Wednesday, December 30, 2015

Fall in Oil Prices a boon to importer India

Oil price fall is a chance to enhance Energy Security says Petroleum Minister Dharmendra Pradhan. In recent Russia visit of Prime Minister Narendra Modi India has taken to invest in Russian fuel companies Gazprom and Rosneft. Earlier India has already started to invest strategically in Vietnam, Myanmar, Iran, Oman, Iraq, Kazakhstan, Nigeria, Mozambique, Sudan, Libya, South Sudan, Brazil, Colombia, Cuba, Venezuela, etc.
Now Rs. 2 lac crore saved by India with crude prices fall will be big factor, which will make further investments in energy sector possible.



Tuesday, December 29, 2015

Is there a shift in alliance of ‎Merkel‬'s ‎Germany‬?

Interesting news... 
21 December 2015: German teachers aim to teach ‪#‎MeinKampf‬ in Germany to counter to help “immunize” youngsters against far-right ideologies.

24 December 2015: ‪#‎Hitler‬’s Mein Kampf (believed to be anti-Semitic by experts) fine for use in classrooms: German Education Minister Johanna Wanka.

Welcoming ‪#‎Migrants‬ on one side and these two news on the other, Is there a shift in alliance of ‪#‎Merkel‬'s ‪#‎Germany‬?

Monday, December 21, 2015

Shree Satchidanand Utsav given by Sadguru Aniruddha Bapu

Hari Om. This weekend was a spiritual holiday. It was that Saturday of the holy month of Margashirsha when Shraddhavans celebrate ‘Shree Satchidanand Utsav’ (Festival of Everlasting Happiness) i.e. worshipping of padukas of their Sadguru at their homes.

It is believed that on observing of Shree Satchidanand Utsav, Sadguru maintains His holy metaphysical existence in our homes for the next entire year, till the celebration of the next Utsav (festival).

Setting up of Poojan of Shree Satchidanand Utsav
We performed the poojan at the early hour of Brahma Muhurta also known as ‘God’s Hour’ (timed in the pre-dawn hours between 3:20 am and 4:40 am as correctly told by Sadguru Aniruddha Bapu). It was really enjoyable, refreshing, pious and love-filled hour of devotion to perform this poojan. The peace and tranquillity that is experienced at this quiet hour is unmatched and extremely calming. Moreover the soothing ‘Shraddhavan dress’ comprising of all-white lungi, uparna and shirt was adding to this peace of mind.

Shraddhavan dress used in Vedic religious ceremonies
Later, the day was spent reciting name of Sadguru and holy mantras like Gurukshetram Mantra, etc. The most enjoyable was the time spent in vicinity of the Sadguru Padukas while having food which was specially prepared considering those foods having properties that aid mental-physical development and well-being as described by Sadguru Aniruddha Bapu in ‘Shreemad Purushartha Grantharaj – Premprawas’, and is also low-fat at the same time.  

Sadguru Padukas of Shree Satchidanand Utsav

Two days just zapped past and the time of departing arrived. It was the time of Punarmilap or what is colloquially knows as visarjan, of Sadguru Padukas. But it was departure only of the physical padukas. HE always would continue to be in hearts and minds of all the Shraddhavans at all times; equally in their joys and hardships. Hari Om, Sriram, Ambadnya.

 (PS: Shree Satchidanand Utsav can be celebrated either for 2-days or 5-days, at the convenience of the worshipper. If you read the rule book of Shree Satchidanand Utsav I am sure you will find it to be the simplest and the most liberal Vedic religious ritual which emanates only and only from the love of the devotees towards his or her God. It is so considerate that it even prescribes a separate and rather ritualistically more simpler process, in case a devotee has a difficulty in reading).

Jai Jagdamb Jai Durge

Tuesday, December 15, 2015

Healing of Back Pain with grace of Aniruddha Bapu. (Experiences from Faith)

This narration of mine describes my experience of healing of back pain without any medicines with divine blessings of Sadguru Aniruddha Bapu


Hari Om, Sriram, Ambadnya

Tuesday, December 8, 2015

ऑफिस ऑफिस - Freeware Office Suites

This article has been published in Dainik Pratyaksha on 29th April 2011. The article talks about various available Office Applications and suites which are Freewares. Recollecting about Office Apps / softwares and their uses, I recollect Sadguru Aniruddha Bapu once explaining us during a seminar about making of a website using a simple Word file and it was a shock! But I am no longer a stranger to shocks like these. I all the seminars that we have had with Bapu, He has always been giving us totally innovative ingenuous tips, tricks and solutions. Anyways... let us now proceed to our subject.


ऑफिस-ऑफिस

काही दिवसांपूर्वी एका क्लायंट कडे गेलो होतो. तेथे असताना मला चटकन एक डॉक्युमेंट बनवायचे होतो. त्यासाठी त्यांनी मला एक कॉंप्युटर दिला. पण या कॉंप्युटरची ऑपरेटींग सिस्टिम व ह्या संगणकावरचे ऑफिस सॉफ्टवेअर सूट हे आपण सर्वसाधारण पणे वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटींग सिस्टिम (ओ.एस.) विंडोज पेक्षा वेगळे होते. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा कळले की त्यांची ऑपरेटींग सिस्टिम लिनक्स व ऑफिस सॉफ्टवेअर सूट ओपन ऑफिस होते. त्यानंतर त्यांनी एक मोठा धक्काच दिला. ज्या ओ.एस. व ऑफिसच्या सूटसाठी एक साधारण १५-२० माणसांच्या कंपनीला काही हजारात खर्च येतो तिच ओ.एस. व ऑफिस सूट हे ह्या क्लायंटच्या कंपनीला संपूर्णपणे मोफत मिळाले होते. हाच आपल्या आजच्या आपल्या भागाचा विषय हा मोफत ऑफिस सॉफ्टवेअर सूटस् आहे.


ऑफिस सॉफ्टवेअर सूटला काही वेळेस प्रॉडक्टिव्हिटी सूट असे ही म्हणतात. उदाहरणच द्यायचे झाले तर वर्ड, एक्सेल, पॉवर-पॉइंट, नोटपॅड इत्यादी प्रोग्रॅमस् वापरून आपण जी डॉक्युमेंटस् तयार करतो, ती ऑफिस सॉफ्टवेअर सूटमध्ये मोडतात. मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस सूटस्‌मध्ये मायक्रोसॉफ्टचा सूट सर्वात वापरला जाणारा आहे. पण मायक्रोसॉफ्टचे सर्वात बेसिक ऍप्लिकेशन हे साधारणत: अडीच-तीन हजार रुपयांच्या आसपास मिळते. त्यामुळे आपण उपलब्ध असलेल्या काही मोफत ऑफिस सूटस्बद्दल जाणून घेऊ या. http://office.live.com, www.openoffice.org इत्यादि साईट्स् व ऍप्लिकेशन्स्चा उपयोग करुन आपण ऑफिस सूटच्या सर्व मुख्य सुविधांचा फायदे घेऊ शकतो.

http://office.live.com
वर उल्लेखिल्याप्रमाणे आपण जाणून घेतलेच आहे की मायक्रोसॉफ्टचे बेसिक एडिशन हे मोफत नाही. पण मायक्रोसॉफ्टचे आपले एक मर्यादित, ऑनलाईन संस्करण (व्हर्जन) काढले आहे ज्याचे नाव लाईव्ह ऑफिस असे आहे. ह्यामध्ये आपण वर्ड, एक्सेल, पॉवर-पॉइंट व वननोट ही चार साधारणत: वापरली जाणारी डॉक्युमेंट्स ऑनलाईन बनवू व वापरू शकतो.


आवश्यक कॉन्फिगरेशन
काही साईट वापरण्यासाठी आपल्याला आपले हॉटमेल किंवा विंडोज् लाईव्हचे खाते असणे गरजेचे असते (हे खाते मोफत उघडता येते). ह्या व्हर्जनला ऑफिस लाईव्ह सूट असे म्हणतात. ह्या व्हर्जनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या बेसिक एडिशनच्या तुलनेत फक्त काही प्रगत फिचर्स नाहीत (ज्यांची साधारणत: गरज नसते). ह्या साईटचा एक अतिरिक्त उपयोग म्हणजे कोणतेही ऑनलाईन बनवलेले डॉक्युमेंट आपण ऑफलाइन असतानाही पाहू शकतो. पण त्यासाठी आपल्या संगणकावर लाईव्ह ऑफिस सूट इन्स्टॉल्ड असणे गरजेचे असते. त्याशिवाय जर आपण मायक्रोसॉफ्टचेच सिल्व्हरलाईट हे फ्रेमवर्क इन्स्टॉल केलेले असेल तर आपल्याला डॉक्युमेंट्स जास्त चांगली व लवकर दिसू शकतात.

आपली डॉक्युमेंट्स व्यवस्थित साठवण्यासाठी आपल्याला आपल्याला ह्या साईटवरच्या खात्यात फोल्डर्स् बनवता येतात. आपण बनवलेल्या डॉक्युमेंट्स दुसर्‍यांनी बघण्याचा अधिकार आपण ठरवू शकतो. त्यामुळे ही डॉक्युमेंट्स आपल्या व्यतिरिक्त आपल्या खात्यातील आपल्या संपर्क यादीतीला संपर्कांना किंवा इतर सगळ्यांना दिसण्याची किंवा न-दिसण्याची व्यवस्था आपल्याला करता येते. या साईटवर आपण फोटोज् अपलोड करू शकतो. हे फोटोचे विविध अल्बम्स देखील आपण बनवू शकतो. ह्या आपल्या ऑफिस लाईव्ह खात्यात आपला हॉटमेल व विंडोज् मेसेंजरचा अकाऊंटही इंटिग्रेट केलेला असतो. ही सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन सेव होतात. ती आपण आपल्या संगणकावरही डाऊनलोड करू शकतो. ही साईट वापरताना आपल्याला काही वेळेस डॉक्युमेंट्स न उघडण्याची असुविधा होऊ शकते. त्यावेळेस आपण आपल्या ब्राऊझरमधील ऍडऑनस् रन करण्याची अनुमती द्यावी लागते. 


www.openoffice.org
हल्ली सुरू झालेल्या ओपन-सोर्सच्या (फ्रीवेअर) जमान्यात, कॉर्पोरेट जगतात सर्वात प्रचलित असणारा ऑफिस सूट म्हणजे ओपन ऑफिस (
www.openoffice.org). ह्या ओपन ऑफिसने मायक्रोसॉफ्टच्या विंडोजसाठी चांगलीच स्पर्धा निर्माण केली आहे. ह्या ओपन ऑफिस सूटला लायसन्स लागत नाही, म्हणजेच हा एक मोफत ऑफिस सूट आहे. विंडोजसारखे आपण ह्यावर ऑफलाईनही काम करू शकतो www.openoffice.org ह्याच साईटवरील डाऊनलोड सेक्शन आपण ह्या प्रोग्रॅमची एक्झीक्यूटेबल फाईल डाऊनलोड करून मग इन्स्टॉल करू शकतो. त्यानंतर जसे आपण मायक्रोसॉफ्टच्या विविध व्हर्जनस् (उदा: एक्स.पी., २००३, २००७ इत्यादी) मध्ये जशी विविध प्रकारची उदा: वर्ड, एक्सेल, पॉवर-पॉइंट, नोटपॅड डॉक्युमेंट्स बनवतो व वापरतो, त्याचप्रमाणे आपण ओपन ऑफिसमध्येही ती बनवू व वापरू शकतो. त्याशिवाय मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये तयार केलेली डॉक्युमेंट्ससुद्धा ओपन ऑफिसमध्ये वाचता व त्यावर कामही करता येते.

इतर ऑफिस सूटस्ओपन ऑफिस व लाईव्ह ऑफिसच्या व्यतिरिक्त अनेक इतर ऑफिस सूटस्‌सुध्दा उपलब्ध आहेत. फेंग ऑफिस, निओ-ऑफिस, जीनोम ऑफिस, लायबर ऑफिस हे ओपन-सोर्स (फ्रीवेअर) म्हणजेच मोफत ऑफिस सूटस् आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या व्यतिरिक्त ही इतर अनेक मूल्यांकित ऑफिस सूटस् उपलब्ध आहेत उदा: ऍबिलिटी ऑफिस, सेलफ्रेम ऑफिस, ब्रेडबॉक्स ऑफिस, शेअर ऑफिस, इत्यादि.

गुगलचे डॉक्स् हेही अत्यंत उपयुक्त, मोफत व ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. शिवाय गुगल डॉक्स् हे जीमेल मध्येच एकत्रित केलेला आहे व जी-मेल मधील ऍटॉचमेंट्स थेट गुगल डॉक्स्मध्येच जोडल्या जातात. त्याशिवाय गुगल डॉक्स् हे ऑनलाईन असल्यामुळे त्यातील डॉक्युमेंटवर कुठून ही काम करता येते.

Wednesday, October 14, 2015

विम्याचा महिमा - Online Insurance and Loans

Financial Management has always been the crux of success at home, office or any organization. Use of various apps, websites and services enabled through use of information technology has made the basics of this arena easy and interesting. Let us take a peep at some. The following article had appeared in 22nd April 2011 issue of Dainik Pratyaksha. (Some of the features may have been added or deleted after the posting date till today). 
--

विम्याचा महिमा

विमा ही आम्हा भारतीयांसाठी फार जुनी अगदी कौटील्याचा अर्थशास्त्रापासून चालत आलेली संकल्पना आहे. भारतात सर्वात पहिल्या विमा कंपनीची स्थापना 1818 मध्ये कलकत्त्याला झाली. भारताची अर्थव्यवस्था 1992 मध्ये मुक्त झाली व तेव्हापासून आजपर्यंत हे क्षेत्र 200 टक्क्याने वाढत आज 2000 अब्ज रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. पण तरीही ह्या क्षेत्राबद्दल व त्यातील व्यवहारांबद्दल सामान्यांचे ज्ञान हे त्यांच्या इन्शुुरन्स एजंटच्या पलीकडे नाही. आजच्या लेखातून आपण काही संकेतस्थळे पाहूया ज्यांच्या मदतीने आपण आपले विमा क्षेत्राचे ज्ञान वाढवून, विमा उतरवताना आपल्या निदान आवश्यक तेवढी माहिती तरी असेल ह्याची खात्री करू या. या साईटची मदत तर आपल्याला नक्कीच होईल पण ह्या साईट विशिष्ट मर्यादेपर्यंत वापरासाठी मोफत आहे. www.policybazaar.comwww.apnapaisa.com ह्या त्या साईटस्.



या साईटच्या मदतीने आपण विविध कंपन्यांच्या आयुर्विमेत्तर विमा (General Insurance), जीवन विमा (Life Insurance), क्रेडिट कार्डस् व कर्जाच्या (Loans) योजनांबद्दल जाणून व समजून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण पॉलिसीबझारवर आपल्याला विमा उतरवण्यासाठी लागणारी माहिती साईटवर टाकतो त्यावेळेस आपल्याला विविध विमा कंपन्याच्या विमा योजनांचा तुलनात्मक तक्ताच समोर उघडतो. पॉलिसीबझारवर जनरल इंशुरंन्स्‌ मधील गाडी, स्वास्थ्य, ट्रॅव्हल, घर व कॉर्पोरेट विमा, जीवन विम्यातील गुंतवणूक पॉलिसी, पेंशन, टर्म, बाल, मनीबॅक, मासिक वेतन, गॅरंटीड प्लॅन, इत्यादि विम्यांची माहिती आपल्याला मिळते. त्याशिवाय क्रेडिट कार्डस् व कर्जाच्या योजनांचा तुलनात्मक तक्तादेखील आपल्याला ह्या साईटवर मिळतो. यात कमीत-कमीत 20 कंपन्यांच्या विविध योजनांची माहिती दिलेली असते.

ऑनलाईन पॉलिसी
त्याशिवाय आपल्याला या साईटवरून गाडी, स्वास्थ्य, जीवन, ट्रॅव्हल व कॉर्पोरेट विमा उतरवण्यासाठी ऑनलाईन सोयदेखील उपलब्ध आहे. ज्यावेळेस आपण ह्या साईटकडून विमा विकत घेतो त्यावेळेस आपल्याला विमाशुल्क (Premium) भरण्यासाठी चेक, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगची सुविधादेखील वापरता येते. विमा उतरवताना आपल्याला वर उल्लेखिलेल्या तक्त्याची मदत तर घेता येतेच पण त्याशिवाय 0124 - 457 6777 ह्या 24 तास चालणार्‍या हेल्पलाईन नंबरवर फोन करून आपल्याला ह्या साईटच्या प्रतिनिधींचा सल्ला देखील मिळू शकतो. या साईटने आपल्या सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षेची चांगली काळजी घेतली आहे. त्यासाठी ही साईट एस.एस.एल. सिक्युर सर्टिफिकेटचा (SSL encryption) उपयोग करते. साईट ही माणसाला पर्याय ठरू शकत नाही पण ह्या साईटचे काही फायदे आपण नक्कीच घेऊ शकतो. 

पॉलिसी घेतल्यानंतर ह्या साईटचा उपयोग
पॉलिसी घेताना आपल्याला ह्या साईटवर आपले खाते उघडावे लागते. ह्या खात्यामुळे आपण आपल्या सर्व ऑनलाईन केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवू शकतो. त्याशिवाय आपण उतरवलेली पॉलिसीची प्रत प्रिंट करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या पॉलिसीमध्ये बदलदेखील करू शकतो. त्याशिवाय पॉलिसी रद्द व नूतनीकरणदेखील आपल्याला ह्या साईटवरून करता येते. जर आपण आपली पॉलिसी रद्द केली तर ह्या साईटचे प्रतिनिधी आपल्याला आपला परतावा विमा कंपनीकडून मिळवून देण्यास मदतही करतात असे कंपनीचे म्हणणे आहे.

त्याशिवाय जर आपल्या पॉलिसीचा दावा (Claim) विमा कंपनीकडे करायचा असेल तर त्यासाठी या साईटवर सर्व टी.पी.ए. (थर्ड पार्टी अ‍ॅडमिनीस्ट्रेटरस् म्हणजेच क्लेमच्या वैधतेवर निर्णय देणार्‍या कंपन्या) किंवा स्वत: विमा कंपन्यातील क्लेम विभागांची संपूर्ण संपर्क माहिती उपलब्ध आहे.

ह्या जगात कुठलीही गोष्ट मोफत मिळत नाही. मग आपल्याला नक्कीच एक प्रश्‍न पडला असेल की जर ही साईट 20 विमा कंपन्यांचे विश्‍लेषण मोफत करते तर ह्यात या साईटचा फायदा काय? त्याचे उत्तर म्हणजे, ज्यावेळेस आपण या साईटचा उपयोग करून विमा, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतो त्यावेळेस ह्या विमा, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कंपनी कडून या साईटला विपणन शुल्क (मार्केटींग फी) दिली जाते.

इतर सुविधा
विम्याच्या व्यतिरिक्त या साईटवर आपल्याला मोबाईल फोन व डी.टी.एच. सेवांच्या विविध कंपन्यांच्या योजनांचा तुलनात्मक तक्तादेखील मिळतो. www.apnapaisa.com ही साईटदेखील बरीचशी पॉलिसीबझार सारखीच आहे, पण त्यावर फक्त विविध विमा, कर्ज, गुंतवणूक व मोबाईल फोनच्या सेवांच्या योजनांचे तुलनात्मक तक्ते उपलब्ध आहेत. पॉलिसीबझार सारखे ऑनलाईन व्यवहार ह्या साईटवरून करता येत नाहीत.  

असे म्हणतात की माणसाला अनेक गोष्टीतील जुजबी व काही गोष्टीतील संपूर्ण ज्ञान असावे. विमादेखील असा विषय आहे. जरी आपला विमा एजंट आपल्या किती ही ओळखीचा व जुना असला तरी त्यावर पूर्ण विसंबून राहून आंधळा विश्‍वास टाकणे योग्य नाही. त्यासाठीच आपल्याला ह्या विषयातील अत्यावश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणूनच www.policybazaar.comwww.apnapaisa.com ह्या साईटस् आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात.

Monday, September 21, 2015

Ganesh Utsav 2015 – The springboard of changes initiated by Sadguru Aniruddha Bapu

Last week was filled with joy and happiness. I was lucky to have got a chance to be part of the seva at Happy Home for the Ganesh Utsav celebrations of residence of Sadguru Aniruddha Bapu. This year’s Utsav was the springboard of changes initiated by Sadguru Aniruddha Bapu.


The biggest of the surprises was the decision of Sadguru Bapu to cancel the organization of ‘Miravnuk’ or the celebration procession which is considered by the witnesses as the grandest, and yet the most pleasant and devotion-filled manifestations. Bapu had taken this decision so as to contribute towards reducing the chronic traffic woes of the Mumbaikars and also towards reducing the pressure on Police force of the city during the widely celebrated eleven-day Ganeshotsav. Initially the Shraddhavans were little emotionally moved by this decision. But just within 4-5 days from this decision Shraddhavans got a practical example of how relevant this decision was. A local train derailed on the Western railway line which resulted in complete snapping of railway services and as a result total choking of all roads in the western, extended-western suburbs and central Mumbai. This issue underlined the transportation problems. Here it is to be noted that with its sheer size and magnanimity the processions of earlier years organized have had a cascading effect on the traffic right till Haji Ali in the central Mumbai. Hence this decision from Bapu showed that He starts it from himself before preaching others and how practically and boldly He thinks.

One more thing made easy with this bold decision was, this year the day post-miravnuk was a Sunday. Hence Shraddhavans did not feel much of the pressure. But from next year the cancellation of the Procession will provide a breather to all the Shraddhavans so that they are fresh for their offices for the next day.


Another decision taken by Param Poojya Aniruddha Bapu which was a surprise for the Shraddhavans was the cancelling of Mahaaarti which is held at around 9:30 pm on the first day. The Mahaaarti like the procession is equally the grandest. The cancellation really made all the Shraddhavans feel like missing something huge as not only could the devotees present at Happy Home enjoy it but Shraddhavans from their homes could also take part in the enjoyments as a result of the live streaming of the Mahaarti which had happened for last couple of years directly from Bapu’s residence. But it was observed that Mahaaarti resulted in the darshan of Ganpati Bappa being paused for atleast couple of hours which resulted in darshan going on all the way till 2:00 am at midnight. The cancellation actually resulted in ending the darshan and other activities at 9:30 pm at night and as a result all the Shraddhavan bhaktas and sevaks could reach home well before mid-night.

Parampoojya Sadguru Bapu was in the midst of his intense upasana hence He did not meet His Shraddhavan friends actively. But Parampoojya Nandai and Poojya Suchitdada made it a point to be amongst the Shraddhavans for the whole three day. Alternately, Poojya Samirdada was present at the main gate of Happy Home for the most of the times and greeted almost every Shraddhavan who had come for the darshan. Along with him Respected Swapnilsinh, Respected Paurassinh and all the senior officials of the Sanstha were completely engrossed in welcoming the Shraddhavans and making darshan comfortable for them.

Even though there were many changes the sanctity, piousness and the required vedic rituals were performed to the perfection without any deviation thus stressing the point that Bapu always mentions – “Rules are for people, people are not for rules”.

The series of many more needed and necessary changes to come in future are now anticipated and welcome....

Saturday, September 5, 2015

‘डी’ फॉर ‘डाऊनलोड’

ध्या इंटरनेटवर मोफत सॉफ्टवेअर्स् म्हणजेच फ्रीवेअर्स् हा विषय अत्यंत लोकप्रिय झाला आहे. ह्या सॉफ्टवेअस्‌चा उपयोग आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये भरपूर होऊ शकतो. पण माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायीक व माहितगारांना सोडले तर ह्या सॉफ्टवेअर्स्‌चा वापर व उपयोगाची तर सोडाच पण त्यांच्या अस्तित्त्वाची माहिती देखील फार कमी लोकांना असते. आपण जनरल-स्टोरस्‌मध्ये गेलो तर आपल्याला किराणा मालापासून बेकरी उत्पादने, पेन, पेन्सिल, नोटबुक, खेळणी, इत्यादी अशा अनेक प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. समजा असेच जर आपल्याला एकाच साईटवर सर्वात उपयुक्त व लोकप्रिय सॉफ्टवेअर्स् एकाच ठिकाणी मिळाली तर त्यांचा उपयोग समजून ती वापरायला फार सोपे जाईल. www.freenew.net ही अशीच एक साईट आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर ही साईट म्हणजे फ्रीवेअर सॉफ्टवेअर्स्चे जनरल स्टोअर्स् आहे.

या साईटवरुन आपल्याला काय डाऊनलोड करता येते?
या साईटवरुन आपण विविध सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स्‌चे सेटअप्स् डाऊनलोड करु शकतो. विविध ब्राऊझरस्, संपर्क साधण्याची सॉफ्टवेअरस् उदा: चॅट सॉफ्टवेअर्स्, ऍन्टी-वायरस व फायरवॉल, ऍन्टी-स्पायवेअर, ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपयोगाची ऍप्लिकेशन्स्, विविध ऑफिस ऍप्लिकेशन्स्, ऑडीयो-व्हिडीओ प्लेअर्स्, फोटो-एडिटींग व फोटो-मॅनेजर ऍप्लिकेशन्स्, सी.डी. व डी.व्ही.डी एडिटींग सॉफ्टवेअर्स्, फाईल शेअरिंग व ट्रांस्फर ऍप्लिकेशन्स्, कॉंप्रेशन व बॅकअप ऍप्लिकेशन्स्, सॉफ्टवेअर ड्रायवर्स्, व्यवसायास उपयुक्त ठरणारी सॉफ्टवेअर्स्, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टूल्स. इत्यादी आपल्याला या साईटवरुन मोफत डाऊनलोड करता येतात. त्याशिवाय आपल्याला मोबाईलची ऍप्लिकेशन्स् सुद्धा मोफत डाऊनलोड करता येतात.        
ऍप्लिकेशन्स्
उपयोग
ब्राऊझर्स्
मोझीला फायरफॉक्स, गुगल क्रोम, ओपेरा व सफारी, इ.
असे ऍप्लिकेशन्स जे वापरुन आपण इंटरनेटचा वापर (ऍक्सेस) करु शकतो.
चॅट
स्काईप, याहू मेसेंजर, कॅमफ्रॉग व्हिडीओ चॅट, गूगल टॉक, इ.
या चॅट ऍप्लिकेशन्स्‌चा उपयोग करुन आपल्या संपर्क सूचीतील संपर्कांशी ऑनलाईन संवाद साधू शकतो.
ऍन्टी-वायरस, फायरवॉल आणि ऍन्टी-स्पायवेअर
ए.व्ही.जी., एव्हास्ट व एव्हीरा इ.
ही संगणकाच्या सुरक्षेशी निगडीत ऍप्लिकेशन्स् आहेत. ऍन्टी-वायरस हे वायरसला आपल्या संगणकाला बाधा करण्यापासून रोखते, त्यात शिरलेले वायरस हुडकते व त्यास मारते. फायरवॉल हे वायरस व इतर दुरुपयोगी प्रोग्रॅम्स आपल्या संगणकावर हल्ला करण्यापासून थांबवते.
ऑपरेटींग सिस्टीमला उपयुक्त अशी  सॉफ्टवेअर्स् (सिस्टीम युटिलिटीझ)
- ऍडव्हान्स्ड सिस्टीमकेअर
- स्मार्ट डिफ्रॅग
- सी-क्लिनर, रेवो अनइन्स्टॉलर, इ.

ह्यांच्या उपयोगाने आपल्या ऑपरेटींग सिस्टीमची कार्यक्षमता वाढते.
- हे आपल्या ऑपरेटींग सिस्टीम मधील धोकादायक भासणार्‍या प्रोग्रॅम्स्चे काम करणे गोठवते.
- हे वापरुन आपल्याला आपल्या संगणकावरील डेटा डिफ्रॅग्मेंट करता येतो म्हणजेच तो आपल्याला ऍक्सेस जास्त लवकर करण्यास मदत होते.
- ह्यांच्या उपयोगाने आपण आपल्या संगणकामधील टेंपररी (निरुपयोगी) फाईल्स् डिलीट करु शकतो.
ऑफिस ऍप्लीकेशन्स् -
ओपन-ऑफिस, ऍडोब रीडर,
क्युट पी.डी.एफ रायटर व
फॉक्सइट रीडर, इ.
ह्यांचा उपयोग आपल्याला विविध प्रकारचे दस्तावेज (डॉक्युमेंटस्) बनविण्यासाठी होतो.
ओपन-ऑफिस हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखेच ऑफिस-ऍप्लिकेशन आहे, ज्याच्या उपयोगाने आपण वर्ड, एक्सेल, पावर-पॉईंट, इत्यादी डॉक्यूमेंट्स् बनवू शकतो. ऍडोब रीडर, क्युट पी.डी.एफ. रायटर व फॉक्सइट रीडर ही सर्व पी.डी.एफ दस्तावेजांशी संबंधित ऍप्लिकेशन्स् आहेत.
ऑडीओ-व्हिडीओ -
व्ही.एल.सी. मीडिया प्लेअर, रीअल प्लेअर, ऍप्पल आय-ट्युन्स् व हुलु डेस्कटॉप, इ.
ही ऑडीओ (गाणी) व व्हिडीओ (चलचित्र) पाहण्याची साधनं आहेत.

फोटो-एडिटींग व फोटो-मॅनेजर -
पेंट.नेट, जी.आय.एम.पी., पिकासा, इरफानव्ह्यू , इ.
ह्या एडिटींग सॉफ्टवेअस्‌चा वापर करुन आपण आपल्या फोटोंमध्ये आपल्याला हवे असलेले  बदल करुन ते अधिक सुशोभित करु शकतो.
सी.डी. व डी.व्ही.डी एडिटींग -
सीडीबरनरएक्सपी, डेमन टूल्स लाईट, एओए डीवीडी रिप्पर व इमेजबर्न  इ.
यांचा उपयोग करुन आपल्याला नविन सी.डी. आणि डी.व्ही.डी बनवता येते.

फाईल शेअरिंग व ट्रांसफर -
यूटोरेंट, फ्रॉस्टवायर, टीमव्यूअर, बिटकॉमेट, इ.
यांच्या उपयोगाने आपण एकाच वेळेस एकास किंवा एकाच वेळेस अनेकांशी आपला डेटा शेअर करु शकतो.
कॉंप्रेशन व बॅकअप -
वीन-रार, वीन-झीप, ड्रॉपबॉक्स
व पीझीप, इ.
यांच्या उपयोगाने आपण आपल्या डेटाचा आकार भरपूर कमी करु शकतो. डेटाचा आकार कमी झाल्याने आपली संगणकाची क्षमता तर वाचतेच शिवाय जर आपल्याला हा डेटा इंटरनेटच्या माध्यमाने इमेल किंवा अपलोड करायचा असेल तर ते सोपे व किफायतशीर पडते.
सॉफ्टवेअर ड्रायवर्स्  -
फ्लॅश व मायक्रोसॉफ्टच्या प्रोग्रॅम्स्‌शी संबंधित बरेच ड्रायवर्स् आपल्याला या साईटवरुन डाऊनलोड करता येतात.
हे सॉफ्टवेअर व त्या संबंधित हार्डवेअर यांमधील संपर्क यंत्रणेचे काम कारणारे प्रोग्रॅम्स् असतात.

जर कुठल्या दुकानात, एकाच ठिकाणी सर्व काही मिळत असेल तर त्याला फ्रॉम पीन टू पियानो असे म्हटले जाते. ही साईट सुद्धा फ्रीवेअरच्या बाबतीत तशीच फ्रॉम पीन टू पियानो चे काम करते. आपल्याला लागणारी सर्व प्रमुख फ्रीवेअर्स् ह्या साईटवर मोफत मिळतात. या लेख मालिकेत आपण पुढे नक्कीच यातील काही सॉफ्टवेअरर्स्‌बद्दल इत्थंभूत जाणून घेऊच. पण सर्व सामान्य संगणक उपभोक्त्यांनी ही गोष्ट नक्कीच आपल्यामध्ये उतरवावी की सॉफ्टवेअर्स् वापर हा फक्त काही माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायिक व माहितगारांना मिळालेला मक्ता नाही. त्यामुळे त्यांच्या उपयोगाने आपला वेळ व श्रम वाचविणे ही नक्कीच सयुक्तिक ठरेल.