाचत बसेल. पण त्याने मोबाईल सारखी दिसणारी एक वस्तू काढली व वाचत बसला. मी थोड्या वेळाने त्याला ती वस्तू काय आहे म्हणून कुतूहलाने विचारले. तर तो म्हणाला की ह्याला किंडल असे म्हणतात जे एक ई-बुक रीडर आहे व हे अख्ख्या जगभरात पुस्तकं, वर्तमानपत्र, मासिकं, ब्लॉग्ज्‌ व इतर डिजीटल माध्यमातील साहित्य वाचण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. आपण पुढे या लेखात किंडल बद्दल नाही तर या ई-बुकस् म्हणजेच डिजिटल माध्यमातील साहित्याबद्दल जाणणार आहोत.

पूर्वी पुस्तकं वाचायची म्हटलं की आपण ग्रंथालयाचं सदस्यत्त्व घेऊन तिथून पुस्तक आणायचो. पण आता पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्रं हे सारे साहित्य डिजीटल माध्यमामध्ये  (सॉफ्ट फॉरमॅट) उपलब्ध आहे जे आपण संगणक व इंटरनेट व आता मोबाईलरुन ही वाचू शकतो. www.booksshouldbefree.comwww.gutenberg.orgwww.manybooks.netwww.getfreeebooks.comwww.upscportal.comhttp://ebooks.netbhet.comwww.boltipustake.blogspot.comwww.free-ebooks.netइत्यादी ही अशीच काही संकेतस्थळे आहेत ज्यावरुन आपण पुस्तकं, मासिकं, इत्यादी मोफत वाचू शकतो व डाऊनलोड ही करू शकतो.

पुस्तक म्हटले की आपल्याला फक्त शाब्दिक (टेक्सशुअल) पुस्तक एव्हढीच आपली कल्पना असते. हल्ली नव-नवीन मनोरंजनाच्या माध्यमांमुळे वाचनाची आवड काहीशी कमी झाल्याचे जाणवते आहे. अनेक ग्रंथालये ओस पडली आहेत व काही तर बंदही झाली आहेत. म्हणूनच बदलत्या काळाबरोबर या साईटस्‌च्या माध्यमातून आपण आता साहित्याच्या बदललेल्या संग्रहा व स्वरुपाकडे वळलेलो आहोत. म्हणूनच या साईटस्‌
र शाब्दिकच नव्हे तर ऑडियो फॉरमॅट मध्येही पुस्तके उपलब्ध आहेत. ऑडियो पुस्तके म्हणजेच या साईटस्वरील पुस्तकं निवडायची व ती प्ले करायची की त्यातील मजकूर आपल्याला वाचावा लागत नाही तर आपण जशी गाणी ऐकतो तसा त्यातील मजकूर ऐकू येतो. www.booksshouldbefree.com ह्या साईटवरील सर्व पुस्तके ही ऑडियो बुक्स्‌च आहेत. या साईटवरील काही प्रसिद्ध पुस्तकांची नावं सांगायची झाली तर त्यामध्ये लुईस कॅरल यांचे ऍलिस इन वंडरलॅड, सर आर्थर डॉईल यांचे द ऍडव्हेंचर्स् ऑफ शेरलॉक होमस्जोनॅथन स्विफ्ट यांचे गलिव्हर्स् ट्रॅव्हलस्, इत्यादि पुस्तके आहेत. ह्या साईटशिवाय www.gutenberg.org  ही सुद्धा अशीच एक ऑडियो पुस्तकांची साईट आहे.

www.manybooks.net
 या साईटवर २९,००० ई-बुक्स् उपलब्ध आहेत. सौंदर्य आणि फॅशन, जीवन-शरीर, व्यापार, नाटक, अर्थशास्‍त्र, शिक्षण, खाद्य-व्यंजने, खेळ, इतिहास, हास्यविनोद, रहस्य, काव्य, राजकारण, मनोविज्ञान, धर्म, विज्ञानकल्पित वाडमय, प्रवासवर्णने, या व अशा जवळ-जवळ ४० विषयांवर विविध पुस्तके उपलब्ध आहेत. कोणतेही पुस्तक निवडून वाचण्यासाठी या साईटस्वर विविध पर्याय (फिलर्टस्) उपलब्ध आहेत उदा., लेखकशिर्षक, शैली (जेनर्स्‌), भाषा, इत्यादी. ह्या साईटच्या शिवाय www.free-ebooks.net व www.getfreeebooks.com या सुद्धा साईटस् उपलब्ध आहे. या साईटस्‌वरसुद्धा हे सर्व फिचर्स् उपलब्ध आहेत. त्याशिवाय या सर्व साईटस्‌वर सर्वात प्रसिद्ध व नवप्रकाशित अशा पुस्तकांच्या वेगळ्या याद्या ही आहेत. या साईटस्वर आपण स्वत: लिहिलेली पुस्तकेही मोफत प्रकाशित (अपलोड) करू शकतो.
तसेच या साईटस्वर ई-बुक्स् बरोबर ई-मासिकेही मोफत उपलब्ध आहेत उदा: ग्लोबल फायनान्स्
, वर्लड इंडस्ट्रीयल रिपोर्टर, नासा टेक ब्रीफ्स्, इत्यादी. या साईटस्वर अनेक विषयांवर उदा. कृषि, मोटार उद्योग, अभियांत्रिकी, शिक्षण, अर्थशास्‍त्र, स्वास्थ्य आणि चिकित्सा, माहिती तंत्रज्ञान, इत्यादि विषयांवरील मासिके आपल्याला मोफत सबस्क्राईब करता येतात. आपण या लेख-मलिकेत अगोदर पाहिल्या प्रमाणे 
www.upscportal.com या साईटवरूनही आपल्याला मोफत मासिकं मिळतात. यात सर्व जगातील व खास करून भारतातील सर्वच घडामोडींवर उत्कृष्ट लेख व माहिती असते. मासिकांमध्ये  हिंदू या अग्रगण्य वृत्तपत्र समूहाचे फ्रंटलाईन (मासिक) व इतर मासिकांमध्ये प्रतियोगिता दर्पण (मासिक), योजना (मासिक), डेव्हलप इंडिया (साप्ताहिक), डायलॉग इंडिया (द्विमासिक) आपल्याला मोफत मिळतात. या मासिकांच्या PDF प्रती आपण ह्या साईटस्‌वरूनच थेट डाऊनलोड करू शकतो.
द गार्डीयनच्या एका सर्वेक्षणाप्रमाणे २४ तास चालणार्‍या बातमी वाहिन्यांमुळे
, वाचनाची आवड कमी होणे व वेळेच्या अभावामुळे जगभरात वर्तमानपत्रांचा खप कमी होत आहे. त्यामुळेच जगभरातीलच नव्हे तर भारतातीलसुद्धा सर्व राष्ट्रीय व प्रांतिक वर्तमानपत्रांनी आपले ई-पेपर्स काढले आहेत. मुख्यत: हे ई-पेपर आपल्याला ह्या वर्तमानपत्रांच्या साईटस्वर मोफत वाचायला मिळतात. काही वर्तमानपत्रांचे ई-पेपरस् वाचायला आपल्याला त्यांच्या साईटची सदस्यता घ्यावी लागते, जी मोफत मिळते तर काही निवडक वर्तमानपत्रांचे ई-पेपर्स वाचायला आपल्याला त्यांच्या साईटचे मुल्य देऊन सदस्यत्त्व स्वीकारावे लागते.
आता थोडे आपण आपल्या मराठी मुलखात वळूया. वरील उलेखीलेल्या सर्व साईटस्‌वर आपण इंग्रजी व इतर परदेशी भाषांमधील साहित्यच वाचू शकतो. जर आपल्याला मराठी भाषेतील साहित्य वाचायचे असेल तर
 
http://ebooks.netbhet.com ही एक साईट आहे. संदीप खरे, रघुनाथ भिडे, इत्यादि चांगल्या लेखकांची पुस्तके या साईटस्वर उपलब्ध आहेत. उदाहरणेच द्यायची झाली तर मी माझा, शिवाजी राजे, गरुडांच्या सहवासात, इत्यादी पुस्तके ह्या साईटवर उपलब्ध आहेत. www.marathinovels.net ही सुद्धा एक साईट आहे ज्यावर आपल्याला मराठी ई-पुस्तके मिळतात. www.boltipustake.blogspot.com हा एक अत्यंत सुंदर मराठी ब्लॉग आहे ज्यावर मराठी ऑडियो पुस्तके आहेत. उदा. आगरकर दर्शन, लोकहितवादींची शतपत्रे, अमोल गोष्टी (साने गुरुजी), श्यामची आई (साने गुरुजी), शेतकर्‍याचा आसूडसत्याचे प्रयोग, गोष्टी इसापच्या,अशी अत्यंत दर्जेदार पुस्तके, ऑडियो फॉरमॅटमध्ये आहे www.scribd.com व www.slideshare.net या सोशल पब्लिशिंग साईटस्वरही आपल्याला सांकेतिक शब्द (की वर्डस्) वापरून, जर शोध घेतला तर अनेक उपयुक्त व हवे असलेले भरपूर मराठी साहित्य मिळू शकते.

www.anynewbooks.com
 ह्या साईटवर आपण आपले नाव नोंदवले (मोफत) व आपला ईमेल आय.डी. या साईटवर दिला की आपल्याला त्यांच्याकडून दर आठवड्याला एक ईमेल येते ज्यात त्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नवीन पुस्तकांची नावे व माहिती असते. त्याशिवाय www.amazon.comwww.sahyadribooks.com इत्यादी अनेक इतर साईटस् आहेत ज्यावरून आपण पुस्तके विकत घेऊ शकतो.

जर आपल्याला वाचनाची आवड असेल तर
, ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक पर्यायांचा उपयोग करू शकतो व त्यासाठी आपल्याला जागेचे, काळाचे, साधनांचे व वेळेचे बंधन आड येऊ शकत नाही.