Friday, May 29, 2015

Vegetarian Cheese Brands in India

The other day I happened to read a blogpost on Samirdada’s blog (www.aniruddhafriend-samirsinh.com/vegetarian-nonveg-cheese-2). It was in-line with Sadguru Bapu’s discourse on Non-veg Cheese. It was surprising to know that even cheese has classifications. And what was all the more flabbergasting was to know that the Non-veg cheese is made from gut lining (rennet) of young calves after killing them. Thank God (Ambadnya) we got to know this and now since last one year, myself and many of my friends have started to actively ask the food joints, hotels, restaurants and vendors where we eat about the type and brand of cheese that they serve before eating. Unless we ask them and create awareness we would not get what we want. It is basic demand and supply principle.

On further enquires and information seeking it is found that in India Amul and Gowardhan are the two brands that genuinely make and sell vegetarian cheese which is devoid of any beef contents. Whatever information I have gathered point towards only these two brands selling genuine vegetarian cheese. Hence now whenever we go for eating out we ask the restaurants if they are using Amul or Gowardhan cheese. Only if they do, do we eat with them. Further it was good to know that most of the outlets of Smokin' Joe's Pizza and Domino's Pizza use vegetarian cheese.

Take care folks. Unless we ask they won’t tell. And unless we demand they won’t give. 

Some of the reference sites to the above information are as under –
  1. www.articles.economictimes.indiatimes.com/2005-11-09/news/27471271_1_cheese-top-dairy-camemberts
  2. www.cheese.joyousliving.com/CheeseListBrand.aspx
  3. www.cooking.stackexchange.com/questions/23638/does-dominos-use-rennet-free-cheese

Saturday, May 23, 2015

ईगो सर्चिंग - Ego Searching OR Vanity Searching

This article which I am publishing today had appeared in Dainik Pratyaksha on 25th March 2011. The article is on Ego Searching or Vanity Searching. I hope you all understand, use and enjoy this technique to help yourself and your organization to the fullest. ईगो सर्चिंग

इंटरनेट व त्यावरील सोशल मीडियामुळे प्रचंड प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण होत आहे. कोट्यवधी लोक हल्ली ब्लॉगिंग करतात, फेसबुक व ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटस्चा उपयोग करून अधिकाधिक लोकांशी संवाद साधतात. अनेक गोष्टींबद्दल येथे चर्चाही चालतात. थोडक्यात सांगायचे झाले तर हल्ली सोशल नेटवर्किंग म्हणजे आधुनिक जमान्यातील ‘व्हर्चुअल चाळ’ बनली आहे. ज्यात सर्वांचे दरवाजे सतत उघडे असतात व कट्ट्यावरच्या गप्पा कायमच रंगलेल्या असतात. ह्या इंटरनेटवरील  गप्पा राजकारण, व्यापार, खेळ, सिनेमा, अशा विविध विषयांवर तर असतातच शिवाय अनेक वेळा ह्या गप्पांमध्ये व्यक्ती, संस्था, एखाद्या कंपनीची सेवा व उत्पादने ह्यावर ही चालतात. त्यामुळे जर आपण ब्रॅडिंगच्या व व्यावसायिक माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने विचार केला तर ह्या इंटरनेटवरील गप्पांबद्दल जाणून घेणे हे एखाद्या कंपनीच्या मार्केटिंग प्रमुखासाठी, किंवा एखाद्या अभिनेत्याला त्याची समाजातील प्रतिमा जाणण्यासाठी, एखाद्या विषयातील ज्ञान मिळवू पाहणार्‍यांना किंवा अगदी देशाच्या गुप्तचर यंत्रणेला ही गरजेचे आहे. ह्या गप्पांमधून समाजमनाची नाडी कळते व म्हणूनच ते आवश्यक असते. ह्या जाणून घेण्यालाच ईगो सर्चिंग किंवा व्हॅनिटी सर्चिग असे म्हणतात. आजच्या आपल्या या भागातील विषय हाच आहे. या प्रकाराला ईगो सर्चिंग असे नाव शॉन कार्टन यांनी १९९५ साली दिले.

ईगो सर्चिंगमध्ये आपण कोणताही एक शब्द किंवा अनेक शब्द निवडून तो शब्द इंटरनेटवर किती वेळा लिहिला जातो ते आपल्याला कळते. जेव्हा-जेव्हा हा शब्द इंटरनेटवर उल्लेखिला जातो त्या वेळेस ज्या साईटचा उपयोग आपण ईगो सर्चिंगसाठी करत आहोत त्या साईटकडून आपल्याला ईमेलद्वारे तसे कळवले जाते. उदाहरणासाठी आपण www.socialmention.com ही साईट बघूया. या साईटवर आपण गेलो की आपल्याला आपला ईमेल आय.डी. या साईटला द्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला तो शब्द निवडावा लागतो ज्याचा उल्लेख इंटरनेटवर कुठेही झाला की आपल्याला सूचना हवी असते. त्यानंतर ह्या शब्दाचा कोणत्याही ब्लॉगवर, फेसबुक व ट्विटरवरील पोस्टिंगस्मध्ये जेव्हा-जेव्हा उल्लेख होतो, त्यावेळेस आपल्याला या साईटद्वारे तो शब्द जेथे उल्लेखिला गेला आहे ती हायपरलिंक ईमेल केली जाते. www.socialmention.com सारखेच गुगल ऍलर्टस् www.google.com/alerts व याहू ऍलर्टस् http://alerts.yahoo.com ही असेच काम करते. गुगल ऍलर्टस्च्या वापराने आपण बातम्या, ब्लॉग्ज व वेब पेजस्वर उल्लेखिलेल्या व आपल्याला रस असणार्‍या कोणत्याही शब्दाबद्दल ही ईमेल पाठविली जाते. साधारणपणे www.socialmention.com ही साईट ब्लॉग्जमधील शोधासाठी अत्यंत उपयोगाची आहे. पण फेसबुक व ट्विटरशी निगडित सूचना हेरण्यासाठी www.kurrently.com ही साईट फार उपयोगी असल्याचे जाणवते. त्याशिवाय याच साईटचा उपयोग करून आपण गुगल, बिंग, बयदू व यूट्युब या सर्च इंजिन्स्‌वर ही आपल्याला हव्या असणार्‍या शब्दांबद्दल शोध घेऊ शकतो. तसेच www.findarticles.com  हे अशीच एक ईगो सर्चिंगची साईट आहे. ह्या साईट चा उपयोग खास करून विविध ऑनलाईन प्रकाशनातील उल्लेख शोधण्यासाठी होतो. ह्या साईटस्‌च्या व्यतिरिक्त www.whostalkin.com, http://search.twitter.com व अशा अनेक साईटस्चा उपयोग करून आपण ईगो सर्चिंग करू शकतो.

बुलेटीन बोर्डस्‌‍वरील ईगो सर्च
आपल्या सर्वांना बुलेटीनबोर्ड म्हणजे काय ते माहीतच असेल. बुलेटीनबोर्ड म्हणजे अशी साईट ज्यावर आपल्याला कोणत्याही विषयावर लिहिता येते. उदाहरण द्यायचे झाले तर www.misalpav.com, www.marathimati.com, www.maayboli.com, आणि http://mr.upakram.org हे मराठी भाषेतील बुलेटीनबोर्ड साईटस् आहेत. ह्या बुलेटीनबोर्डस्वरचे उल्लेख जाणण्यासाठी www.boardtracker.com ह्या साईटचा आपण चांगला उपयोग करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त www.boardreader.com, www.forumfind.com, इत्यादि साईटस्‌चा बुलेटीनबोर्डवरील ईगो सर्चमध्ये उपयोग होतो.

कशाचे ईगो सर्चिग करावे
आता आपण थोडक्यात बघूया की कोणत्याही संस्थेने या साईटस्च्याद्वारे काय जाणून घ्यायचे असते म्हणजेच कशाचे ईगो सर्च करायचे असते.
१) शक्यतो आपल्या कंपनीची उत्पादने / सेवांची नावे, आपल्या प्रमुख कर्मचार्‍यांची नावे ह्यांचा ईगो सर्च करावा. ह्यामुळे आपली कंपनी व त्याची  उत्पादन / सेवा आणि कर्मचार्‍यांबद्दल इंटरनेटवर काय बोलले जात आहे ते कळण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त हे कर्मचारी इंटरनेटवर काय बोलत आहेत तेही समजू शकते. 
२) त्याशिवाय आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी व त्यांची उत्पादने / सेवा व त्याच्या प्रमुख कर्मचार्‍यांची माहिती मिळवणे सुद्धा ईगो सर्चिगमधील महत्त्वाचा भाग मानला जातो, ज्यामुळे आपल्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याची बलस्थानं व कच्च्या दुव्यांचा अंदाज बांधता येतो.
३) आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी व व्यक्तिमत्त्व यांच्यावर ही आपण ईगो सर्चिंग करावे ज्यामुळे आपल्याला आपल्या क्षेत्रातील घडामोडी कळण्यास मदत होते.

आर.एस.एस. फीडस्
ईगो सर्चिंगसाठी आपल्याला अजून एका साधनाचा वापर करता येतो. ते म्हणजे आर.एस.एस. फीडस्. आर.एस.एस. फीडस् म्हणजेच रीअली सिंपल सिंडिकेशन. या आर.एस.एस. फीडस् म्हणजेच ब्लॉग्स, वेबसाईटस्, बुलेटीनबोर्ड, इत्यादि अनेक इंटरनेटवरील स्त्रोतांच्या वेबपेजस्वर जेव्हा-जेव्हा माहिती अपडेट केली जाते तेव्हा आपल्याला नियमितपणे पाठविल्या जाणार्‍या सूचना व संकेत. ह्यातील पाठविल्या जाणार्‍या सूचना संक्षिप्त रूपात असतात. एक विशिष्ट विषयापुरत्याच सूचनासुद्धा आपल्याला मिळवता येतात. ह्या सूचना आपल्याला आपल्या वेब ब्राऊझर (उदा: मोझिला फायरफॉक्स) किंवा कोणत्याही आर.एस.एस. रीडरमध्ये पाठविल्या जातात. www.netnewswireapp.com, www.feedroll.com, www.google.com/reader, www.netvibes.com, इत्यादी साईटस्वरून आपल्याला ही आर.एस.एस. रीडर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरस् मोफत डाऊनलोड करता येतात. त्याशिवाय ह्या आर.एस.एस. रीडरमध्ये आपण अनेक स्त्रोतांच्या आर.एस.एस. फीडस् एकत्र वाचू शकतो. ह्या आर.एस.एस. फीडस्च्या उपयोगाने आपण विशिष्ट शब्दांचा उपयोग करुन नोकर्‍या, व्यापारातील भावी सहयोगी, इत्यादि शोधण्यासाठी उपयोग करू शकतो.

ह्याशिवाय जर आपल्याला कोणत्या वेब पेजवरच्या बदलांची सूचना हवी असेल तर www.changedetect.com या साईटचा आपण उपयोग करू शकतो. त्याशिवाय www.timelyweb.com या साईटवरुन आपल्याला टाईंमलीवेब नावाचेच एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मोफत डाऊनलोड करायला मिळते. हे ऍप्लिकेशनही चेंजडीटेक्ट.कॉम सारखेच काम करते. कोणत्या वेब पेजवरच्या बदलांची सूचना ही आर.एस.एस. फीडस् सारख्याच वेब ब्राऊझरमध्ये मिळतात.

इंटरनेट हे ग्राहक अधिकार (कंझ्युमर राईटस्) व लोकशाहीला पुरक ठरणारे फार मोठे साधन आहे. कारण इंटरनेटसारखे मुक्त व अफाट पसरलेले माध्यम ह्या जगात नाही. म्हणूच इंटरनेटला नोबेल शांती पुरस्काराच्या नामांकनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीररित्या विचार चालू होता. इंटरनेट ह्या माध्यमातून आज अनेक देश, कंपन्या व अगदी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आपली ओळख टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. दररोज आपल्याला आपल्या बरोबरील व्यक्तीच्या स्वभावाच्या व त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या नव-नवीन ओळखी होत जातात. म्हणजेच ओळख ही निरंतर बदलणारी गोष्ट आहे. जगसुद्धा आदीम काळापासून आजपर्यंत सतत बदलतच आले आहे. त्यामुळे ह्या बदलांचा वेध घेत पुढे जाणे म्हणजेच वास्तवाचे भान राखणे व या व्हर्चुअल जगातील ईगो सर्चिंगसुध्दा ह्या बदलत्या वास्तवाचा एक अविष्कार.

Thursday, May 14, 2015

पेपरलेस फाईल्स् / Paperless Office

I had an article published on Documents Converters and Paperless Office on 18th March 2011 in Dainik Pratyaksha. I am publishing the same here.

Most of the organizations and offices have been going paperless and Shree Aniruddha Upasana Foundation is also not a stranger to all these development. Under the guidance of Param Poojya Aniruddha Bapu.

This article will suggest you multiple options to convert your own office into a paperless one.

पेपरलेस फाईल्स्  / Paperless Office

अनेक वेळस आपल्याला आपल्या ऑफिसमधलं कुणीतरी एक महत्त्वाची फाईल ईमेल करतं, ज्यावर आपल्याला जलदगतीने काहीतरी महत्त्वाचे काम करायचे असतं. पण काही वेळेस ती उघडतच नाही. मग दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर आय.टी. विभागात विचारले की कळते की आपल्याला पाठविलेली फाईल वर्ड-२००७ मध्ये बनवलेली असते व आपल्या घरी तर वर्ड-२००३ मधील फाईलस्‌ रीड केल्या जाऊ शकतात. अशाच एक ना अनेक समस्यांवरील मोफत उपाय व तोडगे आपण आज जाणणार आहोत. हे तोडगेच आपल्याला कॉर्पोरेट जगतात व सरकारी क्षेत्रात वावरण्यास व ‘पेपरलेस ऑफिस’ च्या संकल्पनेशी जुळवून घेऊन स्वत:ला त्यात व्यवस्थित मिसळण्यास मदत करणारे आहेत.


फाईलचे कन्व्हर्टरस्

www.docspal.com ह्या साईटवरुन आपण कोणतेही दस्तावेज (Document), व्हिडियोज्, ऑडिओज्, इमेजेस्, ई-बुकस् आणि आरकाईव्ज् ह्या सहा प्रकारच्या कुठल्याही एक्सटेंशनस्च्या फाईल्स् दुसर्‍या कुठल्याही, आपल्याला हव्या असणार्‍या एक्सटेंशनमध्ये मोफत ‘कन्व्हर्ट’ करता येतात (उदा: .docx चे .doc .xlsx Vo .xls, .bmp चे .jpeg, .mp4 चे .mp3, इत्यादि). ह्या साईटवर डॉक्युमेंटस्‌ची  (उदा: .doc, .xls, .pdf, .ppt, .txt इत्यादि) व्हिडिओज्‌ची ९ (उदा: .avi, .mpeg, .wmv, .mp4 इत्यादि) ऑडिओज्‌ची १४ (उदा: .mp3, .wav, .flv, इत्यादि)  इमेजेस् ची ८ (उदा: .bmp, .gif, .jpeg, .tiff, इत्यादि) ई-बुकस्ची ९ (उदा: .chm, .epub, .pdb. .tcr, इत्यादि) आणि आरकाईव्ज् ची ७ (उदा: .zip, .rar, .jar, .cab, इत्यादि) एक्सटेंशनस् सपोर्ट व रूपांतरीत केली जातात. 


जर आपल्याला कोणतीही फाईल रूपांतरीत करायची असेल तर सुरूवातीला जी फाईल कन्व्हर्ट करायची आहे ती ह्या साईटवर अपलोड करावी लागते. त्या नंतर ह्या अपलोड केलेल्या फाईलचे जे एक्सटेंशन असेल ते निवडावे लागते. त्यानंतर ज्या एक्सटेंशनमध्ये आपल्याला ही फाईल कन्व्हर्ट करायची आहे ते निवडावे लागते. त्यानंतर आपण ही रुपांतरीत फाईल डाऊनलोड करू शकतो. त्याशिवाय फाईल रूपांतरीत झाली की आपल्या ह्या साईटवरूनच ती ईमेल करण्याचा पर्याय ही उपलब्ध आहे. हे सारे अगोदर सांगितल्याप्रमाणे मोफत तर आहेच, शिवाय ह्यासाठी ह्या साईटवर आपल्याला यूझर म्हणून रजिस्ट्रेशन करण्याचीही आवश्यकता नसते. ह्या साईट सारखीच www.zamzar.com  ही सुद्धा ह्याच सर्व सोयी उपलब्ध  करून देणारी साईट आहे.

पीडीएफ फाईल्स्

साधारणत: आपल्याला आपल्या ऑफिसच्या कामांमध्ये पीडीएफ फाईल्स्‌चा उपयोग खूप करावा लागतो. पीडीएफ फाईल्स् ह्या रीड-ओन्ली असतात. म्हणजेच ह्या फाईल्स् आपल्याला फक्त वाचता येतात त्या एडिट (बदल) करता येत नाहीत. www.docspal.com ह्या साईटचा उपयोग करुन आपल्याला कोणत्याही पी.डी.एफ. फाईलचे रूपांतरण वर्ड, टेक्सट, इत्यादि फाईलमध्ये करता येते. त्याचबरोबर व त्याच्याच विरुद्ध कोणत्याही एडिटेबल (बदल करता येण्याजोग्या) फाईलचे रूपांतरण पी.डी.एफ. फाईलमध्ये करता येते. www.freepdfconvert.com ह्या साईटवरुन सुद्धा आपण कोणतीही फाईल पीडीएफमध्ये व पीडीएफ मधून कोणत्याही फाईल मध्ये रूपांतरीत करू शकतो.www.ilovepdf.com ही अजून एक पी.डी.एफ. फाईल्स्‌साठीच उपयोगी साईट आहे. ह्या साईटच्या उपयोगाने आपण कोणतीही पी.डी.एफ. ची एक फाईल मोडून त्याच्या अनेक फाईल्स् ही करु शकतो (Split) व अनेक फाईल्स् एकत्रही (Merge) करु शकतो. हे करण्यासाठी आपल्याला जी / ज्या फाईलस् स्प्लिट किंवा मर्ज करायच्या असतील त्या ह्या साईटवर अपलोड कराव्या लागतात. त्यानंतर स्प्लिट किंवा मर्ज हा पर्याय निवडला की आपल्याला स्प्लिट किंवा मर्ज केलेल्या फाईल्स् डाऊनलोड करता येतात. ह्या सर्व साईटस्वरुन आपण ऑनलाईन गेलो तरच ह्या सुविधा मिळू शकतात.पण ज्या वेळेस आपण इंटरनेटशी जोडलेले नसतो किंवा इंटरनेटची सेवा उपलब्धच नसते त्यावेळेस ह्या ऑनलाईन साईटस्चा काही उपयोग होऊ शकत नाही. त्यावेळेस आपल्याला आपल्या संगणकावर स्थिरावणारे (Installed) सॉफ्टवेअरच उपयोगी पडू शकते. अशा वेळेस आपल्याला उपयोगाला www.ilovepdf.com  http://download.cnet.com ह्या साईटस् येऊ शकतात. ह्या साईटवरुन आपण पी.डी.एफ. कनवर्टर डाऊनलोडर सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करु शकतो. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले की आपण ऑफलाईन असून ही (इंटरनेटशी जोडलेले नसताना) कोणत्याही पीडीएफ फईलचे रूपांतरण इतर प्रकारच्या एडिटेबल फाईल्स् मध्ये करू शकतो.


तसेच http://download.cnet.com ह्या साईटवरुन आपण कोणती ही फाईल पीडीएफ मध्ये रूपांतरीत करण्यासाठीचे सॉफ्टवेअरही मोफत डाऊनलोड करुन ते ही ऑफलाईन वापरु शकतो.


मोठ्या फाईल्स्‌चे शेअरींग व ट्रान्सफर
आपण आपले नेहमीचे जी-मेल (Gmail) व याहू मेलचे खाते वापरुन कोणत्याही प्रकारच्या फाईलचे हस्तांतरण जगामध्ये कुठेही ईमेलवरुन मोफत करू शकतो. ह्या ईमेल सेवांच्या उपयोगाने आपण एका वेळेला २५ एम.बी. आकाराच्या (Size) फाईल्स्चे हस्तांतरण करु शकतो. पण आपल्याला ह्याही पेक्षा मोठ्या फाईल्स्चे हस्तांतरण करायचे असेल तर ते ईमेल सेवांच्या माध्यमाने शक्य नाही. त्यासाठी आपण कोणतेही इस्टंट मेसेजिंग ऍप्लिकेशन उदा: गुगल टॉक किंवा स्काईपचा मोफत उपयोग करून आपण कितीही मोठी फाईल व कोणत्याही प्रकारची फाईल ट्रान्सफर करु शकतो. त्याशिवाय आपण www.mediafire.com,www.filefactory.com, www.easy-share.com, www.datafilehost.com या व अशा अनेक साईटस् आहेत ज्यावर आपण मोफत फाईल होस्टींग करु शकतो. या साईटस्‌चा उपयोग करुन आपण कोणत्याही प्रकारची फाईल ट्रान्सफर करु शकतो. या साईटस्वर आपल्याला फाईलस् अपलोड करण्याची कोणतीही मर्यादा नाही. ट्रान्सफर करण्यासाठी आपण ह्या साईटवर गेलो की आपल्याला जी फाईल ट्रान्सफर करावयाची आहे ती अपलोड करावी लागते. ती अपलोड केली की आपल्याला ही फाईल ह्या साईटवर जिथे सेव्ह केली गेली असते त्या जागेची एक हायपरलिंक (वेबवरील त्या फाईलचा पत्ता) दिली जाते. त्यानंतर ज्या माणसाला आपल्याला ही फाईल पाठवायची असते त्याला ही हायपरलिंक कळवायची असते. त्यानंतर ती व्यक्ती ह्या हायपरलिंकवर वर जाऊन ही फाईल डाऊनलोड करू शकते. यात फक्त एकच समस्या असते ती म्हणजे फाईल ट्रान्सफर करताना दोनही व्यक्ती म्हणजे फाईल पाठवणारी व फाईल घेणारी व्यक्ती एकाच वेळेस ऑनलाईन असाव्या लागतात.

आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व ट्रांसफरच्या प्रकारात एक गोष्ट सुरेक्षेच्या दृष्टीने त्रासदायक ठरु शकते. ती म्हणजे ट्रान्सफरच्या वेळेस अपलोड केलेल्या फाईल्स् दुसर्‍या कंपनीच्या सर्व्हरवर अपलोड केल्या जातात. त्यामुळे ह्या फाईल्स्चा गैरवापर होण्याची शक्यताही असते. जरी आत्तापर्यंत असे घडल्याचे फारसे ऐकीवात नसले तरी अशी शक्यता नाकारताही येत नाही. त्यावर तोडगा म्हणजे www.isendr.com, www.pipebytes.com व www.filesovermiles.com या साईटस्. ह्या पीयर-टू-पीयर तंत्रज्ञानावर म्हणजे एका संगणकावरून थेट दुसर्‍या संगणकावर, दुसर्‍या कोणत्याही सर्व्हरवर अपलोड न होता थेट ट्रान्सफर होतात. सुरक्षेचाच विषय निघाला आहे तर आयसेंडरबद्दल एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे ह्या साईटवरच्या सर्व ट्रान्सफरस् ह्या १२८ बीटचे एनक्रि्पशन वापरुन सुरक्षित केल्या गेलेल्या असतात. त्याच बरोबर आपण ह्या फाईलस् उघडण्यासाठी पासवर्ड ही देऊ शकतो. या सर्व साईटस्‌चा उपयोग करण्यासाठी आपल्याला या साईटवर नोंदणी करण्याची गरज नसते किंवा कोणतेही ह्या साईटस्चे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची गरज नसते. त्याशिवाय ज्या फाईल्स् आपल्याला ट्रान्सफर करायच्या असतात त्यांच्या प्रकारावर (file type) व आकारावर (Size) कोणतेही निर्बंध नसतात.
हल्ली बर्‍याच कंपन्या पेपरलेस ऑफिसची संकल्पना राबवण्यावर जोर देत आहेत. खाजगी कंपन्यांबरोबरच हल्ली सरकारही ह्याच पेपरलेस ऑफिसची संकल्पना राबविण्यावर जोर द्यायला लागली आहे. पेपरलेस ऑफिस म्हणजेच ऑफिसच्या नेहमीच्या व्यवहारांमध्ये पेपरचा नाममात्र उपयोग करणे व ऑफिसची सर्व कागदपत्रे व व्यवहार संगणकावरच म्हणजेच सॉफ्ट फॉरमॅट मध्येच राखले जाणे. शिवाय सारे संवाद ही ईमेल, आंतरिक चॅट / इस्टंट मेसेजिंग व फाईल ट्रान्सफरनेच केले जातात. ही संकल्पना अत्यंत उपयोगाची व कंपन्यांचा आणि तिच्या कर्मचार्‍यांचा वेळ व पैसा वाचवणारी आहे. त्यामुळे आपण ह्या पेपरलेस ऑफिसमध्ये मोडणारे सर्व तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरजच आहे. आता फक्त कॉर्पोरेट जगताशी संबंधित असणार्‍या व्यक्तींनाच नाही तर लवकरच साधा-सुध्या सरकारी कामांमध्ये जनसामान्यांना याचा वापर करावा लागणार आहे.  म्हणूनच ‘पेपरलेस ऑफिस’साठी आपणही सज्ज असलेलं बरं.

Friday, May 1, 2015

Vedic Vaishakh Pournima Upasana as told by Aniruddha Bapu

Vaishakh Pournima is the full-moon day of the Hindu calendar month of Vaishakh. It is that day of the year when divine and angelic beings and souls meet Sadguru and make plans for the betterment of the entire humanity. Out of the unmerited love of Sadguru this day brings maximum positive vibrations for the whole of humanity.

Sadguru Aniruddha Bapu has described to Shraddhavans the Vedic way of performing upasana (prayers) of Sadguru and Lord Hanumant on this day. You may read the following procedure to know more about it.